पहिल्याच सिनेमात दिलीप कुमारची घाबरगुंडी का उडाली ?
अभिनय सम्राट दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या पहिल्या शॉटला दिग्दर्शकाकडून आणि नायिके कडून खडे बोल सुनावले गेले होते! त्या मुळे दिलीप चा नर्व्हस नेस आणखी वाढला होता.त्याची घाबरगुंडी उडाली होती. काय होत हा किस्सा? असं काय घडलं होतं? दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी त्यांच्या ‘ The substance and the shadow ‘ या ऑटोबायोग्राफी मध्ये या मजेदार प्रसंगाचे वर्णन केले आहे.
दिलीप कुमारचा (Dilip Kumar) पहिला चित्रपट होता १९४४ साली प्रदर्शित झालेला बॉम्बे टॉकीजचा ‘ज्वार भाटा.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते अमिया चक्रवर्ती यांनी. या चित्रपटात दिलीप कुमारची (Dilip Kumar) अभिनेत्री मृदुला सोबत जोडी होती. या सिनेमाचा पहिल्याच शॉट च्या वेळी दिलीप कुमार खूप नर्व्हस झाला होता. कारण रुपेरी पडद्यावर काम करण्याची त्याची पहिलीच वेळ होती. कॅमेऱ्यासमोर कसे वावरायचे याचे काहीही प्रशिक्षण झालेले नव्हते. आमिया चक्रवर्ती यांनी त्याला शॉट समजावून सांगितला. या शॉट मध्ये त्याला पळत पळत जाऊन आत्महत्या करणाऱ्या नायिकेला वाचवायचे असते.
दिग्दर्शकाने ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन..’ असे म्हटल्यावरतेव्हा दिलीप कुमार (Dilip Kumar) जोरात पळाला. पण कॅमेराची स्पीड आणि दिलीप कुमारची धाव या दोघांची सांगड काही बसत नव्हती. त्यामुळे चक्रवर्ती म्हणाले थोडंसं हळूहळू धाव कॅमेरा मध्ये तू आला पाहिजेस. पुन्हा दिलीप कुमारने धावायला सुरुवात केली. पुन्हा तोच प्रश्न झाला. अमिया चक्रवर्ती म्हणाले,” तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? कॅमेरा ज्या पद्धतीने रोल होत आहे त्या पद्धतीने तुला धावायचे आहे.” त्यावर दिलीप कुमार (Dilip Kumar) म्हणाला,” तिकडे हिरोइन आत्महत्या करायला जाते आहे.प्रसंग बाका आहे. तिला हळूहळू पळत जाऊन मी कसे पकडू?” त्यावर दिग्दर्शक म्हणाले,” तुला सांगतो तेव्हडे कर.” आठ दहा वेळेला रिटेक झाल्यानंतर दिलीप कुमार ची स्पीड आणि कॅमेरा दोघांची वेळ बरोबर आली पण पुन्हा प्रश्न निर्माण झाला!
दिलीप कुमार (Dilip Kumar) धावत तर बरोबर गेला पण त्याने नायिकेला अलगद पकडले. दिग्दर्शक पुन्हा ओरडले,” अरे हे काय?” दिलीपला काहीच कळाले नाही. त्यावर नायिका म्हणाली,” अरे बाबा, मला काहीच प्रॉब्लेम नाही तू मला इतक्या हळू का पकडतोस? मी आत्महत्या करण्याचाप्रयत्न करते आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीला कुणी इतके हळुवार पणे पकडतात का?” खरंतर दिलीप कुमारला संकोच वाटत होता.त्याची पहिलीच मुव्ही होती. एवढ्या लोकांच्या समोर नायिकेला घट्ट पकडणे त्याला अवघडल्यासारखे वाटत होते! अमिया चक्रवर्तीने देखील सांगितलं,” तू तिला जोरात पकड ना!” दिलीप कुमारचा (Dilip Kumar) पहिला चित्रपट असल्यामुळे हिरोईनला स्पर्श करणे तिला घट्ट पकडणे हे त्याला जमत नव्हतं.
हे देखील वाचा : ‘शान त्रेचाळीस वर्षाचा झाला..’
मृदुला त्याला पुन्हा पुन्हा सांगत होती,” माझी काही हरकत नाही तू मला जोरात पकड!” पुन्हा एकदा शॉट घेण्यात आला. आता दिलीप कुमार (Dilip Kumar) पुरता थकला होता. आता कॅमेऱ्याची स्पीड आणि धावण्याची स्पीड मॅच झाली होती तो गेला आणि त्याने नायिकेला घट्ट मिठी मारली. शॉट ओके झाला. पण नायिका जोरात ओरडली,” एवढ्या जोरात कुणी पकडतो का? माझ्या दंडावर बघ तुझ्या हाताची वळ उमटले!” दिग्दर्शकाने आता कपाळाला हात लावला आणि सगळे जण जोरजोरात हसू लागले! अशा प्रकारे दिलीप कुमारचा (Dilip Kumar) पहिला शॉट ओके झाला!
जाता जाता थोडंसं या दिलीप कुमारच्या पहिल्या चित्रपटाबद्दल. ज्वार भाटा हा चित्रपट आमिया चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केला होता. नंतर १९५२ साली त्यांनी दिलीप कुमारला (Dilip Kumar) घेऊन ‘दाग’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ज्वारभाटा या चित्रपटाला संगीत अनिल विश्वास यांनी दिलं होतं. यातील गाणी अरुण कुमार, पारुल घोष आणि अनिल विश्वास यांनी गायली होती. ‘सांझ की बेला पंछी अकेला….’ हे अरुण कुमार यांनी गायलेलं गाणं त्याकाळी चांगलंच लोकप्रिय झालं होतं. या चित्रपटात दिलीप कुमारसोबत आगा या अभिनेत्याने प्रमुख भूमिका केली होती. हा चित्रपट २९ नोव्हेंबर १९४४ या दिवशी प्रदर्शित झाला होता.