Aatali Batami Phutli Trailer: धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Maharashtrachi Hasyajatra तून विशाखा सुभेदारने एक्झिट का घेतली? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण…
मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोने गेल्या काही वर्षांत घराघरात आपली छाप पाडली आहे. या मंचावरून अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली, तर काही अनुभवी कलाकारांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. हास्य, विनोद आणि उपहासाची अनोखी मेजवानी देणाऱ्या या शोमुळे कलाकारांच्या कारकिर्दीला नवा उभारी मिळाला. मात्र, या शोमधील सर्वात महत्त्वाच्या आणि प्रेक्षकांच्या लाडक्या चेहऱ्यांपैकी एक असणाऱ्या विशाखा सुभेदारने अचानक एक्झिट घेतली. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आणि अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं. शेवटी एका मुलाखतीत तिने यामागचं खरं कारण उघड केलं.(Maharashtrachi Hasyajatra)

विशाखा सुभेदार म्हणाली की, “मी अनेक वर्षं हास्यजत्रेत काम करत होते. पण बराच काळ एकाच धाटणीच्या, साचेबद्ध भूमिका करत असल्यामुळे माझ्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती. हळूहळू मला जाणवलं की प्रेक्षकही मला त्याच नजरेतून पाहू लागले आहेत. चित्रपटांच्या ऑफर्समध्ये देखील मला तशाच प्रकारच्या भूमिका येऊ लागल्या होत्या. त्यामुळे मी बदलाची गरज ओळखली आणि धाडसी पाऊल उचललं.”हा निर्णय मात्र तिच्यासाठी खूप कठीण होता. कारण, महिन्याला मिळणाऱ्या मानधनावरच तिच्या कुटुंबाचा गाडा चालत होता. त्यामुळे अचानक शो सोडणं म्हणजे मोठा धोका होता. पण या कठीण क्षणी तिच्या पतीने आणि मुलाने तिला आधार दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच ती निर्धाराने शो सोडण्याचा निर्णय घेऊ शकली. विशाखा भावूक होत म्हणाली की, “कधी कधी मला वाटायचं मी चुकीचं पाऊल उचलते आहे. पण घरच्यांच्या विश्वासामुळे मला धैर्य मिळालं.” अस ही ती म्हणाली.

विशाखा पुढे म्हणाली की, “हास्यजत्रेने मला खूप काही दिलं आहे. नाव, यश, चाहत्यांचं प्रेम. पण आयुष्यात ठरावीक चौकटीत अडकून राहायचं नव्हतं. काहीतरी वेगळं करण्याची ओढ होती. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. आता महिन्याला ठरलेली कमाई होत नाही, याची जाणीव आहे. पण निर्मिती क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न मी साकार करत आहे.”(Maharashtrachi Hasyajatra)
=================================
हे देखील वाचा: Bigg Boss 19 मध्ये धक्कादायक घटना, बसीर अलीमुळे टळला मोठा अपघात
=================================
आज विशाखा सुभेदार एक नवं पान उलगडत आहे. छोट्या पडद्यावर गाजलेली ही अभिनेत्री आता नव्या भूमिका, नव्या संधी आणि नव्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या धाडसी निर्णयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं असून, ती लवकरच वेगळ्या अवतारात दिसेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.