Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

 Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?
मिक्स मसाला

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

by रसिका शिंदे-पॉल 06/06/2025

चंदेरी जग म्हटलं की स्टारडम आलं, आणि स्टारडम म्हटलं की चाहते आलेच. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना (Ranjana Deshmukh) अशा बऱ्याच मोठ्या कलाकारांना चाहत्यांचे भयानक अनुभव आले आहेत. नव्वदच्या दशकात एका अभिनेत्रीला चक्क याच कारणामुळे आपली ओळख आणि चेहरा लपवण्यासाठी परीक्षेला जाताना बुरखा घालून जावं लागलं होतं. कोण होती ती अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊयात…(Bollywood industry)

मराठी चित्रपटसृष्टीतील ९०चा काळ आपल्या सहजसुंदर अभिनय आणि सौंदर्याने गाजवणाऱ्या अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ‘प्रेम करू या खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्या झळकल्या आहेत. नुकत्याच लोकशाही न्यूज चॅनलला मुलाखतमध्ये किशोरी यांनी १२वीच्या परीक्षेचा एक मजेशीर किस्सा सांगितला. (Marathi entertainment news)

सेलिब्रिटी म्हटलं की सार्वजनिक ठिकाणी जाताना फार सावधानी बाळगावी लागते. बऱ्याच अडचणींचा सामना देखील करावा लागतो. याच प्रसंगाला अनुसरुन १२वी परीक्षेबद्दल सांगताना किशोरी म्हणाल्या की, “मला परीक्षेला जाताना अशी समस्या निर्माण झाली होती. कारण १२वीच्या बोर्डाचे सेंटर दुसऱ्या कॉलेजमध्ये होते, त्यामुळे तिकडे जावे लागत असे. माझ्या कॉलेजमधील लोकं मला ओळखत होते. त्यांच्यासाठी मी एक विद्यार्थिनी होते, शिवाय मी चित्रपटांमध्ये काम करते, हे त्यांना माहीत होते”. (Entertainment tadaka)

पुढे किशोरी म्हणाल्या की, ” मी जेव्हा बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रावर गेले तेव्हा मात्र तिथे प्रॉब्लेम व्हायला लागला. माझ्याच वयाची मुले मला पाहून, ‘अरे! ही तर हिरोईन आहे, ही परीक्षा देते आहे,’ अशा चर्चा सुरू करू लागली. पहिले एक-दोन दिवस मी हे सगळे पाहिले, पण परीक्षा देताना आपल्याला लक्ष केंद्रित करून पेपर द्यावे लागतात”.(Bollywood news)

किशोरी (Kishori Shahane) यांनी या अडचणीवर मात करण्यासाठी एक उपाय शोधला. उपाय सांगत त्या म्हणाल्या, “बोर्डाच्या केंद्रावर परीक्षा देताना मी एकटी असायचे. मग मी एक ‘बुरखा’ घेतला. माझा एक डिझायनर होता, त्याने एका रात्रीत मला बुरखा बनवून दिला. मग मी बुरखा घालून परीक्षा द्यायला जायचे. त्यानंतर बारावीच्या बोर्डाच्या सगळ्या परीक्षा मी अशाच पद्धतीने दिल्या.” किशोरी शहाणे यांचा परीक्षा देण्याचा हा गमतीशीर फंडा खरंच भारीच होता.

================================

हे देखील वाचा: या आहेत ८ बाबी ज्या किशोरी शहाणे बद्दल तुम्हाला कदाचीत माहीत नसतील….

=================================

दरम्यान, किशोरी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी १९९३ मध्ये आलेल्या ‘बॉम्ब ब्लास्ट’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. पुढे ‘वाजवा रे वाजवा’, ‘नाती’, ‘एक डाव धोबी पछाड’, ‘माझे पती करोडपती’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘जीवन-संध्या’, ‘नारबाची वाडी’ या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका सादर केल्या. तर, ‘कर्मा’, ‘हफ्ता बंद’,’प्यार का देवता’, ‘शिर्डी साई बाबा’, ‘शादी से पहले’, ‘प्यार मे ट्विस्ट’, ‘बदलापूर बॉईज’, ‘मोहन-जो-दारो’, ‘पी.एम.नरेंद्र मोदी’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्येही कामं केली आहेत. (Kishori Shahane movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrities Update in Marathi Entertainment News Get Latest Marathi Entertainment update hindi daily soaps hindi serial Indian Cinema kishori shahane
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.