Rajkumar Rao-Patralekha यांनी लेकीचं ठेवलंय ‘हे’ नाव, हिंदू संस्कृतीशी नावाचं

“Dilip Kumar यांनी पाकिस्तानातच राहाला जावं”; बाळासाहेब असं का म्हणाले होते?
बॉलिवूडमध्ये ज्यांची ओळख ‘ट्रॅजेडी किंग’ अशी होते ते म्हणजे दिलीप कूमार (Dilip Kumar). हिंदी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम अशा दिलीप साहाब यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले. भारतात आपलं फिल्मी करिअर सुरु असूनही पाकिस्तानातही त्यांचा भल्ला मोठा फॅनबेस होता. पाकिस्तानातच जन्म झाल्यामुळे त्यांना १९९९ साली जेव्हा कारगिलमध्ये भारत-पाकिस्तानात युद्ध झालं होतं तेव्हा दोन्ही देशांमध्ये शांतता व्हावी यासाठी दिलीप कुमार यांनी आटोकाट प्रयत्न केले होते. दिलीप कुमार यांचं पाकिस्तानाशी असलेलं एक खास नातं पाहून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) प्रचंड संतापले होते आणि त्यांनी चक्क दिलीप साहाब यांनी पाकिस्तानातच राहावं असं म्हटलं होतं. नेमका काय किस्सा होता? जाणून घेऊयात. (Bollywood and Politics)
तर, २०१५ मध्ये जेव्हा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी भारत दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी कारगिल युद्धावेळी घडलेली ही घटना सांगितली… तर झालं असं होतं की, त्यावेळी तत्कालीन भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिल परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नवाज शरीफ यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतही बोलणं केलं होतं. (India-Pak War)

वाजपेयींसोबतच्या संभाषणादरम्यान शरीफ यांनी असा दावा केला होता की, त्यांना कारगिल परिस्थितीची काहीच माहिती नव्हती. फोन ठेवण्यापूर्वी, वाजपेयींनी शरीफ यांना त्यांच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीशी बोलण्यास सांगितलं आणि दिलीप कुमार त्यांच्या या संभाषणात जोडले गेले. दिलीप कुमार म्हणाले, ‘साहेब, आम्हाला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, कारण तुम्ही नेहमीच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील शांततेचं समर्थक असल्याचा दावा केला आहे.’
दिलीप कुमार पुढे असं देखील म्हणाले की, ‘एक भारतीय मुस्लिम म्हणून, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत, भारतीय मुस्लिमांना खूप असुरक्षित वाटतं आणि त्यांना त्यांचं घर सोडणं देखील कठीण होतं. कृपया ही परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी काहीतरी करा.’ हे संभाषण तिथे संपलं. पण त्यानंतर असं म्हटलं जातं की, या फोननंतर परिस्थिती काही दिवस स्थिरावली, परंतु नंतर पुन्हा बिघडली आणि पुढचे तीन महिने फक्त युद्धच सुरु राहिलं. (Dilip Kumar and Pakistan)
बरं, युद्धाआधी म्हणजे १९९८ मध्ये दिलीप कुमार पाकिस्तानला गेले असता त्यांना पाकिस्तान सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, निशान-ए-इम्तियाज देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली. पण, या घोषणेमुळे भारतात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही विरोध केला होता. त्यावेळी, बाळासाहेब पाकिस्तानी लोकांचा विरोध करत होते आणि दिलीप कुमार यांच्याशी त्यांचे संबंध फारच बिघडले.
================================
हे देखील वाचा : मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री Durga Khote!
================================
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या रिपोर्टनुसार वैभव पुरंदरे यांनी त्यांच्या ‘बाळ ठाकरे अँड द राईज ऑफ शिवसेना’ या पुस्तकात ठाकरे यांचं दिलीप कुमार यांच्याबद्दल काय म्हणणं होतं ते लिहिलं आहे. त्यांनी असं लिहिलं होतं की, ‘आता चणेसुद्धा आहेत आणि बियरसुद्धा आहे, पण दिलीप कुमारचा मार्ग बदलला आहे. त्यामुळे दिलीप कुमार यांनी भारत सोडून पाकिस्तानात राहावं. यावर दिलीप कुमार यांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, ‘शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी मला पुरस्कार परत करायला सांगितला आणि जर मी तसं केलं नाही तर मी हा देश सोडून पाकिस्तानात परत जावं आणि तिथेच राहावं असं सांगितलं. मला वाटतं की, हे एका जबाबदार व्यक्तीचं घृणास्पद विधान आहे. ते दुखावणारं आहे.’ तर, इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, ‘इथे ६५ वर्षे राहिल्यानंतर, मला ठाकरेंवरील माझी निष्ठा सिद्ध करावी लागेल.’
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi