
John Abraham आणि Akshay Kumar पुन्हा एकत्र दिसणार? लवकरच होऊ शकते नव्या चित्रपटाची घोषणा…
Bollywood अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या गरम मसाला या चित्रपटाने लोकांचे भरपूर मनोरंजन केले. चित्रपटाची गाणी आणि कथा एकदम खूपच अनोखी होती. अलीकडेच जॉन अब्राहमने आपला मित्र अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा कॉमेडी जॉनरमध्ये हात मिळवण्याची इच्छा व्यक्त केली. गरम मसाला व्यतिरिक्त या दोघांनी इतरही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या पुनर्मिलनाची अपेक्षा होती आणि आता जॉनने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत लवकरच हे होऊ शकते असे संकेत दिले आहेत.(John Abraham and Akshay Kumar Together again)

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जॉन अब्राहमने सांगितले की, तो कॉमेडी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी शोधत आहे. यासोबतच जॉनने असेही नमूद केले आहे की, तो कॉमेडी चित्रपटासाठी चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. यावेळी जॉनने खुलासा केला की, तो अक्षय कुमारसोबत एका रियुनियन चित्रपटावरही चर्चा करत आहे. तसेच ‘आम्ही बोललो आहोत. अक्षय आणि माझ्यात बरीच चर्चा झाली आहे. तसे झाले तर खरोखरच प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा धक्का असेल, आम्ही दोघं एकत्र काम करण्याचं निमित्त शोधत आहोत.’ असेही तो म्हणाला.

जॉन आणि अक्षय कुमारचा गरम मसाला हा चित्रपट लोकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटातील त्यांचे दोन्ही कॉमिक टायमिंग उल्लेखनीय होते. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने जगभरात 53 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. गरम मसाला नंतर अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांनी देसी बॉयज आणि हाऊसफुल 2 मध्ये काम केले. आता जॉन आणि अक्षय कुमार लवकरच आपल्या चाहत्यांसाठी खुशखबर कधी जाहीर करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
==============================
===============================
गरम मसाल्याबद्दल बोलायचे झाले तर हा २००५ मध्ये प्रदर्शित झालेला कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, जॉन अब्राहम, परेश रावल आणि राजपाल यादव सारखे कलाकार एकत्र होते.