Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

संतोषने का मानले अवधूतचे आभार? जाणून घ्या खरं कारण

 संतोषने का मानले अवधूतचे आभार?  जाणून घ्या खरं कारण
आठवणींच्या पानावर

संतोषने का मानले अवधूतचे आभार? जाणून घ्या खरं कारण

by Kalakruti Bureau 29/12/2020

लंडनमध्ये संतोष जुवेकर अडकला आहे ही बातमी आता सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आणि संतोषच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यावरून संतोषला, तू कुठे आहेस? काय करतो आहेस? कसा आहेस? सुरक्षित आहेस ना? असे प्रश्न विचारणारे अनेक फोन आले. मात्र या विचारपूस करणाऱ्यांच्या गर्दीत एक आवाज अवधूत गुप्तेचाही होता, ज्याने संतोषला असं विचारलं की, संतोष तुला लंडनमध्ये काही पैशांची गरज आहे का? जवळचे पैसे संपले असतील तर मला सांग मी लगेच पाठवतो. इतकच नव्हे तर आपण तुला लंडन मधून भारतात परत आणण्यासाठी काही प्रयत्न करता येतात का हेदेखील बघूयात. अवधूतच्या या अनोख्या मैत्रीच्या हाकेसाठी संतोषने त्याचे मनापासून आभार मानले आहेत.

गेल्या महिन्याभरात संतोष जुवेकर यांच्या सोशल मीडिया पेजवरचे फोटो पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की तो लंडनमध्ये डेट भेट या सिनेमाच्या शूटिंगसाठी गेला होता. अभिनेता लोकेश गुप्ते हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. त्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे, रिंकू राजगुरु, संतोष जुवेकर सुव्रत जोशी अशी सगळी टीम लंडनमध्ये होती. शूटिंग अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरु होतं.

16 डिसेंबरला या सिनेमाच्या लंडनमधल्या शूटिंगचा शेड्युल संपलं आणि त्यानंतर कोरोनाची लाट आल्यामुळे लंडनमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचा फटका या सिनेमाच्या क्रू ला  बसला आणि सगळी टीम लंडनमध्ये अडकून राहिली. सोळा डिसेंबरनंतर जसे मार्ग मिळतील तसे इतर कलाकार भारताच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली. संतोष हा २२ तारखेला भारतात येणार होता तत्पूर्वी तो लंडनमधील त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी थांबला होता.

डेट भेट या सिनेमा टीम

मात्र त्यापूर्वी लंडनवरून भारतात येणारी सर्व विमाने रद्द करण्यात आल्यामुळे संतोष जुवेकर अडकून पडला. सध्या संतोष सुरक्षित असून तो लंडनमधल्या एका मित्राच्या घरी राहिला आहे. अर्थात लॉकडाउन झाल्यामुळे त्याला कोणत्याही मित्राला भेटता आलं नाही शिवाय मित्रांबरोबर लंडनची भटकंती करण्याचाही त्याचा बेत होता मात्र तोदेखील फसला. हे सगळं सुरू असतानाच संतोषने ऑनलाईन संवाद साधून तो लंडनमध्ये सुखरूप असल्याचे त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवलं.

मात्र हे सांगत असताना संतोष अवधूत गुप्तेचे आभार मानायला विसरला नाही. संतोष सांगतो, अवधूत गुप्ते हा मराठी इंडस्ट्रीमधला माझा खूप चांगला मित्र आहे. एक तारा, झेंडा या त्याच्या सिनेमातदेखील मी काम केलं होतं. अवधूत नेहमीच इतरांच्या मदतीसाठी धावून जातो आणि ह्या गोष्टीचा अनुभव मी घेतला. जेव्हा मी लंडनमध्ये अडकून होतो तेव्हा एके दिवशी मला अवधूतचा फोन आला आणि त्याने मला तू कसा आहेस? कुठे आहेस? सुखरूप आहेस का? ह्यातलं काहीही न विचारता फक्त एकच प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता की, तुझ्याकडे पुरेसे पैसे आहेत का? आणि जर नसतील तर मला लगेच सांग. तुझ्या अकाउंटवर काही पैसे पाठवतो. तुला भारतात येईपर्यंत उपयोगी पडतील.

शिवाय त्यापुढे जाऊन आपल्या काही प्रशासनातील ओळखीचा वापर करून चांगल्या पर्यायांचा शोध घेऊन तुला लवकरात लवकर भारतात कसे परत येता येईल याचाही आपण प्रयत्न करू. अवधूतने दाखवलेली ही समयसूचकता माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची होती.

या गेल्या काही दिवसांमध्ये संतोष लंडनमध्ये अडकला या गोष्टीची जितकी चर्चा झाली त्याहून कैकपटीने अधिक चर्चा अवधूत गुप्तेने संतोषला दिलेली ही मदतीची हाक आणि त्याने दाखवलेली मैत्री  याचीही खूप चर्चा मराठी इंडस्ट्रीमध्ये रंगली आहे. याबद्दल अवधूत गुप्तेवरही त्याचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

-अनुराधा कदम

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Entertainment music Song
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.