
Bharat Jadhav : “आपल्या वयाला आता ठराविक भूमिका शोभणार नाही हे मान्य करावं!”
नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव सध्या फारसे चित्रपटांमध्ये रमताना दिसत नाहीत. गेल्या काही काळात ते नाटकांमध्ये काम करताना दिसतात पण मालिका आणि चित्रपटांपासून ते फारच लांब गेले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी २०१७ पासून फारसे चित्रपट का केले नाहीत त्याचं कारण अखेर सांगितलं आहे. (Bharat Jadhav)
भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या कॅचअप या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी भरत जाधव म्हणाले, “काही चित्रपट करताना मला त्याच त्याच प्रकारच्या भूमिका यायला लागल्या. त्यामुळे २०१६-१७ पासून मी थांबलो होतो. दरम्यानच्या काळात मी ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट केला. कारण- मी मैत्री खूप जपतो. अगदी प्रामाणिकपणे सांगतो की, काही दिग्दर्शक होते, त्यांच्याकडे असिस्ट करणारी मुलं असायची. ती मला म्हणायची की, एक चित्रपट आमच्यासाठी करा. तेव्हाचं सांगतोय; आत्ताचं म्हणत नाही. मी त्यावेळी विचार करायचो की, आता यांचं करिअर चालू होतंय, आपल्यामुळे राडा नको. एक चित्रपट करूयात. तर मी असेही चित्रपट केले आहेत. (Film industry news)

पुढे भरत जाधव म्हणाले की, “चित्रपटात काम करणं चूक नाहीये. चित्रपटात काम करत होतो. कारण- तो माझा व्यवसाय आहे. एकांकिका स्पर्धेतून नाटकात आलो. नाटकातून चित्रपटात आलो. नाटकांचे शो चालू ठेवणं हेही गरजेचं आहे. एका पॉइन्टला मला समजलं की, त्याच त्याच रोलसाठी विचारणा होतेय. मग विचार केला की, सांभाळून सांभाळून करूयात. मोजकेच चित्रपट करूयात. त्यातील लंडन मिसळ हा जरा वेगळा होता. त्यात हीरोची भूमिका नव्हती; वेगळी होती. दोन मुलींची गोष्ट होती. म्हणून मी तो चित्रपट केला. त्या काळात मी एखाद-दुसरा चित्रपट केला असेल. पूर्वी मी लागोपाठ चित्रपट करत होतो. त्यावेळी कामाची फार गरज असल्यामुळेही काम सुरुच होतं. मग आता थांबून जरा कोणती भूमिका चांगली आली किंवा मला वाटली. तसेच मी जर एखादी भूमिका याआधी साकारली नसेल, तर ती करायला हरकत नाही. आता स्वत:ला ट्राय आऊट करून बघायला हरकत नाही”. (Entertainment tadaka)

नाटकांबद्दल बोलताना ते म्हणाले की, “नाटक मी सातत्यानं करत आहे. मी कुठे थांबलो नाही. इतकी वर्षं मी नाटक करतोय. नाटकातूनच मी चित्रपटात आलो होतो. चित्रपट बेकार आहेत किंवा मी दुय्यम स्थान देतोय, असं माझं अजिबात म्हणणं नाही. उलट चित्रपटांनी माझं घर आणि बऱ्याच गोष्टी उभ्या राहिल्या. रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. काही चांगले चित्रपट ज्याबद्दल मलाही माहीत नव्हतं की, हा चित्रपट लोकांना आवडेल, तो लोकांना आवडेल. ‘झिंग चिक झिंक’सारखा छान चित्रपट मिळाला होता. असं नाही की, मला वाईट चित्रपट मिळाले. चांगले चित्रपट मिळाले. लोकांनीही कौतुक केलं. पण, काही काळानंतर कळतं की जरासं हळू खेळूयात. तुम्हाला शिफ्ट होता आलं पाहिजे. आता माझ्या वयाला अमुक ही भूमिका नाहीये, हे स्वत: मान्य केलं पाहिजे. आमच्यात काही लोक ते मान्य करीत नाहीत किंवा दिग्दर्शक म्हणतात की, तू करू शकतोस. समोरचा किती सांगत असेल तरी आता त्या भूमिका करण्यात काही अर्थ नाही.” (Bharat Jadhav legend actor)
===============================
हे देखील वाचा: Suraj Chavan : भरत जाधव आणि सूरज चव्हाण यांची ग्रेट भेट
===============================
भरत जाधव यांनी आत्तापर्यंत ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘दे धक्का’, ‘साडे माडे तीन’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘वन रूम किचन’, ‘खो-खो’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘जत्रा’, ‘येड्याची जत्रा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘माझी बायको तुझा नवरा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘गोंद्या मारतंय तंगडं’, ‘उरूस’, ‘गलगले निघाले’, ‘बाबा लगीन’, ‘पछाडलेला’, ‘जत्रा’ अशा चित्रपटांमध्ये तर हसा चकट फू या मालिकेतून खळखळू हसवलं आहे. लवकरच पुन्हा एकदा साडे माडे तीन या चित्रपटात ते अशोक सराफ (Ashok saraf) आणि मकरंद अनासपुरे यांच्यासोबत दिसणार आहेत. (Bharat Jadhav movies)