Chhaava Box Office :’छावा’ची यशस्वी ओलांडला ३५० कोटींचा टप्पा

Dilwale Dulhania Le Jayenge मध्ये फाईट सीन टाकण्याची आयडीया कुणाची होती?
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक मोठा रेकॉर्ड केला आहे. २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज २०२५ सालात देखील मुंबईच्या मराठा मंदिर या थिएटरमध्ये चालू आहे. सलग गेली तीस वर्ष हा सिनेमा रसिकांच्या पसंतीला उतरला आहे. हा एक जागतिक विक्रम आहे. आजवर या सिनेमातील प्रत्येक एलिमेंटवर खूप काही लिहिलं आहे. तरी रसिकांना या सिनेमाबाबत कायम बोलावं वाटते. वाचावे वाटते इतकी मोहिनी या सिनेमाने प्रेक्षकांवर टाकली आहे. या सिनेमांमध्ये एक फ्रेशनेस होता. तरुणाईला खुश करणारी हटके लव्ह स्टोरी होती, सदाबहार संगीत होतं.

आदित्य चोप्रा यांचं पहिलंच दिग्दर्शन रसिकांच्या पसंतीला उतरले. शाहरुख खान, Kajol ही जोडी सुपरहिट झाली. या रोमँटिक चित्रपटामध्ये खरं तर फायटिंगचा एकही सीन नव्हता. म्हणजे सिनेमाची स्क्रिप्ट जेव्हा लिहिली गेली त्यावेळेला यात एकही फायटिंगचा सीन असणार नव्हता. यश चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखालीच हा चित्रपट बनत होता. रोमँटिक चित्रपटांमध्ये मारामारी नको असा त्यांचा आग्रह होता. असं असतानाही ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे…’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये भरपूर मारामारी दाखवली आहे. मग ती सिनेमात कशी आली? कुणामुळे आली? आणि मुख्य म्हणजे दिग्दर्शकाने ती मान्य कशी केली? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. संगीतकार जतीन ललित यांनी अलीकडे एका मुलाखतीत सांगितला आहे.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटांमध्ये खरंतर सुरुवातीला एकही फाइट सीन नव्हता पण अभिनेता शाहरुख खान याने सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये फाइट्स हवी असे सांगितले. निर्माता यश चोप्रा आणि दिग्दर्शक Aditya Chopra यांनी शाहरुखला हर प्रकारे समजावून सांगितले, ”ही एक संगीतमय प्रेमकहाणी आहे. इथे मारामारीला जागा नाही. नो व्हायलन्स. नो ब्लड.” पण शाहरुख म्हणाला, ”आपण शूट करूयात. जर कोणालाच आवडले नाही तर आपण डिलीट करू आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीने पुन्हा रिशूट करू. पण फाईट सीन घ्यायलाच पाहिजे!” आता हिरो म्हणतोय म्हटल्यानंतर आदित्य चोप्राच नाईलाज झाला.

यश चोप्रा थोडेसे नाराज देखील झाले. पण मग शाहरुखच्या म्हणण्यानुसार फाईट सिक्वेन्स लिहिला गेला आणि तसा शूट देखील झाला. पनवेल जवळच्या आपटा या रेल्वे स्टेशनवर हा फाईट सीन शूट झाला. चित्रपटाचे संगीतकार Jatin-Lalit यांना या फाईट सीनच्या पार्श्वभूमीवर बॅकग्राऊंड म्युझिक करायला सांगितलं. त्यांनी फाईट सीनला साजेस म्युझिक तयार केलं. पण दिग्दर्शक आदित्य चोप्रा म्हणाले की, ”आपण ‘मेहंदी लगाके रखना’ या गाण्याचेच ऑर्केस्ट्रेशन आणि कोरस हेच बॅकग्राऊंडला वापरू.” पुन्हा सर्वांची मतमतांतरे झाली. वाद झाले. (bollywood tadka)
फाइट सीन गाण्याचं बॅकग्राऊंड म्युझिक कसं काय? पण आदित्य चोप्राचा तो आग्रह होता. त्याच्या मते हा रोमँटिक सिनेमा होता आणि फाईट सीनमध्ये देखील जर आपण चित्रपटातील रोमँटिक गाण्याचे ऑर्केस्टेशन वापरले तर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. ते कथानकाला जास्त कोरिलेट होईल. जतिन ललित यांनी त्या पद्धतीने संगीत तयार केला आणि क्रीसेंडो पद्धतीने म्युझिक आणि कोरस वाढवत वाढवत वर नेला. (Dilwale Dulhania Le Jayenge)
===========
हे देखील वाचा : danny denzongpa : डॅनीला हा आयकॉनिक रोल कसा मिळाला?
===========
थिएटरमध्ये हा प्रकार खूप आवडला आणि पब्लिकने जोरदार टाळ्या वाजवल्या. फाईट सीन चालू असताना गाण्याचे बॅकग्राऊंड ऑर्केस्टेशन हा सर्व टोटली नवीन प्रकार असला तरी लोकप्रिय झाला! एक्केचाळीसाव्या फिल्मफेअर अवार्ड सोहळ्यात डीडीएलजे (Dilwale Dulhania Le Jayenge) या सिनेमाला तब्बल १४ नामांकने मिळाली पैकी सर्वोत्कृष्ट अभिनेता (शाहरुख खान), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (आदित्य चोप्रा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (काजोल) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (उदित नारायण- मेहंदी लगाके रखना) सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री (फरीदा जलाल), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता (अनुपम खेर), सर्वोत्कृष्ट चित्रपट (यश चोप्रा), सर्वोत्कृष्ट गीतकार( आंनद बक्षी-तुझे देखा तो ये जाना सनम), सर्वोत्कृष्ट पटकथा (आदित्य चोप्रा), सर्वोत्कृष्ट संवाद (आदित्य चोप्रा,जावेद सिद्दिक्की) ही पारितोषिके मिळाली.