Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत होणार का जुन्या सोढीचा एन्ट्री? अभिनेत्यानेच दिले उत्तर
काही महिन्यांपूर्वी टीव्ही अभिनेता आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरचरण सिंग बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, महिनाभर बेपत्ता राहिल्यानंतर ते आपल्या घरी परतले आणि ते धार्मिक सहलीला गेल्याचे सांगितले होते. त्या प्रकरणानंतर आता पहिल्यांदाच गुरुचरण यांना सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आले . नुकतेच तो मुंबई विमानतळावर दिसल आहेत. आणि ते विमानतळावर येताच पॅपराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. या संभाषणादरम्यान गुरुचरणने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये पुनरागमन करण्याविषयीही सांगितले आहे. जाणून घेऊयात गुरचरण सिंग नेमके काय बोलले.(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

जेव्हा पॅपराझींनी गुरचरण यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या शोमध्ये परतणार का असे विचारले तेव्हा ते म्हणाले, “रब जाने, मला काहीच माहित नाही. गुरुचरण यांनी मात्र अनेक वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या मालिकेत सोढी ही व्यक्तिरेखा साकारली होती. हा शो 2008 साली सुरू झाला होता. तेव्हापासून ते या शोशी जोडले गेलेले आहेत. सोढीच्या भूमिकेतून त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मध्यंतरी ते काही काळ शोपासून विभक्त झाले होते. मात्र, त्यांनी पुन्हा पुनरागमन केले आणि त्यानंतर 2020 मध्ये ते पुन्हा शोपासून विभक्त झाले. त्यानंतर ते कोणत्याही प्रोजेक्टमध्ये पाहण्यात आले नाही.

जेव्हा त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चा निरोप घेतला होतो, त्यावेळी त्यांना आपल्या कुटुंबासोबत राहायचे असल्याचे समोर आले होते. त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नाही, त्यांना त्यांची काळजी घ्यायची आहे. असे ही समोर आले होते. सध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ मालिकेत बलविंदर सिंग सोढीची भूमिका साकारत आहे.(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)
===============================
===============================
मात्र, गुरचरण सिंग यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केली तेव्हा ते पुन्हा चर्चेत आले होते. मुंबईला जाण्यासाठी २२ एप्रिल रोजी ते दिल्लीतील घरातून निघाले, पण त्यांनी मुंबईला जाण्यासाठी विमान पकडलेच नाही. आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस सातत्याने गुंतले होते. नंतर ते स्वत: परत आले. आणि त्यानंतर ते धार्मिक यात्रेला गेल्याचे ही समोर आले.