अभिनेत्री रेखाने नववीत असतानाच का शाळा सोडली?
अभिनेत्री रेखा (Rekha) हिचं बालपण फारसं सुखकारक नव्हतं. याचे कारण तिचे जन्मदाते वडील तिच्यासोबत राहत नव्हते. भानुरेखा गणेशन हे तिचं पाळण्यातील नाव. ती त्या काळात आपल्या आईसोबत राहत असे. रेखाची आई पुष्पवल्ली तामिळ चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री होती. तिचे वडील जेमिनी गणेशन तर पन्नासच्या दशकात तमिळ चित्रपटातले सुपरस्टार होते. जमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांनी काही चित्रपटातून एकत्र भूमिका केल्या होत्या. या काळातच दोघांमध्ये प्रेम जुळले. जेमिनी गणेशन ऑलरेडी मॅरीड पर्सन होते. त्यामुळे त्यांनी पुष्पवल्लीसोबत केवळ प्रेम संबंध ठेवणे पसंद केले. पण या संबंधातूनच रेखाचा जन्म झाला आणि तिथूनच तिच्या कष्टप्रद आयुष्याचा प्रारंभ झाला.
जेमिनी गणेशन रेस कोर्सचे मोठे शौकीन होते. त्यांच्यासोबत पुष्पवल्ली यांना देखील रेस कोर्समध्ये पैसे लावायची सवय लागली होती. हळूहळू ही सवय व्यसन बनत गेली. त्यामुळे घरात आलेला सर्व पैसा रेस कोर्सच्या मार्गे बाहेर जात होता. रेखा (Rekha) शाळेत असताना तिला तिच्या मित्र-मैत्रिणींकडून कायम टोमणे उपहास ऐकून घ्यावा लागत असे. कारण जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांच्या प्रेम संबंधांची चर्चा त्या काळात खूप होत असे. त्यामुळे रेखाला शालेय जीवन नकोसं वाटत असे. लोकांच्या त्या नजरा कुत्सित हसणं तिला आवडत नसे. रेखा चौदा वर्षाची झाल्यानंतर ती नववीच्या परीक्षेमध्ये चक्क नापास झाली.
रेखाची आई पुष्पवल्ली हीचे देखील सिनेमातील काम कमी झाले होते. रेखा आता चौदा वर्षाची झाली होती. तिच्या आईच्या दृष्टीने आणखी एक इन्कम सोर्स क्रियेट होऊ शकत होत. नाही तरी तिला अभ्यासात फारशी गोडी नव्हतीच म्हणून त्यांनी तिला सिनेमात काम करायला तयार केले. अशा पद्धतीने रेखाचा सिनेमाच्या क्षेत्रात प्रवेश झाला.
रेखाला शालेय जीवनामध्ये अभ्यास करायचा कंटाळा येत असायचा. पण हिंदी सिनेमात आल्यानंतर मात्र तिला पुन्हा एकदा चक्क शिकवणी लावून अभ्यास करावा लागला तो हिंदी इंग्रजी या भाषा शिकण्याचा. कारण रेखा (Rekha) जेव्हा हिंदी सिनेमात आली तेव्हा तिचे हिंदी उच्चार सदोष होते ते काढण्यासाठी तिने प्रॉपर ट्युशन घेतली आणि आपले उच्चार सुधारले. रेखा हिंदी उर्दू आणि नंतर इंग्रजी देखील सफाईपणे बोलू लागली!
टीव्हीवरील सिम्मी गरेवालच्या कार्यक्रमात तिने असे सांगितले की, ”माझे सावत्र बहिण, भाऊ त्याच शाळेत होते जिथे मी शिक्षण घेत होते. त्या सर्वांना कारमधून सोडायला माझे वडील येत असत. परंतु त्यांनी त्यावेळी माझ्याकडे कधीही ढुंकून देखील नाही पाहिले नाही. त्यामुळे शालेय जीवनाच्या कटू आठवणीच माझ्याकडे जास्त आहेत !”
जेमिनी गणेशन यांच्या बद्दल बोलताना रेखा म्हणाली, ”पडद्यावरील त्यांचा अभिनय मला खूप आवडत असे. एक हँडसम आणि टॅलेंटेड ॲक्टर होते पण वास्तविक जीवनातील त्यांनी माझ्यावर आणि माझ्या आईवर सातत्याने अन्याय केला. मी शालेय जीवनात कधी रमलेच नाही. कारण शिक्षकांचे मित्र-मैत्रिणींच्या टोमणे मला सतत ऐकावे लागत. जेमिनी गनेशन तेव्हा तमिळ सिनेमाचे सुपरस्टार होते. आपण त्यांची सख्खी मुलगी आहोत पण ती ओळख आपल्याला मिळत नाही याचे दुःख मला खूप होत असे!” रेखा (Rekha)ची आई पुष्पवल्ली गेल्यानंतर ती आपल्या वडिलांना पहिल्यांदा भेटली होती.
==========
हे देखील वाचा : गोल्डी विजय आनंद दिग्दर्शक कसा बनला?
==========
याच कार्यक्रमात तिने आपल्या अफेअरबद्दल देखील चर्चा केली. किरण कुमार, विनोद मेहरा, जितेंद्र, अमिताभ बच्चन….. विनोद मेहरासोबत लग्न एक अफवा होती असे तिचे म्हणणे होते तसेच मुकेश अगरवाल मानसिक आजारी होते असे देखील तिने या मुलाखतीत सांगितले. रेखा (Rekha)चं पहिलाच चित्रपट ‘अंजाना सफर’ मोठ्या वादात सापडला होता. कारण या सिनेमात तिचं एक मोठं दीर्घलीप लॉकिंग चुंबन होतं विश्वजितसोबत. सेन्सॉरकडे हा सिनेमा तब्बल १० वर्षे अडकून पडला होता. १९७९ साली ‘दो शिकारी’ या नावाने प्रदर्शित झाला!