Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

कोकणकन्या I-Popstar Radhika Bhide आहे तरी कोण?
सध्या विविध रिअॅलिटी शो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत… आता यात ‘बिग बॉस’ सारखेही शो आहेत आणि खरं टेलेंट लोकांसमोर आणणारे गाण्याचे किंवा जान्सचेही शोज आहेत… अशातच’आय पॉपस्टार’ (I-Popstar) या गाण्याच्या शोची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे… आणि यात एक नाव गाजतंय ते म्हणजे राधिका भिडे (Radhka Bhide) हिचं… नेमकी कोण आहे ही राधिका आणि तिच्या बहिणीचं आणि इंडस्ट्रीचं काय कनेक्शन आहे जाणून घेऊयात…

तर, जसे ओटीटीवरील सीरीज आणि चित्रपटांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे; अगदी तसाच या नव्या आय पॉपस्टार शोचा देखील निर्माण झाला आहे… या कार्यक्रमात सा रे ग म प फेम रोहित राऊत (Rohit Raut) हा देखील त्याच्या उत्कृष्ट आवाजाने परीक्षक आणि प्रेक्षकांचं मन जिंकत आहे… आणि त्यासोबतच आणखी एक मराठमोळा गोड चेहराही गाजतोय… राधिका भिडे असं या सुंदर गायिकेचं नाव असून ‘सा रे ग म प’ फेम गायिका शमिका भिडेची (Shamika Bhide) ती लहान बहीण आहे… मुळची रत्नागिरीची असणारी राधिका गेली काही वर्ष मुंबईत राहते… इतकंच नाही कर, राधिका अजय-अतुल, श्रेया घोषाल यांच्या कॉन्सर्ट्सचाही महत्वाचा भाग राहिली आहे…

राधिकाने आधी खरं तर संगीत क्षेत्रात करिअर करण्याचं काही ठरवलं नव्हतं… पण दहावीनंतर हळूहळू सुरांची ओढ मनात निर्माण झाली आणि स्वत:च गाणी लिहून त्यांना चाल लावण्याचा एक नवा प्रवास राधिकाचा सुरु झाला… राधिकाच्या घरी पिढान् पिढ्या सुरु असणारा व्यवसाय असूनही तिने संगीत क्षेत्राची निवड केली आणि त्यातही स्वत:ची गाणी आणि आपल्या मायबोली मराठी भाषेला जगापर्यंत आणण्याचा तिने प्रयत्न केला…(Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Thamma : हॉरर कॉमेडीच्या नावाने अपेक्षाभंग करणारा सिनेमा!
================================
राधिका भिडे हिने ज्या आय पॉपस्टार या शो मध्ये सहभाग घेतला आहे त्याची थीम अशी आहे की, देशातील विविध भागांमधून निवडलेल्या स्पर्धकांना स्वतः गाणी लिहून, त्याला संगीत देऊन ती परीक्षकांसमोर सादर करायची आहेत. एतकंच नाही तर, त्यांनी सादर केलेल्या गाण्यांना सोशल मीडियावर कसा प्रतिसाद मिळतो हे देखील स्पर्धेत पाहिलं जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमामुळे राधिकाचं गाणं आणि तिचा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. ‘मन धावतंया तुझ्याच मागं’ या तिच्या गाण्याने तर परीक्षकांना वेज लावलं होतं…
तसेच राधिकाने या रिअॅलिटी शोच्या आधी हिंदी सीरिज ‘ताजा खबर २’ आणि ‘दे धक्का २’ व ‘हर हर महादेव’ या मराठी सिनेमांसाठी बॅकग्राऊंड स्कोरिंग आणि व्होकल प्रॉडक्शनचं काम देखील पाहिलं आहे. याशिवाय, तिनं काही गुजराती गाण्यांसाठी बॅकग्राऊंड स्कोरिंगचं काम केलं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi