Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Amruta Khanvilkar : “माझ्या घरी आलात तर आदर करणं…”; मराठी-हिंदी

Genelia Deshmukh : बॉलिवूडनंर साऊथमध्येही पुनरागमन; SS Rajamouli यांच्याशी झाली

Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली? 

Box Office Collection : बॉलिवूड चित्रपटांनी पहिल्याच सहामाहीत पार केला

संतोष जुवेकरच्या ‘त्या’ विधानावर Vicky Kaushal याची प्रतिक्रिया!

Kurla To Vengurla Marathi Movie: लग्न व्यवस्थेतील गुंतागुंतीचा वेध घेणारी हलकीफुलकी

Chala Hava Yeu Dya Season 2: ‘चला हवा येऊ द्या’

Avkarika Movie Trailer: पथनाट्याने  रंगला ‘अवकारीका’ चित्रपटाचा  ट्रेलर लाँच सोहळा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ashi Hi Banwa Banwi: ’70 रुपये वारले’ डायलॉग कोणी लिहिला? सचिन पिळगांवकरांचा मोठा खुलासा!

 Ashi Hi Banwa Banwi: ’70 रुपये वारले’ डायलॉग कोणी लिहिला? सचिन पिळगांवकरांचा मोठा खुलासा!
कलाकृती विशेष

Ashi Hi Banwa Banwi: ’70 रुपये वारले’ डायलॉग कोणी लिहिला? सचिन पिळगांवकरांचा मोठा खुलासा!

by Team KalakrutiMedia 24/06/2025

मराठी चित्रपटसृष्टीत आजवर अनेक गाजलेले चित्रपट आले, गेले, काही विस्मरणात गेले, काही आठवणीत राहिले, पण काही चित्रपट असे असतात जे काळावर मात करतात. ‘अशी ही बनवाबनवी’ हा त्याच पंक्तीतला एक चित्रपट. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर या त्रिकुटाने निर्माण केलेली ही धमाल विनोदी मेजवानी आजही तितक्याच जोमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. इतकी वर्षं उलटली, अनेक नवीन सिनेमे आले, ट्रेंड बदलले, पण ‘अशी ही बनवाबनवी’ची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. (Ashi Hi Banwa Banwi)

Ashi Hi Banwa Banwi

आजही जेव्हा हा सिनेमा टेलिव्हिजनवर लागतो, तेव्हा प्रेक्षक आपापली सगळी कामं बाजूला सारून तो पाहायला टीव्हीसमोर बसतात. संवाद, अभिनय, प्रसंग आणि प्रत्येक पात्राची रंगवलेली खास शैली हे सगळं इतकं प्रभावी आहे की, हा चित्रपट प्रत्येक वेळेस तितकाच हसवतो. अशा या अजरामर चित्रपटामागे केवळ उत्तम अभिनय नव्हे, तर तितकंच ताकदीचं लेखनही होतं आणि हे नुकतंच स्वतः सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

Ashi Hi Banwa Banwi

या मुलाखतीत बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले की, ‘अशी ही बनवाबनवी’ मधील बहुतांश संवाद त्यांनी स्वतः लिहिले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, “मोजून तीन डायलॉग सेटवर तयार झाले असतील, बाकी सगळे डायलॉग्स मी आणि वसंत सबनीस एकत्र बसून स्क्रिप्टमध्ये आधीच लिहिले होते.” म्हणजे प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ते अजरामर संवाद केवळ सेटवरील स्पॉण्टेनियस improvisation नव्हते, तर पूर्वनियोजित आणि अभ्यासपूर्वक लिहिले गेले होते.(Ashi Hi Banwa Banwi)

==============================

हे देखील वाचा: Tejashree Pradhan आणि Subodh Bhave झी मराठीच्या मालिकेत एकत्र झळकणार !

==============================

सचिन पिळगांवकर केवळ एक उत्तम अभिनेता नव्हे, तर एक संवेदनशील लेखकही आहेत, याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अभिनयासोबत लेखनातही आपली छाप सोडली आहे, आणि ‘अशी ही बनवाबनवी’सारखा चित्रपट त्याचं ठळक उदाहरण ठरतो. हा सिनेमा फक्त एक विनोदी अनुभव नसून, त्यामागे असलेलं विचारपूर्वक लेखन, कसदार अभिनय आणि चपखल दिग्दर्शन यांची एकत्रित ताकद आहे. त्यामुळेच आजही ‘अशी ही बनवाबनवी‘ ही फक्त एक चित्रपटाची नुसती आठवण राहिलेली नाही, तर ती एक संस्कृती, एक आनंददायी अनुभव, आणि मराठी सिनेमाचं एक जिवंत प्रतीक ठरले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ashi Hi Banwa Banwi ashok saraf ashwini bhave Entertainment Laxmikant Berde Marathi Movie Nayantara Nivedita Joshi Priya Arun sachin pilgaonkar Siddharth Ray supriya pilgaonkar Viju Khote
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.