‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

“समोरुन जायचो, ना तो माझ्याकडे पाहायचा, ना मी”; Kedar Shinde -Bharat Jadhav यांच्यात का होता अबोला?
चित्रपटसृष्टीत दोन अभिनेत्यांची किंवा दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडगोळी असतेच… मराठीतील गाजलेली जोडी म्हणजे भरत जाधव (Bharat Jadhav) आणि केदार शिंदे (Kedar Shinde)… रंगभूमीपासून एकमेकांचा प्रवास चित्रपटांपर्यंत पाहणारे हे दोन घनिष्ट मित्र एकेकाळी तब्बल ९ महिने एकमेकांशी बोलत नव्हते… इतकंच नाही तर एकाच बिल्डिंगमध्ये राहूनही त्यांनी एकमेकांचं तोंड देखील पाहिलं नव्हतं… नेमकी या दिग्दर्शक-अभिनेत्यात काय वाद झाला होता? जाणून घेऊयात…(Marathi Entertainment News)

केदार शिंदे आणि भरत जाधव यांनी आजवर बरेच चित्रपट, नाटकं एकत्र केली… परंतु, काही कारणामुळे दोघांनी ९ महिने अबोला धरला होता… केदार शिंदे यांनी ‘मुक्कामपोस्ट मनोरंजनला’ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता… मुलाखतीत केदार यांना अंकुश चौधरी, भरत जाधव आणि त्यांच्या मैत्रीविषयी विचारलं गेलं. त्यावेळी केदार शिंदे यांनी भरत जाधव यांच्यासोबतच्या अबोल्यावर बोलताना म्हटलं की, “असं अंकुश चौधरीबरोबर झालं नाही. गेली ५० वर्षे आम्ही एकत्र आहोत आणि अजूनही आहोत आणि यापुढेही ५० वर्ष एकत्र राहण्याची इच्छा आहे. जो काही वाद किंवा संवाद झाला होता, तो भरत जाधवबरोबर झाला होता. हे मी ना मंजूर करणार नाही. मैत्रीत या गोष्टीसुद्धा घडतात”. (Kedar Shinde news)
================================
हे देखील वाचा : जेव्हा ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचे प्रेक्षक भरत जाधव यांच्या वडिलांवर चिडले…
================================
पुढे केदार म्हणाले की, “भरत माझ्याच बिल्डिंगमध्ये राहायचा. मी आठव्या मजल्यावर आणि भरत दहाव्या मजल्यावर राहत होता. ही ‘सही रे सही’ नाटकाच्या आधीची म्हणजेच, २००० सालची ही गोष्ट… आमच्या दोघांमध्ये काही मतभेद आणि गैरसमज झाले होते. आम्ही दोघे एकमेकांसमोर यायचो, मी त्याच्या समोरून जाताना त्याच्याकडे बघत नव्हतो आणि तोसुद्धा माझ्याकडे बघत नसायचा. आमचं कुटुंब एकमेकांबरोबर बोलायचे, माझी बायको आणि त्याची बायको एकमेकींबरोबर बोलत होत्या. पण मी भरतशी बोलत नव्हतो आणि तो माझ्याशी बोलत नव्हता.”(Bharat Jadhav news)
केदार म्हणाले की, “मग आठ-नऊ महिन्यांनी अशी गोष्ट घडली की, आम्हालाही कळलं नाही आणि आम्ही पुन्हा बोलायला लागलो. त्यानंतर आम्ही परत एकत्र आलो. तर तेव्हा काय झालं होतं हे आता मला आठवत नाहीये आणि मला वाटतं भरतलासुद्धा ते आठवणार नाही. कुठल्या तरी गोष्टीमुळे गैरसमज झाले असतील”…

दरम्यान, भरत जाधव आणि केदार शिंदे ही जोडगोळी प्रेक्षकांना गेले अनेक वर्ष मनोरंजित करत आहे… ‘ह्यांचा काही नेम नाही’, ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘खो-खो’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र येत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे… दरम्यान, लवकरच पुन्हा एकदा केदार शिंदे यांचं दिग्दर्शन आणि त्या चित्रपटात भरत जाधव, अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आणि सिद्धार्थ जाधव असावेत अशी प्रेक्षकांची इच्छा आहे… आता येत्या काळात ही इच्छा पुर्ण होणार का हे पाहणं महत्वाचं असणारक आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi