Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Panchayat 4 : कोण आहे ‘पंचायत’ची क्रांती देवी?, NSD स्टुडंट आणि बरंच काही…
सगळीकडे सध्या एकाच वेब सीरीजची चर्चा आहे ती म्हणजे ‘पंचायत’ (Panchayat Web Series) फुलेरा गावात आता पंचायत निवडणूकीची रमधुमाळी सुरु होणार आहे. ‘पंचायत सीझन ४’ (Panchayat Season 4) मध्ये नवा प्रधान कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यावेळी मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पण तुम्हाला क्रांती देव कोण आहेत आणि त्या कोट्यावधींच्या मालकीण आहेत हे माहित आहे का? चला तर जाणून घेऊयात…(Bollywood)

‘पंचायत सीझन ४’ मध्ये अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आणि अभिनेत्री सुनीता राजवार (Sunita Rajwar) आमने-सामने येणार आहेत. क्रांती देवीची भूमिका साकारणाऱ्या सुनीता गेले अनेक वर्ष हिंदी चित्रपट, मालिका विश्वात काम करत आहेत. सुनीता यांचा जन्म उत्तराखंड मध्ये झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या सुनीता यांनी शाळेत नाटकांमध्ये कामं केली होती. त्यानंतर अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी National Scool Of Drama (NSD) मध्ये एडमिशन घेतलं आणि १९९७ ला डिग्री संपादन केली.(Entertainment news)

सुनीता यांनी आजवर ‘गुलाल’, ‘बालिका वधू’, ‘क्या कसूर है अमला का’ अशा अनेक हिंदी मालिका;तसेच, ‘स्त्री’, ‘बजरंगी भाईजान’, ‘संतोष’, ‘हिस्स’, ‘बाला’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. शिवाय, पंचायत वेब सीरीजमधील त्यांनी साकारलेली क्रांती देव प्रेक्षकांना विशेष भावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता राजवार यांची एकूण संपत्ती ८ ते १० कोटी इतकी आहे.(Sunita Rajwar movies)
================================
=================================
दरम्यान, पंचायत सीझन ४ बद्दल बोलायचं झालं तर अॅमेझॉन प्राईमवर हा सीझन २४ जून २०२५ रोजी रिलिज होणार आहे. या सीझनमध्ये फुलेरा गावातील निवडणूक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या सीरीझमध्ये नीना गुप्ता, जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, अशोक पाठक असे बरेच कलाकार आहेत.(Panchayat season 4 cast)