दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
राज कपूरच्या चित्रपटांची ऑफर नाकारणारी नायिका कोण?
ज्या काळात राज कपूरच्या (Raj Kapoor) आर के फिल्म्स मध्ये काम करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता त्या काळात एका मुलीने राज कपूरच्या (Raj Kapoor) एक नाही दोन नाही तर तब्बल चार चित्रपटात काम करायला चक्क नकार दिला होता! कोण होती ही मुलगी? कां दिला नकार? नंतर ती अभिनेत्री झाली का? ही मुलगी होती भारतातील त्या काळातील सर्वात सुंदर स्त्री लीला नायडू! आजच्या पिढीला लीला नायडू हे नाव कदाचित आठवणार नाही. परंतु पन्नास च्या दशकामध्ये अमेरिकेच्या Vogue या मासिकाने जगातील दहा सुंदर स्त्रियांची निवड केली होती. त्यात भारतातील दोन स्त्रियांचा समावेश होता.
एक होती लीला नायडू आणि दुसरी गायत्री देवी. १९५६ साली शम्मी कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये लीला नायडू ला पहिल्यांदा राज कपूर यांनी पाहिले आणि ते पाहतच राहिले! तिचं आरस्पानी सौंदर्य पाहून राज कपूर (Raj Kapoor) अक्षरशः घायाळ झाले. आणि आपल्या आर के फिल्मची नवीन नायिका म्हणून तिलाच घ्यायचे असे त्यांनी मनोमन ठरवले. रिसेप्शन नंतर लीला नायडू दिल्लीला रवाना झाली. परंतु राज कपूर (Raj Kapoor) यांच्या मनातून मात्र लीला नायडू जात नव्हती. त्यांनी दिल्लीला कॉन्टॅक्ट करून लीला नायडू सोबत एक मीटिंग फिक्स केली. लीला नायडू या मिटींगला आपल्या वडिलांसोबत आली. राज कपूर ने तिथे तिला मुल्कराज आनंद यांच्या ‘ट्रॅक्टर गॉडसेस’ या कादंबरीवरील चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली.
या चित्रपटात तिला एका ग्रामीण भारतीय महिलेची भूमिका करायची होती. तिने होकार दिला. आणि नंतर राज कपूर (Raj Kapoor) ने तिला स्क्रीन टेस्ट साठी मुंबईला बोलावले. ग्रामीण पेहरावतील तिचे अनेक छायाचित्रे आर के चे छायाचित्रकार राघू कर्माकर यांनी काढली. त्यानंतर राज कपूरने (Raj Kapoor) जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट देऊन तिला आणखी फोटोसेशन करायला सांगितले. त्यावर तिने सांगितले,” हा चित्रपट एका ग्रामीण पार्श्वभूमीवर आहे. आणि तुम्ही मला हे वेस्टर्न कपडे का देत आहात?” तेव्हा राज कपूरने सांगितले,” आम्हाला तुझ्यासोबत एक नाही तर पुढचे चार चित्रपट करायचे आहेत. त्यामुळे या प्रकारच्या कॉस्च्युम्स मधून तुझे फोटो आम्हाला हवे आहेत!” तेव्हा लीला नायडू म्हणाली, “ सॉरी.” ती तेंव्हा ऑक्सफर्ड मध्ये पुढील अभ्यासक्रमासाठी जाणार होती. तिने राज कपूरला नम्र नकार देऊन ऑक्सफर्ड ला ती निघून गेली.
एकीकडे राज कपूरच्या (Raj Kapoor) चित्रपटात काम करण्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या मुली आणि दुसरीकडे राजकपूरने (Raj Kapoor) स्वतः ऑफर दिलेले चार चार चित्रपट नाकारणारी लीना नायडू … असे काहीतरी चित्र होते. लीला नायडू चा नकार आल्यानंतर राज कपूरने मुल्कराज आनंद यांच्या कादंबरी चित्रपटाचा प्रस्तावित विचारच सोडून दिला. ऑक्सफर्ड मधील अभ्यासक्रम पूर्ण करून १९६० साली लीला पुन्हा भारतात आली तेव्हा ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘अनुराधा’ या चित्रपटापासून तिने रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. त्यानंतर ‘ये रास्ते है प्यार के’, ‘उम्मीद’, हे चित्रपट केले. श्याम बेनेगल यांच्या ‘त्रिकाल’ (१९८२) या चित्रपटात देखील तिची भूमिका होती. नवकेतनच्या गाईड या चित्रपटासाठी देखील तिचा विचार करण्यात आला होता परंतु नृत्य करण्यामध्ये ती कमी पडत होती त्यामुळे तिला नाकारले गेले.
हे देखील वाचा : कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या प्रेमाची
रूथ झाबवाला यांच्या ‘द हाऊस होल्डर’ या इंग्रजी सिनेमात तिच्याशी कपूर सोबत चमकली. या सिनेमाचे दिग्दर्शन जेम्स आयव्हरी यांनी केले होते. मर्चंट आयव्हरी यांच्या १९६९ साली आलेल्या ‘द गुरु’ या चित्रपटात देखील तिने अभिनय केला होता. सत्यजित रे देखील लीला नायडू , मरलीन ब्रांडो आणि शशी कपूरला घेऊन ‘द जर्नी’ या इंग्रजी चित्रपटावर काम करत होते परंतु तो चित्रपट पूर्णत्वास गेला नाही. ‘डॉ. झिव्यागो’या चित्रपटात देखील लीला नायडूच्या नावाचा विचार केला गेला होता.
अतिशय देखणी असलेले खेळाडू वैयक्तिक आयुष्यात मात्र फारशी यशस्वी झाली नाही. वयाच्या सतराव्या वर्षी तिने तिलक राज ओबेरॉय या ओबेराय हॉटेलच्या मालकाच्या मुलाशी लग्न केले. त्यांना दोन मुली झाल्या. परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही. घटस्फोटा नंतर लीला नायडू जे
कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन ही विचारधारा घेऊन पुढे जाऊ लागल्या. १९६९ साली इंग्रजी कवी Dom Moraes यांच्याशी तिने लग्न केले परंतु हे लग्न देखील सफल होऊ शकले नाही. आयुष्यातील उत्तरार्ध तिने एकटीने कुलाबाच्या मोठ्या बंगल्यामध्ये काढला. बिदिषा रॉयदास आणि प्रियांजना दत्त यांनी ‘लीला’ नावाची एक सुंदर डॉक्युमेंटरी तिच्यावर बनवली आहे. २८ जुलै २००९ रोजी तिचे निधन झाले.