रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत….
सर्वप्रथम इ.स. १९६१ मध्ये युनेस्कोंच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने रंगभूमी दिवस जाहीर केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day) इ.स. १९६२ मध्ये साजरा झाला.त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो, यानिमिताने जगभरातील नाट्य जगतातील महत्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.
जागतिक रंगभूमीचा विचार करता त्याचा उगम ग्रीकमंडळींच्या “डामा’ मध्ये आढळतो. इंग्रजीतील ‘ड्रामा’ हा शब्द मूळ ग्रीक ‘इन (Dran) या शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ कृती करणे (टू डू) असा आहे. ‘डॉमेनॉन’ (Dramenon) म्हणजे केलेली कृती व ‘मायथॉस (Mythos) म्हणजे सांगितलेली कृती असा फरक प्राचीन ग्रीसमध्ये केला जाई. गावोगाव भटकून नाटके सादर करणारा थैस्पिस हाच ग्रीक नाटकाचा जनक.धार्मिक उत्सवाच्या निमिताने उदयास आलेल्या ग्रीक नाटकात निसर्ग आणि देवदेवता यांच्यावर अधिराज्य गाजविणाऱ्या नियतीला महत्त्व आहे.या नियतीचे दर्शन घडविणारी शोकात्मिका आणि समकालीन राजकीय, सामाजिक व कौटुबिक जीवनाचे दर्शन घडविणारी सुखात्मिका आणि हलकेफुलके विडंबननाट्य, हे ग्रीक नाटकांचे प्रमुख प्रकार. इ.स.पू. ५५० ते ३०० हा ग्रीक नाटकांचा कालखंड.
प्राचीन ग्रीक नाटकांत पाश्चिमात्य नाट्यकला दडलेली होती तिथे भारतीय नाट्यकलेचा विचार करता प्राचीन भारतामधील आर्य संस्कृतीमध्ये यज्ञयाग केंद्रस्थानी होते. त्यांच्या अनुष्ठानामध्ये अनेक गोष्टी अभिनय केल्यासारख्या करावयाच्या असत. वेदवाङ्मयामध्ये काही संवादसुक्ते आढळतात. या सुक्तांचे पठन करताना वाचिक अभिनय आणि हावभावांची जोड मिळून छोटे नाट्यप्रसंग सादर होत असावेत.
स.पू. दोनशे ते इ.स.दोनशे या चारशे वर्षाच्या दरम्यान केव्हातरी संस्कृत नाट्यलेखनापासून ते नाट्यप्रयोगाची इत्यंभूत माहिती देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ रचला गेला. भरत हा जाट्यशास्त्राचा कर्ता समजला जातो.
त्यानंतर रंगभूमी बदलत गेलेली दिसते आज जगभरातील रंगभूमीवर विविध प्रयोग सातत्याने सुरू असललेले आपण पाहू शकतो. कोरोनोकाळाने या कलेची अतिशय परीक्षा बघितली गेली.त्यातुन बाहेर पडून पुन्हा नव्याने उभे राहण्याचं आव्हान रंगभूमीने स्वीकारलं आहे. नव्या नियमासह नाटक प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत आणि हे जगभर होत आहे. यावर्षीच्या रंगभूमी दिनानिमित्त नटेश्वराकडे सर्व कलाकारांचं एकच मागणं राहील की रंगभूमी, कलाकार आणि रसिक यांनी २०२० मध्ये अनुभवलेला दुरावा पुन्हा न यावा. रंगदेवता आणि नाट्यरसिक याला विनम अभिवादन करत नाटकाचे प्रयोग उत्तरोतर रंगावे. सर्व नाट्यरसिकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा