‘बॉम्बे टू गोवा’ सिनेमावेळी किशोर कुमार का चिडला होता ?
अष्टपैलू कलाकार किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्याबाबतचे अनेक किस्से आजदेखील रसिकांना आवडत असतात. मग ते किशोर कुमारचे अभिनयाचे असो; गायकीचे असो किंवा त्याच्या रेकॉर्डिंगचे असो. किशोर कुमार (Kishore Kumar) हा एक धमाल कलाकार होता. तो जिथे असायचा तिथे हंगामा होत असे. मेहमूद प्रॉडक्शनच्या ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेसचा त्यांचा किस्सा खूप गमतीशीर आहे. या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला अभिनेता मेहमूदने या गाण्यातील एक शब्द स्वतः गाणार असा हट्ट धरला आणि त्यातूनच हा मजेशीर किस्सा घडला!
आज आपल्याला १९७२ सालचा ‘बॉम्बे टू गोवा’ हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासाठी जरी आठवत असला तरी हा सिनेमा साइन करण्यापूर्वी अमिताभ बच्चनची स्टार व्हॅल्यू खूप कमी होती. मेहमूदचा भाऊ अन्वर अली यांच्यामुळे हा चित्रपट त्याला मिळाला होता. अमिताभ बच्चन यांच्यासाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा होता; कारण याच सिनेमामुळे त्याला पुढचा ‘जंजीर’ हा सिनेमा मिळाला. या सिनेमात अमिताभ बच्चन यांची नायिका अरुणा इराणी होती. खरंतर अरुणा इराणी हिचे त्या काळी अभिनेता मेहमूद सोबत अफेअर चालू होते त्यामुळे तिला या सिनेमाची नायिका होण्याची संधी मिळाली. या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा खलनायकाच्या भूमिकेत होता. (Kishore Kumar)
या चित्रपटात एक गाणं होतं जे किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी गायलं होतं. गाण्याचे बोल होते ‘देखाना हाय रे सोचा ना…’ गाण्याची चाल आर.डी.बर्मन यांनी अतिशय वेगवान बनवली होती. या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा दिवस ठरला. सर्वजण तयार होते. आता फक्त वाट किशोर कुमारची होती. किशोर कुमार (Kishore Kumar) आले. पंचम यांनी त्यांना विचारलं, “तुला गाणं पाठवलं होतं ते मिळालं ना तुम्हाला?” किशोर म्हणाले, “अरे भाई मिला है, मिला है और बहुत बढीया है…चलो रिहर्सल करते है” त्यावर अभिनेता महमूद म्हणाला की, “पण या गाण्यातील एक शब्द आहे. हा शब्द मी गाणार आहे.” किशोर म्हणाले, “ठीक आहे.” रिहर्सल सुरू झाली.
‘देखा न हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान…कदमो मे तेरे कदमो मे तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान…’ एवढं झालं की मेहमूदने किशोर कुमारच्या (Kishore Kumar) तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला “थांबा…या पुढचा शब्द मी म्हणणार!” किशोर कुमार (Kishore Kumar) म्हणाला, “अरे बांगडू, तू गा सकेगा?” मेहमूद म्हणाला, “हां… पक्का!” आणि पुन्हा रिहर्सल सुरू झाली. मेहमूदने मोठा जोशात म्हणाला ‘कुकडू s s कु’ त्यावेळी किशोर कुमार (Kishore Kumar) पंचमला म्हणाले, “अरे पंचम देख.. मेहमूद कितना अच्छा गाता है…ऐसा करते है, ये पुरा गाना उसी को देते है…” किशोर मेहमूदकडे वळून म्हणाला ,”यार मेहमूद अभी ये गाना पूरा तू ही गा. सिर्फ एक वर्ड ही क्यू ? पुरा गाना तू ही गा!” असे म्हणून किशोर कुमार (Kishore Kumar) रेकॉर्डिंग रूमच्या बाहेर पडला!
मेहमूदला हे सर्व अनएक्सपेक्टेड होतं. पंचम मेहमूदला म्हणाला, “अरे यार ये तुने क्या किया…अब क्या करेंगे…म्युझिशीयन है रेकोर्डिंग रूम का खर्चा है…” महमूद आता घाबरला. तो पंचमला म्हणाला, “पंचम तू जा आणि किशोर कुमारला घेऊन ये!” पंचम लगेच बाहेर पडला आणि किशोरला त्याने थांबवले आणि म्हणाला, “रुक किशोर..रुक जा” त्यावर किशोर म्हणाला “अरे पंचम भाई, कैसे गाये ? एक तो वो आधी चाय (कमी मानधन) देता है …उसको गाने की इतनी ही खुजली है तो एक वर्ड क्यू पूरा गाना गाले…मै जाता हूँ !” पण पंचमने त्याला थांबवून ठेवले. (Kishore Kumar)
=============
हे देखील वाचा : झीनत अमानने या सुपरहिट सिनेमात काम करायला दिला नकार!
=============
मागून लगेच मेहमूद आला. तो किशोरला (Kishore Kumar) म्हणाला, “भाई जान पुरा गाना आपही गाओगे… ‘कुकडू s s कु’ भी आप ही गाओगे…प्लीज रुक मेरे भाई!” आता मात्र किशोर कुमार (Kishore Kumar) शांत झाला. तो म्हणाला “बेटा, हम गाना अवश्य गायेंगे लेकिन एक शर्त है…” तो महमूदला म्हणाला, “रेकॉर्डिंग च्या वेळेला तू तिथे थांबायचं नाहीस!” त्यावर मेहमूद म्हणाला, “अरे भाईजान, रेकॉर्डिंग रूम क्या मै तो स्टुडिओ मे भी नही रूकुंगा !” अशा पद्धतीने मेहमूद रेकॉर्डिंग रूमच्या बाहेर गेला आणि पुढे गाण्याचं रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं!