Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

कौन बनेगा कर्ण?
बॉलिवूडमध्ये कुमार विश्वास
मैं तो झोंका हूं हवाओं का
उडा ले जाऊंगा
जागती रहना तुझे तुझसे
चुरा ले जाऊंगा…
या अशा कवितांनी लाखो चाहत्यांच्या मनात जागा करणारे प्रख्यात कवी कुमार विश्वास आता हिंदी चित्रपट सृष्टीत आगमन करणार आहेत. जैकी भगनानी आणि वासु भगनानी यांनी नुकतीच महारथी कर्णांच्या जीवनावर सूर्यपुत्र महावीर कर्ण या चित्रपटाची घोषणा केली आहे. पाच भाषांमध्ये तयार होणा-या या चित्रपटाचे बजेट बाहुबलीपेक्षाही जास्त असणार आहे. भव्यदिव्य सेट ही या चित्रपटाची ओळख असेल, आणि सेटप्रमाणेच त्याचे संवादही दर्जेदार असावेत म्हणून निर्मात्यांनी प्रसिद्ध कवी आणि लेखक कुमार विश्वास यांच्यावर संवाद लेखनाची जबाबदारी सोपवली आहे.
महाभारतामध्ये महारथी कर्ण हा प्रमुख योद्धा होता. दानशूर कर्णाच्या जीवनप्रवासाबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यामुळेच आत्तापर्यंत कर्णाच्या जीवनावर अनेक मालिका आल्या आहेत. मात्र यामुळे कर्णाबाबत असलेली उत्सुकता कमी झाली नाही. महाभारतावर काही चित्रपट आले. मात्र त्यात कर्णाचा पराक्रम दाखवण्याऐवजी त्याची आणि दुर्योधनाची मैत्री अधिक दाखवण्यात आली. त्यामुळेच कर्णाच्या जीवनातील अनेक पैलू असे आहेत की जे अद्याप समोर आलेले नाहीत.
हाच धागा पकडून सूर्यपुत्र महावीर कर्ण (Suryaputra Mahavir Karna) या चित्रपटाची घोषणा केल्याचे निर्मात्यांनी सांगितले. पूजा एंटरटेनमेंटच्या या चित्रपटात कर्णाच्या पराक्रमाची गाथा सांगण्यात येणार आहे. नुकताच चित्रपटाचा लोगो सोशल मिडीयावर सादर करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन आरएस विमल करीत आहेत. तर संवाद आणि अतिरिक्त स्क्रीनप्ले लिखाणाची जबाबदारी डॉ. कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांच्यावर देण्यात आली आहे. हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

कर्ण हा महाप्रतापी योद्धा होता. त्यामुळे सहाजीकच या चित्रपटात युद्धाचे प्रसंग आहेत. हे प्रसंग अधिक प्रभावी चित्रीत करण्यासाठी वीएफएक्स आणि स्पेशल इफेक्टस वापरण्यात आले आहेत.
स्वतः डॉ. कुमार विश्वास आपल्या या बॉलिवूडमधील एन्ट्रीबाबत उत्सुक आहेत. आत्तापर्यंत कर्णाची प्रमुख भूमिका कोण करणार हे नक्की झाले नाही. मात्र डॉ. कुमार यांनी आपल्या एका पोस्टसह रणवीर सिंह, अक्षय कुमार आणि विक्की कौशल यांचे फोटो शेअर करत कौन बनेगा कर्ण…हा प्रश्नच त्यांच्या चाहत्यांना विचारला आहे. या तिघांशिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम यांचं नावही कर्णाच्या भुमिकेसाठी घेतलं जात आहे. वासु भगनानी, दीपशिखा देशमुख आणि जैकी भगनानी यांनी सूर्यपुत्र महावीर कर्ण चित्रपासाठी 300 करोड बजेट ठेवलं आहे.
एसएस राजामौली यांच्या बाहुबलीला तुफान यश मिळालं. त्यानंतर पौराणिक कथांवर चित्रपट काढण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. ओम राउत यांनी आदिपुरुष या चित्रपटाची घोषणा केली. तर मधु मंटेना यांनी रामायणावर चित्रपट काढण्याची घोषणा केली. यात दिपिक पादुकोण सीता म्हणून दिसणार आहे. या लाटेत आमिर खानही कर्णाच्या जीवनावर चित्रपट काढण्याची तयारी करीत होता. पण त्याआधी वाशू भगनानी (Vashu Bhagnani) यांच्या पूजा एंटरटेनमेंटतर्फे सूर्यपुत्र महावीर कर्ण या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. त्यामुळेच या चित्रपटात कर्ण कोण होणार याकडे लक्ष लागले आहे.