Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

सुपरस्टार राजेश खन्नाचा लेट लतीफपणा कुणी बंद केला?
सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा सेटवर कायम उशिरा येण्याचा लौकिक होता. खरंतर या त्यांच्या लेट येण्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान व्हायचे पण राजेश खन्नाची ती एक ‘स्टाईल’ होती. पण राजेशचे हे नखरे एका निर्मात्याने फार चांगल्या पद्धतीने बंद केले होते. त्यामुळे किमान त्या सिनेमासाठी राजेश खन्ना वेळेवर सेटवर पोहोचत होते! ही भन्नाट आयडिया चालून गेली. कोणत्या चित्रपटाच्या वेळी राजेश खन्नाचे सेटवर उशिरा येणे बंद झाले? आणि कुणी मोडली हि खोस? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.

सत्त्तरच्या दशकाच्या सुरुवातीला राजेश खन्ना (Rajesh Khanna) त्यावेळी एका साउथकडील चित्रपटात काम करत होता. चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक होते चिन्नप्पा देवर. चित्रपट होता ‘हाथी मेरे साथी’. दक्षिणात्य चित्रपट सुरुवातीपासूनच खूप डीसिप्लिन पद्धतीने बनला जातो. तिथे संपूर्ण शेड्युल आधीच ठरवले जाते. आणि त्या पद्धतीनेच चित्रीकरण होत जाते. सगळीकडे शिस्त असल्यामुळे प्रत्येकजण त्या पद्धतीनेच काम करत असतो.
पण राजेश खन्ना (Rajesh Khanna) सेटवर उशिरा पोहोचू लागल्यामुळे चित्रपटाचे शेड्युल बिघडू लागले. निर्माता दिग्दर्शक देवर त्यामुळे वैतागले. बर राजेश सिनेमाचा हिरो आणि बॉलीवूडचा सुपरस्टार असल्याने त्याला काही बोलता देखील येत नव्हते. त्यामुळे चिनप्पा देवर यांनी एक आयडिया केली. त्यांनी राजेश खन्ना (Rajesh Khanna) उशिरा सेटवर आला की त्याच्यासमोर सेटवरील लोकांना जोरजोरात झापायला सुरुवात केली. कधी ते कॅमेरामनला जोरजोरात झापत असत. ”किती चुका करता तुम्ही?” कॅमेरा उभ करण्याची जागा, फोकस करण्याची जागा, ट्रोली यावरून भरपूर आवाज चढून बोलत असत.

कधी कधी ते मेकअपमॅनला रागवत असत. “मेकअप कसा डार्क झाला आहे, तुला मेकअप करताच येत नाही!” अशा पद्धतीने ते जोरजोरात झापत असत. कधी प्रोडक्शनच्या लोकांशी कधी कॉस्च्युम डिझायनरशी त्यांचा जोरजोरात वाद होत असे. हे सर्व लोक निमूटपणे निर्माता दिग्दर्शकाचे ऐकून घेत असे. राजेश खन्ना (Rajesh Khanna) ला आश्चर्य वाटे की मी आल्यावरच यांचा पार असा का चढलेला असतो?
एकदा लंच टाईम मध्ये त्यांनी एका प्रोडक्शनच्या माणसाला याबद्दल विचारलं त्यावर तो म्हणाला ,” तुम्हाला खरं सांगू? तुम्ही सेटवर उशिरा येता याचा चिन्नप्पा देवर यांना राग आलेला असतो. पण तुम्ही मोठे स्टार. तुम्हाला तर ते काही बोलू शकत नाही. म्हणून तो राग ते छोट्या लोकांवर काढतात. करणी तुमची असते पण भरावे मात्र या छोट्या लोकांना लागते.” राजेश खन्नाला ते ऐकून खूप वाईट वाटले. आपल्या कृत्याचा त्रास इतर छोट्या लोकांना होतो हे त्यांना खूप क्लेशकरक वाटले.

त्यांनी ठरवले कमीत कमी या सिनेमाच्या सेटवर तरी आपण वेळेवर जायचं आणि चमत्कार झाला चार-पाच दिवसाच्या या झापाझापी प्रकरणानंतर राजेश खन्ना(Rajesh Khanna) इन टाईम सेटवर पोहोचू लागले. अशा पद्धतीने राजेश खन्नाचे लेट लतीफ सवय ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या वेळी पूर्णपणे थांबली . आणि चित्रपट वेळेत पूर्ण झाला. सुपरहिट देखील झाला. ‘लेकी बोले सुने लागे‘ हि भन्नाट आयडिया कामाला आली!
===========
हे देखील वाचा : ‘मुसाफिर हूं यारो…’ गाण्याच्या निर्मितीचा भावस्पर्शी किस्सा!
===========
आता थोडंस हाथी मेरे साथी या सिनेमा बद्दल : २८ मे १९७१ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सलीम – जावेद जोडीचा पहिला सिनेमा होता. त्यांच्या लेखणीची जादू याच सिनेमापासून सुरु झाली. हा सिनेमा १९७१ चा ब्लॉक बस्टर सिनेमा होता. संपूर्ण हिंदुस्तानात या सिनेमाला प्रचंड यश मिळाले. बच्चे कंपनी तर या सिनेमावर फिदा होतीच पण तरुणाईने देखील सिनेमाला मोठी गर्दी केली. एच एम व्ही च्या रेकॉर्डस मोठ्या संख्येने खपल्या. या सिनेमाला सिल्वर डिस्क मिळाली होती. राजेश खन्नाच्या सलग १७ सुपर हिट सिनेमाच्या साखळीतील हा महत्वपूर्ण सिनेमा होता. राजेश खन्ना, तनुजा, सुजित कुमार, मदनपुरी, के एन सिंग आणि ज्यू. मेहमूद यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. आनंद बक्षी यांनी गाणी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. यातील गाणी किशोर कुमार लता मंगेशकर यांनी गायली होती. फक्त एक गीत ‘’नफरत कि दुनिया को छोड कर प्यार कि दुनिया में खुश रहना मेरे यार ‘ हे एकमेव गाणे रफीने गायले होते.