Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?
हिंदी सिनेमाचे महान दिग्दर्शक राज खोसला यांचे हे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. सुरुवातीला गुरुदत्त यांचे सहायक असलेले राज खोसला यांनी सर्व जॉनरचे चित्रपट बनवले. रहस्य कथा हा त्यांचा आवडीचा विषय. भारताचे आल्फ्रेड हिचकॉक अशी देखील त्यांची ओळख आहे. ‘वह कौन थी’ हा चित्रपट ७ जानेवारी १९६४ या दिवशी प्रदर्शित झाला होता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. मनोज कुमार, साधना, प्रेम चोप्रा, हेलन यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.

या चित्रपटाची गाणी गीतकार राजा मेहंदी अली खान यांनी लिहिली होती तर संगीत संगीतकार मदन मोहन यांचे होते. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. लता मंगेशकर यांच्या स्वरातील या गाण्यांनी हिंदी चित्रपट संगीतात एक मानाचं स्थान पटकावले आहे. या चित्रपटात एक गाणं होतं ‘लग जा गले के फिर ये हंसी रात हो ना हो शायद इस जनम में मुलाकात हो ना हो…’ पहाडी रागावर आधारित हे गाणं लता मंगेशकर यांच्या टॉप टेन गाण्यात येते. जेव्हा या चित्रपटाला २०१४ साली पन्नास वर्षे पूर्ण झाली त्या दिवशी स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी tweet केलं होतं त्यात त्यांनी म्हटलं होतं की,” ही गाणी पन्नास वर्षांपूर्वी वाटतच नाही. मला तर कालच लग जा गले हे गाणे रेकॉर्ड केले आहे असं वाटतय!” इतकं ताजं आणि कालातीत असं संगीत होतं.

पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? ‘ लग जा गले’ हे गाणं दिग्दर्शक राज खोसला यांना अजिबात आवडलं. म्हणून ते हे गाण रेकॉर्ड करू नका असे सांगत होते. हे गाणे चित्रपटात असण्याची काहीच गरज नाही असं ते म्हणाले होते. संगीतकार मदन मोहन आणि राजा मेहंदी आली यांनी अतिशय सुंदर गाणे बनवले होते. त्याचे स्क्रॅच रेकॉर्डिंग व्हर्शन त्यांनी जेंव्हा दिग्दर्शक राज खोसला यांना ऐकवले तेव्हा दिग्दर्शक राज खोसला यांनी हे गाणे त्याची ट्यून अजिबात आवडली नाही. आपण हे चित्रपटात घेणार नाही असेही सांगितले. त्यामुळे या गाण्याची फायनल रेकॉर्डिंग देखील थांबले. या सुरावटींवर गीतकार आणि संगीतकार यांचे प्रचंड प्रेम होते. त्याना काळातच नव्हते राज खोसला यांना झाले तरी काय? त्यांना का आवडले नाही? त्यामुळे त्यांनी चित्रपटाचे निर्माते एन एन सिप्पी यांना ते स्क्रॅच व्हर्शन ऐकवेल.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
एन एन सिप्पी यांना ते आवडले पण त्यांनी चित्रपटाचा नायक मनोज कुमार यांना बोलावून राज खोसला यांची समजूत काढायला सांगितली. त्या पद्धतीने मनोज कुमार ती टेप घेऊन राजखोसला यांच्याकडे गेले. राज खोसला यांनी पुन्हा हे अतिशय वाईट गाणे आहे आपल्या चित्रपटात नको असे सांगितले. त्यावर मनोज कुमार म्हणाले,” तुम्ही हे गाणे घरी घेऊन जा. शांतपणे ऐका. तुम्ही स्वतः चांगले गायक आहात. खरं तर तुम्ही गायक म्हणूनच आपले करिअर घडवणार होता. तुम्हाला संगीताची चांगली जाण आहे. कुठलाही मनात पूर्वग्रह न आणता हे गाणे पुन्हा एकदा तुम्ही ऐका. माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल.” त्या पद्धतीने राज खोसला ती टेप घरी घेवून गेले. यांनी हे गाणे पुन्हा नव्याने ऐकले.

आता मात्र चमत्कार झाला. रात्रभर ते गाणे ऐकत बसले. त्यांना आता ते गाणे प्रचंड आवडू लागले. दुसऱ्या दिवशी ते स्टुडिओमध्ये आले. स्टुडिओ मध्ये संगीतकार मदन मोहन, गीतकार राजा मेहंदी आली खान आणि मनोज कुमार उपस्थित होते. राज खोसला म्हणाले,” मला आपण सर्वानी माफ करा. माझी मती भ्रष्ट झाली होती कि काय? मला कुठली दुर्बुद्धी सुचली होती माहित नाही. इतक्या सुंदर गीताला मी नाकारत होतो. मला आता माझ्या कृत्याचा पश्चाताप होतोय. मला तर असं वाटतंय माझ्या चपलेने मी माझ्या डोक्यात मारून घ्यावं. इतकी घाणेरडी चूक मी कशी काय करू शकत होतो? इतक्या चांगल्या सुरावटीला मी का नाकारत होतो.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती का? की मी वेडा झालो होतो? हे गाणे अतिशय सुंदर बनलेले आहे. तुम्ही हे गाणे तयार करा आपण हे चित्रपटात नक्की वापरणार आहोत पण त्यापूर्वी मला माझ्या चपलेने माझ्या डोक्यात मारून घेतलंच पाहिजे. त्याशिवाय ते ठिकाणावर येणार नाही!” असे म्हणून त्यांनी आपल्या पायातील चप्पल काढली परंतु इतरांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला! ‘वह कौन थी’ चित्रपट सस्पेन्स म्युझिकल सिनेमा आहे आणि राज खोसला आणि मदन मोहन यांच्या संगीतातील हा एक महत्त्वाचा सिनेमा आहे.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi