Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

पहिल्या लग्नानंतर Rekha का राहीली एकटी? स्वतः अभिनेत्रीने सांगितलं मन हेलावणारे कारण !
Bollywood मधील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रेखा. तिच्या अभिनयाने तिने भारतीय चित्रपटसृष्टीत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. शान, क्लास आणि करिष्मा यांचे दुसरे नाव म्हणजे रेखा. मात्र, तिच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत त्यांनी नेहमीच मौन पाळले आहे. तिच्या चाहत्यांना माहित आहे की अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तिच्या भावना खुप खास आहेत, पण फारच कमी लोकांना हे माहीत आहे की अमिताभ यांच्या जया बच्चनसोबत लग्नानंतर रेखांनीही स्वतःचे घर बसवण्याचा प्रयत्न केला होता.(Actress Rekha On Remarriage)

रेखांनी 1990 मध्ये दिल्लीतील एक यशस्वी व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या एका वर्षाच्या आतच मुकेश यांनी आत्महत्या केली आणि रेखा पूर्णपणे कोसळून गेल्या. या दु:खद घटनेनंतर त्यांनी पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेनंतर रेखावर समाजाकडून खूप टीका झाली. काहींनी त्यांना “डायन” असेही म्हटले. पण त्या सर्व संकटांवर मात करत रेखा आज 70 वर्षांच्या असूनही आपले आयुष्य एकटेपणात जगत आहेत.

एका जुन्या मुलाखतीत, जेव्हा रेखांना विचारण्यात आलं की त्यांना कधी मूल नसल्याचं दुःख वाटतं नाही का? तेव्हा त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, “मला आता त्याची गरज वाटत नाही.” त्यांनी सांगितलं की, “भलेही मला आदर्श जोडीदार मिळाला असता, तरी हे माझ्या मूल्यांशी सुसंगत ठरलं नसतं. मी अशी स्त्री आहे जी स्वतःला फक्त एका व्यक्तीसाठी समर्पित करू शकत नाही. जर माझं मूल असतं, तर मी पूर्णपणे त्याच्यात गुंतले असते आणि मग इतर काही करण्यासाठी माझ्याकडे वेळ वा ऊर्जा राहिली नसती.” रेखा पुढे म्हणाल्या की, “मी अशी स्त्री आहे की जी एखाद्या नात्यात असते, तर ती पूर्ण समर्पणाने असते. मी त्याचा बिछाना तयार करते, त्याचे कपडे निवडते, त्याचं जेवण तयार करते आणि अगदी त्याचा लंच स्वतः पोहोचवते. मी इतकी फोकस्ड आहे.” पण हे सर्व करताना मला त्या मोठ्या जगापासून दूर जावं लागेल जे मला पाहतं, मला समजतं.(Actress Rekha On Remarriage)
====================================
====================================
रेखा म्हणतात की, त्यांचे नातेसंबंध केवळ कुटुंबापुरते मर्यादित नाहीत. त्या पुढे म्हणाल्या, “जगभरातील त्या सर्व मुलांचं आणि लोकांचं काय, ज्यांच्याशी मी आध्यात्मिकदृष्ट्या जोडलेली आहे? जर मला ‘रेखा’ म्हणून ओळख मिळाली असेल, तर हे माझं कर्तव्य आहे की जे लोक माझ्याशी जोडलेले आहेत किंवा जोडू इच्छितात, त्यांच्यासाठी मी उपलब्ध राहावं.” रेखांचं आयुष्य हे यश, संघर्ष, प्रेम आणि वेदनेचं मिश्रण आहे. त्यांनी लग्नानंतर एका मोठ्या वैयक्तिक आघाताचा सामना केला, पण तरीही त्या आजही एक प्रेणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी जरी लग्न किंवा मातृत्वाचा मार्ग पुन्हा निवडला नाही, तरी त्यांचं जगासाठी असलेलं योगदान, समर्पण आणि आत्मनिर्भरतेचा आदर्श कायम प्रेरणादायक राहील.