
Nana Patekar : “देव मानत नाही अशातला भाग नाही पण…”; पाटेकर देवळात का जात नाहीत?
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आजवर अनेक अजरामर भूमिकांनी प्रेक्षकांना स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडलं आहे… क्रांतीवीर, नटसम्राट यातील भूमिका तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या होत्या… मात्र, तुम्हाला माहित आहे का? राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे अभिनेते नाना पाटेकर देवळात जात नाहीत… नेमकं त्याचं काय कारण आहे हे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं आहे…(Bollywood News)

सध्या नाना पाटेकर ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5 movie) चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत… या दरम्यान, एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी देवळात न जाण्यामागचं कारण सांगताना म्हटलं की,”देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक, देव मानत नाही अशातला भाग नाही. माणसाचा जन्म दिलाय खूप झालं की, वारंवार तिथे जाऊन त्याला कुठे त्रास द्यायचा. आठ आणे टाकायचे लाख रुपये दे म्हणायचं…नाही, कशाला पाहिजे! माणूस म्हणून जन्माला घातलं तो जन्म पूर्ण सार्थकी लागेल असं म्हणायचं, जगायचं आणि एक दिवस मरून जायचं. कोण अमरपट्टा घेऊन आलं आहे.”(Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’ सुपरस्टारला ऑफर केली होती
=================================
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘वनवास’ चित्रपटानंतर नाना पाटेकर ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात झळकले होते… आधी इन्सपेक्टर दगडू ही त्यांनी साकारलेली भूमिका अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आली होती… मात्र, त्यांनी नकार दिल्यामुळे नाना पाटेकर यांच्या वाट्याला ही भूमिका आली… तसेच, भारतीय चित्रपटसृष्टीतल्या १००० कोटींच्या SSMB29 चित्रपटात नाना पाटेकर यांना ऑफर दिली होती पण त्यांनी ती नाकारल्याचं सांगितलं जात आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi