Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Marathi Movies : थिएटर गाजवल्यानंतर ‘हे’ मराठी चित्रपट ओटीटीवर रिलीज

Khushboo Movie : बेचारा दिल क्या करे…!

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!

 Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
कलाकृती विशेष

Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!

by रसिका शिंदे-पॉल 05/03/2025

मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स हे किताब सौंदर्याच्या जगात फारच मानाचे समजले जातात. १९९४ मध्ये ऐश्वर्या राय हिने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकल्यानंतर २००० साली एक नव्हे तर चक्क तीन Beauty Pagent पुरस्कार भारताने जिंकले होते. आणि आजवरच्या सौंदर्य जगतातील इतिहासात एकाच वर्षात भारताला तीन पुरस्कार कधीच मिळाले नव्हते. Priyanka Chopra, लारा दत्ता आणि दिया मिर्झा यांनी आपल्या सौंदर्य, तल्लख बुद्धी या दोहोंच्या जोरावर भारताचे नाव जागतिक पातळीवर उंचावले होते. जाणून घेऊयात Miss World, Miss Universe च्या इतिहासात भारताच्या अचिव्हमेंट्स काय होत्या? 

२००० मध्ये प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने मिस वर्ल्ड, लारा दत्ता हिने मिस युनिवर्स आणि दिला मिर्झाने मिस एशिया पॅसेफिक हे किताब भारताचे प्रतिनिधित्व करत जिंकले होते. एका मुलाखतीत दिया मिर्झा हिने त्या स्पर्धेच्या काही आठवणी सांगितल्या. दिया म्हणाली की, “२००० हे वर्ष माझ्यासह प्रियांका आणि लारासाठी देखील खुप खास होतं. आम्ही तिघींनी एकाच वर्षात विविध स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत किताब जिंकले होते. त्या स्पर्धेच्या तयारीसाठी आम्ही तिघी एकत्र असायचो. खरं तर लारा आणि माझ्यापेक्षा प्रियांका फारच आत्मविश्वासू आणि महत्वाकांक्षी होती. बरेली सारख्या एका लहानशा भागातून आलेली प्रियांका केवळ मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच आली होती”. (Miss World, Miss Universe)

भारतासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या आम्ही तिघी जरी एकत्र असलो तरी माझी आणि लाराची त्या काळात घट्ट मैत्री झाली. मिस युनिवर्स, मिस एशिया पॅसेफिक या स्पर्धेनंतर बराच काळ मी आणि लारा एकाच माचिसच्या आकाराच्या लहानशा खोलीत एकत्र राहात होतो. मॉडलिंग, अभिनय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून जरी आम्ही आलो असलो तरी त्या परदेशात एक भारतीय म्हणून आमचाच एकमेकींना सपोर्ट होता आणि तो आजही कायम असल्याचं दिया म्हणाली. (Entertainment gossip)

२००० सालच्या मिस वर्ल्डची आणखी एक खासियत म्हणजे त्या वर्षी सर्वाधिक म्हणजे ९५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. आणि प्रियांका चोप्रा भारताची पाचवी आणि जगातील दुसरी भारतीय स्पर्धक ठरली होती जिने लागोपाठ भारतासाठी मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता. तर, मिस युनिवसर्स या स्पर्धेच्या इतिहासात लारा दत्ता अशी पहिली स्पर्धक होती जिने फायनल इंटरव्ह्यू राऊंडमध्ये ९.९९ असा स्कोअर केला होता. (Untold stories)

दिया मिर्झा हिने २००० मध्ये मिस एशिया पॅसिफीक जिंकल्यानंतर २००१ मध्ये आर.माधवन सोबत ‘रहना है तेरे दिल मे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच फटक्यात सुपरहिट चित्रपट दिला. तर Priyanka Chopra हिने मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर २००३ मध्ये ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शिवाय, मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्स असणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि लारा दत्ता यांनी २००३ मध्येच अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’ हा चित्रपट केला होता.

============

हे देखील वाचा : Madhuri Dixit-Nene : सुपरस्टार असूनही माधुरीला का मिळायचा आईचा ओरडा?

============

सध्या दिया मिर्झा आणि लारा दत्ता दोघीही चित्रपटसृष्टीपासून लांब असून प्रियांका चोप्रा हॉलिवूड गाजवत आहे. लवकरच Priyanka Chopra राजामौली यांच्या एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असं सांगितलं जात असून हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बिग बजेट चित्रपट असणार आहे. (Bollywood Upcoming Movies)

रसिका शिंदे-पॉल

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity celebrity untold stories entertainemnt entertainment update indiaaishwerya rai lara dutta miss Asia pasific miss universe miss world Priyanka Chopra
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.