‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अभिनेता इरफान खान रात्रभर कां रडत राहिला?
आपल्या सहज सुंदर नैसर्गिक अभिनयातून रसिकांच्या दिलात स्थान निर्माण करणारे अनेक अभिनेते होऊन गेले. या अभिनेत्यांनी स्वस्त, सवंग लोकप्रियता मिळवली नाही. पण क्लास ऑडियन्ससाठी ते कायम हिरो राहिले. पूर्वीच्या काळी मोतीलाल, बलराज सहानी त्यानंतर संजीव कुमार हे या कॅटेगिरीतील कलावंत होते. या तिघांच्याही अभिनयाचा वारसा सांगणारा आणखी एक कलाकार बॉलीवूडमध्ये आला होता. तो होता इरफान खान (Irrfan Khan).
त्यांनी केवळ बॉलीवूड नाही तर हॉलीवूडमधील काही चित्रपटात देखील भूमिका केल्या होत्या. कोणत्याही भूमिकेमध्ये सहजगत्या शिरणं म्हणजे काय असतं हे त्याने वारंवार सिद्ध देखील केलं. आपल्या रसिकांचे दुर्दैव असं की या गुणी अभिनेत्याला या दुनियेतून अकाली एक्झिट घ्यावी लागली. इरफान खान यांचा संघर्ष देखील खूप मोठा होता. त्यांना ज्या पहिल्याच चित्रपटांमध्ये घेतलं गेलं होतं तेव्हा ते खूप आनंदी झाले होते. परंतु नंतर त्यांना या चित्रपटातून काढून टाकण्यात आले! त्यामुळे तो रात्रभर अक्षरशः रडत राहिला होता. हाता तोंडाशी आलेली मोठी संधी पाहता पाहता हातातून निसटून गेली होती. त्यावेळी इरफान खान (Irrfan Khan) यांचे वय २१ वर्ष होतं. कोणती होती भूमिका? आणि का त्यांच्या हातातून ही भूमिका निसटली?
इरफान खान (Irrfan Khan) यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाची पदवी मिळवली होती. ते एन एस डीत शिकत असताना तिथे ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आल्या होत्या. त्यावेळी त्या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे कास्टिंग फायनल करत होत्या. चित्रपट होता ‘सलाम बॉम्बे’. या चित्रपटात त्यांनी अक्षरशः फुटपाथवरून काही मुलांना घेतले होते. या चित्रपटातील सलीम नावाच्या कॅरेक्टर साठी त्यांनी इरफान खानला साईन केले.
इरफान खान (Irrfan Khan) अर्थातच खूप आनंदी झाला. चित्रपटाची शूटिंगसाठी त्याला मुंबईला बोलवण्यात आले. त्यावेळी सुरुवातीला मीरा नायरने हॉलीवुड स्टाईल चित्रपट बनवायचे ठरवले. तिने चित्रपटातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांना एकत्र बोलून एक तीन दिवसाचे वर्कशॉप घेतले. यामध्ये चित्रपटाच्या प्रत्येक अँगलचा तिने सखोल जो विचार केला होता तो तिथे मांडला. प्रत्येक कलाकारला त्याच्या हातात प्रिंटेड स्क्रिप्ट देण्यात आली. त्यामध्ये त्याची भूमिका आणि त्याचे डायलॉग याची विस्तृत माहिती होती. प्रत्येक कलाकाराने त्या भूमिकेमध्ये पूर्णतः शिरायला पाहिजे हा या मागचा हेतू होता.
इरफान खान (Irrfan Khan) याने ते वर्कशॉप अटेंड केले. चित्रपटाचा शूटिंगचा पहिला दिवस उजाडला. इरफान मोठ्या आनंदात होता पण लवकरच त्याच्या आनंदावर विरजण पडले. कारण इरफान खान ज्या ‘सलीम’ नावाच्या कॅरॅक्टरसाठी सिलेक्ट केला होता; त्या सलीमपेक्षा तो खूप मोठा वाटत होता. इरफानची उंची तब्बल सहा फूट होती. त्याच्या मानाने इतर मुले खूपच छोटी वाटत होती. हे कुठेतरी मिस मॅच होत होतं. चित्रपटाचे अमेरिकन छायाचित्रकार सँडी सिसेल यांनी ही चूक मीरा नायर यांच्या लक्षात आणून दिली. सर्वांनी पुन्हा एकदा मीटिंग घेऊन इरफान खान जो सहा फूट एक इंच उंचीचा आहे या चित्रपटात चालणार नाही असा निर्णय घेतला.
सर्वांनी जड अंतकरणाने इरफान खानला निरोप दिला ! इरफान खान खूप नाराज झाला. रात्रभर तो रडत राहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो मीरा नायरला भेटला. मीरा नायरने त्याला सांगितले की, ”या प्रोजेक्टमध्ये आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही पण माझ्या आगामी प्रोजेक्टमध्ये मी नक्कीच तुझा विचार करेल.”
========
हे देखील वाचा : ‘या’ अभिनेत्याने साकारली होती रेपिस्ट ‘बलात्कारी’ भूमिका!
========
या चित्रपटात इरफानला अक्षरशः एक मिनिटाची भूमिका देण्यात आली . ज्यामध्ये पोस्ट ऑफिस बाहेर बसणाऱ्या एका लेखनीकाचा तो रोल होता. आज हा चित्रपट आपण पाहतो त्यावेळेला इरफान खान आपण सहज ओळखतो. नंतर इरफान पुढची दहा वर्षे बॉलीवूडमध्ये संघर्ष करत होता. मीरा नायर यांनी २००६ साली इरफानला घेऊन ‘नेम सेक’ हा चित्रपट बनवला. पण ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातील भूमिका आपल्या हातातून गेल्याचे दु:ख इरफान खानला (Irrfan Khan) शेवटपर्यंत होत होते.