“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Ameesha Patel वयाच्या ४९ वर्षीही का आहे सिंगल? अभिनेत्रीने स्वतः सांगितले कारण म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेलला कोणत्या ही ओळखीची गरज नाही. आपला पहिलाच चित्रपट ‘कहो ना प्यार है’ मधून रातोरात स्टार झालेली अमीषा पटेल सध्या सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसने आग लावत असते आहे. अमीषा पटेलने ‘गदर 2’ च्या माध्यमातून धमाकेदार कमबॅक केले होते. ही फिल्म ब्लॉकबस्टर ठरली होती. पण तुम्हाला माहित आहे का ? की वयाच्या ४९व्या वर्षात ‘गदर’ ची सकीना वैयक्तिक आयुष्यात आजही एकटी आहे.अलीकडेच अमीषा पटेलने स्वतः याबाबत खुलासा केला आहे आणि तिने सांगितले आहे की, लग्न आणि नातेसंबंध कधीही तिच्या फर्स्ट प्रॉयोरिटी का नव्हते, आणि तिला शोबिजमध्ये बहुतेक महिलांनी जी अपेक्षा केलेली असते त्यापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारण्याबद्दल कोणतीही खंत नाही. ( Ameesha Patel )

फिल्मी मंत्रा ला दिलेल्या एका मुलाखतीत ‘कहो ना… प्यार है’ चा तारा ने सिंगल राहण्याबद्दल सांगितले की, “मला असं वाटतं की मी ज्या प्रकारे माझं जीवन जगत आहे, त्यात मी खूप खुश आहे. मला साथीदाराची गरज नाही. मी माझ्या कामात इतकी बिझी आहे की यासाठी माझ्याकडे वेळ नाही.” तिने लग्न ही एक गरज आहे या कल्पनेला देखील नकार दिला. अमीषा म्हणते की, ती आतापर्यंत कोणत्याही अशा व्यक्तीला भेटली नाही जी तिला पूर्णपणे समजून घेऊ शकेल किंवा तिच्या गरजेनुसार असेल.

तिने नातेसंबंधांना वेळ आणि लक्ष देण्याची जबाबदारी ही गंभीरतेने घेतली आणि मान्य केले की त्या या क्षणी कोणालाही ते सगळं देऊ शकत नाहीत.तसेच ती अस ही म्हणाली की. ‘तिच शेड्यूल खूप व्यस्त आणि अनपेक्षित असते, लांब शूटिंगच्या तासांत, प्रवास ज्यामध्ये नातेसंबंधांसाठी वेळ काढणे कठीण आहे.” (Ameesha Patel)
=======================================
हे देखील वाचा: Paresh Rawal १५ दिवस पित होते त्यांचीच लघवी? अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ
========================================
पुढे अभिनेत्रीने हे ही सांगीतले की, “देवाची कृपा असल्याने, मला खूप काही मिळाले आहे – जे मला हवे होते, त्यापेक्षा खूप अधिक आहे. एक बाहेरच्या व्यक्तीच्या रूपात, मला बॉक्स ऑफिसवर खूप मोठा यश मिळाल आहे. मी स्वतःवर प्राउड होऊ शकते”