Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Asambhav Movie Poster: प्रेम की सुड? रहस्यांनी भरलेला ‘असंभव’च्या पोस्टर्सने

Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

‘महाभारत’ मालिकेतील कर्ण काळाच्या पडद्याआड; अभिनेते Pankaj Dheer यांचा कॅन्सरने

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।; Abhanga Tukaram

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अमिताभच्या ‘या’ हिरोईनचा का झाला असा दर्दनाक अंत ?

 अमिताभच्या ‘या’ हिरोईनचा का झाला असा दर्दनाक अंत ?
बात पुरानी बडी सुहानी

अमिताभच्या ‘या’ हिरोईनचा का झाला असा दर्दनाक अंत ?

by धनंजय कुलकर्णी 02/11/2023

हिंदी सिनेमाच्या नायकांपैकी काही नायिकांचे अनैसर्गिक निधन मनाला चटका लावून जाते. अभिनेत्री विम्मी जिने ‘हमराज’ (१९६७)  सारख्या चित्रपटातून रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते, तिचा मृत्यू तर अतिशय वाईट अवस्थेत झाला. अगदी भाजीच्या गाड्यावर तिचा मृतदेह पोलिसांनी ‘लावारिस’ म्हणून घेऊन गेले आणि तिच्यावर अंत्य संस्कार केले ! त्याचप्रमाणे अभिनेत्री प्रिया राजवंश हिचा मृत्यू असाच क्लेशदायक होता. तिचा  तर खून झाला होता ! अनेक सिने कलाकारांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवून टाकले. चंदेरी दुनियेतील चकाचक झगमगटात काही कलाकारांच्या मनात किती खोलवर अंधार झिरपलेला असतो हे आपल्याला त्यातून कळते. अभिनेत्री परवीन बाबी हिचा मृत्यू देखील असाच भयंकर दर्दनाक आणि मनाला वेदना देणारा होता. परवीन  बाबी हिचा जन्म ४ एप्रिल १९५४ रोजी एका सुखवस्तू मुस्लीम कुटुंबात जुनागड गुजरात  येथे झाला. तिने इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली होती. सुरुवातीला मॉडेलिंग केल्यानंतर बी आर इशारा यांनी तिला ‘चरित्र’ या चित्रपटात सुरुवातीला साईन  केले. या चित्रपटात तिचा नायक आघाडीचा क्रिकेटपटू सलीम दुर्रानी होता. चित्रपट चालला नाही पण परवीन बाबीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्या काळात सर्वच अभिनेत्री या अंगभर साडी घालून पडद्यावर वावरत असत त्या काळात परवीन बाबी वेस्टर्न ऑऊट फिट कपडे घालून पडद्यावर दाखल झाली. तिच्या सेक्सी ग्लॅमरस इमेजमुळे बहुतेकांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिचा पहिला गाजलेला चित्रपट होता अमिताभ बच्चन सोबतचा ‘मजबूर’. (Amitabh)

यानंतर तिने सत्तरच्या दशकाच्या सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले. त्या काळातील ते टॉपची अभिनेत्री होती. टाईम या मासिकाच्या मुखपृष्ठावर ती १९७६ साली झळकली. अमिताभ बच्चन सोबत तर तिने तब्बल अकरा सिनेमे केले होते यापैकी आठ सिनेमात ती त्याची नायिका होती. परवीन बाबी आणि झीनत अमान त्या काळातील हॉट सेन्सेशन होत्या. अमिताभ, विनोद खन्ना, धर्मेंद्र, शशी कपूर, फिरोझ खान, संजय खान या सर्व आघाडीच्या अभिनेत्यांसोबत पडद्यावर झळकली. सत्तरच्या दशकातील ती टॉपची अभिनेत्री होती. हिंदी सिनेमातील नायिकांची टिपिकल ‘गाव की गोरी’ किंवा ‘लेहेंगा चोली’ वाली इमेज तिने साफ बदलून टाकली. या काळात तिच्या अफेयर्सची चर्चा देखील कायम गरम राहिली. सुरुवातीला ती डॅनी सोबत रिलेशनमध्ये होती. मग तिच्या जीवनात कबीर बेदी आला आणि नंतर महेश भट. महेश बाबत ती बऱ्यापैकी सिरीयस होती पण या ब्रेकअप नंतर ती पुरती कोसळली. ड्रिंकचे प्रमाण अतोनात वाढले. (Amitabh)

परवीन बाबीच्या मनात काय चालू होतं ते कोणालाच ठाऊक नव्हतं. आपले करिअर पीकवर असतानाच १९८४ साली ती अचानकपणे अमेरिकेला निघून गेली. ७ एप्रिल १९८४ ला तिला अमेरिकन पोलिसांनी जॉन एफ केनेडी विमानतळावर ताब्यात घेतले. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने पोलिसांनी तिला कारावासात पाठवले. पण भारतीय वकीलात आणि तिचे आध्यात्मिक गुरु जे कृष्णमूर्ती यांनी मध्यस्थी केल्यावर ती बाहेर आली. कृष्णमूर्ती यांना तिथे जाऊन ती भेटली. या काळात तिने तिचे आत्मचरित्र देखील लिहिले होते असे सांगितले गेले परंतु ते काही प्रसिद्ध झाले नाही. (Amitabh)

तिकडे काही वर्ष काढल्यानंतर १९९० च्या सुमारास परवीन बाबी पुन्हा भारतात आली. पण आता सर्वच बदलले होते. परवीन बाबी ओळखू न येणार येऊ नये इतपत जाड झाली होती. तिची मानसिक अवस्था देखील चांगली नव्हती. ती स्क्रीझोफ्रेनिया या मानसिक आजाराने जास्त होती. या काळात ती, मीडियाला इंटरव्ह्यू देताना काहीही बरळत होती. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, प्रिन्स चार्ल्स त्याचप्रमाणे सी आय ए, केजीबी, सीबीआय, भारत सरकार, अमेरिका सरकार, इंग्लंडचे सरकार सर्वजण तिला मारून टाकण्यासाठी टपले आहेत असे ती सांगू लागली. हे सर्वजण माझा कधीही मर्डर करू शकतात त्यामुळे मी घराच्या बाहेर पडत नाही असेही सांगू लागली. तिची मानसिक अवस्था पूर्णतः बिघडली होती. ती एकाकी पडली होती.

===========

हे देखील वाचा : ऐंशीच्या दशकातला ‘हा’ अभिनेता आहे अमेरिकेतील मनोरुग्णालयात

===========

जुहूच्या फ्लॅटमध्ये ती एकटी राहत होती. २० जानेवारी २००५ या दिवशी तिच्या सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना फोन करून सांगितले की, परवीन बाबीच्या घरासमोरील पेपर आणि दुधाच्या पिशव्या मागच्या तीन दिवसापासून तशाच पडलेल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिचा फ्लॅट उघडला तेव्हा परवीन बाबी तिथे मृतावस्थेत पडली होती. तिच्या डाव्या पायाला गँगरीन झाले होते. बऱ्याच वर्षापासून ती मधुमेहाने आजारी होती. ऑटोप्सी रिपोर्टमध्ये तिने मागच्या ७२ तासापासून काहीही खाल्ले नाही आणि यामुळेच तिचा मृत्यू झाला असे निदान करण्यात आले. परवीन बाबी अशा पद्धतीने एकाकी मृत्यू पडावी हे मनाला पटत नाही. परवीनचा असा दर्दनाक, एकाकी मृत्यू बॉलीवूडची काळी बाजू समोर आणणारा आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.