Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नवऱ्याच्या निधनाच्या ७ महिन्यानंतरच भाभीजी घर पर है फेम Shubhangi Atre करणार दूसर लग्न?

 नवऱ्याच्या निधनाच्या ७ महिन्यानंतरच भाभीजी घर पर है फेम Shubhangi Atre करणार दूसर लग्न?
Actress Shubhangi Atre Divorce
टीव्ही वाले मिक्स मसाला

नवऱ्याच्या निधनाच्या ७ महिन्यानंतरच भाभीजी घर पर है फेम Shubhangi Atre करणार दूसर लग्न?

by Team KalakrutiMedia 30/12/2025

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’ (Bhabi Ji Ghar Par Hai) मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे. अभिनयात यशस्वी वाटचाल करत असतानाच तिच्या आयुष्यातील वैयक्तिक संघर्ष तिने शांतपणे पेलले. शुभांगीने 2003 साली पियुष पुरे यांच्यासोबत विवाह केला होता. पियुष डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत होता. विवाहानंतर दोघांना एक मुलगी झाली आणि सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र होतं. मात्र कालांतराने या नात्यात तणाव वाढू लागला. 2022 ते 2023 या काळात त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि अखेर फेब्रुवारी 2025 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने, या निर्णयानंतर काही महिन्यांतच एप्रिल 2025 मध्ये शुभांगीच्या नवऱ्याच निधन झालं.(Actress Shubhangi Atre)

Actress Shubhangi Atre
Actress Shubhangi Atre Divorce

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगीने तिच्या आयुष्यातील कठीण टप्प्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केलं होतं. घटस्फोटाचा निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेतल्याचं तिने सांगितलं होतं. हा निर्णय केवळ स्वतःसाठी नव्हता, तर आपल्या मुलीच्या भविष्यासाठी असल्याचं तिने स्पष्ट केलं. मानसिक आरोग्यावर होत असलेला परिणाम लक्षात घेता स्वतःला त्या नात्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं, असं तिचं मत होतं.

Actress Shubhangi Atre Divorce

ती म्हणाली होती की, नात्यांमध्ये गुंतल्यावर त्याचा भावनिक परिणाम खोलवर होतो. एका टप्प्यावर चिंता, अस्वस्थता वाढू लागली होती. त्यामुळे काही काळ ती लोकांपासून दूर राहू लागली होती आणि स्वतःला कामात झोकून दिलं होतं. वैयक्तिक आयुष्यात कितीही वादळं आली तरी त्याचा परिणाम आपल्या कामावर होऊ दिला नाही, याचं समाधान तिला असल्याचंही तिने नमूद केलं होतं.(Actress Shubhangi Atre)

===============================

हे देखील वाचा: Case No.73 Movie: ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे; सहस्यमय सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !

===============================

घटस्फोटाच्या काळात कुटुंबीय, मुलगी आणि जवळचे मित्र तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, असंही तिने सांगितलं होतं. आयुष्यातील या अनुभवांनी तिला खूप काही शिकवलं आणि अधिक मजबूत बनवलं, असं तिचं मत होतं. याच वेळी दुसऱ्या लग्नाबाबत विचारलं आणि त्यावेळी  शुभांगीने अतिशय स्पष्ट भूमिका मांडली होती. सध्या तरी पुन्हा लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं तिने सांगितलं. स्वतःवर कोणताही दबाव न घेता, आपलं संपूर्ण लक्ष मुलगी आशीच्या संगोपनावर केंद्रित असल्याचं ही ती म्हणाली होती.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bhabi Ji Ghar Par Hai Celebrity Entertainment Shubhangi Atre Shubhangi atre husband Shubhangi Atre marriage Shubhangi Atre Second marriage
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.