Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Shaitaan 2 : नवे चेहरे आणि नवी कथा; वशीकरणाची नवी

Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’

अजय देवगणच्या Son of Sardar 2 ची रिलीज डेट जाहिर!

Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

The Kashmir Files चित्रपटाने देशाची मानसिकता कशी बदलली?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

यश चोप्रा यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना केले दिग्दर्शित !

 यश चोप्रा यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना केले दिग्दर्शित !
बात पुरानी बडी सुहानी

यश चोप्रा यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना केले दिग्दर्शित !

by धनंजय कुलकर्णी 06/07/2024

कधी कधी अगदी कपिलाषष्ठीचे योग जुळून येतात. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे सर्वोत्कृष्ट राजकारणी उत्तम वक्ते तर होतेच पण ते संवेदनशील कवी देखील होते. राजकारणासारख्या प्रांतात वावरून देखील त्यांनी त्यांच्यातील कवी कायम जिवंत ठेवला. वाजपेयी यांच्यातील कवी भारतीयांना त्यांच्या एकूणच जीवनशैलीमध्ये दिसून आला. त्यांच्या कवितांमधून मानवी जीवनातील अगम्य अशा प्रश्नांना त्यांनी तत्त्वचिंतक अशी उत्तरे दिली. काहीशा फिलॉसॉफिकल असणाऱ्या या कविता भारतीय नागरिकांना प्रचंड आपल्याशा वाटल्या. (Yash Chopra)

याच कवितांना घेऊन गायक आणि संगीतकार जगजीत सिंग यांनी २००२  साली ‘संवेदना’ हा एक म्युझिक अल्बम तयार केला. या अल्बममधील सर्व रचना अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिल्या होत्या. त्यावेळी ते देशाचे पंतप्रधान होते. नंतर या म्युझिक अल्बमचा व्हिडिओ बनवण्यात आला. या व्हिडिओमध्ये आपल्याला चक्क अटल बिहारी वाजपेयी दिसतात! त्यासोबतच शाहरुख खान देखील दिसतो. कवितेच्या आधीची प्रस्तावना अमिताभ बच्चन यांच्या स्वरात आपल्याला ऐकायला मिळते. या म्युझिक अल्बमचे दिग्दर्शन यश चोप्रा (Yash Chopra) यांनी केले होते.

जेव्हा अटलजींना घेऊन म्युझिक अल्बम बनवायचा ही संकल्पना समोर आली त्यावेळी अटलजी यासाठी तयार होतील का अशी शंका सर्वांच्या मनात होती. तरीही दिग्दर्शक यश चोप्रा (Yash Chopra) प्रचंड आशावादी होते ते सरळ अटलजींना जावून भेटले आणि त्यांनी या प्रोजेक्टची कल्पना त्यांना दिली. अटलजींनी हसत हसत या प्रोजेक्टला मान्यता दिली आणि, ”मी कशाप्रकारे अभिनय करायचा हे तुम्ही ठरवा.“ असे सांगितले. अटलजी पुढे म्हणाले, ”आता तुम्ही एका पंतप्रधानाला दिग्दर्शित करीत आहात असे विसरून जा. तुम्ही एक उत्तम दिग्दर्शक आहात आणि मी एक कवी आहे असे समजून तुम्ही दिग्दर्शन करा. तुम्ही उत्तम दिग्दर्शक आहात हे मला माहिती आहे!” अटल बिहारी वाजपेयी यांच्या या शब्दांनी यश चोप्रा निश्चिंत झाले.

========

हे देखील वाचा : देव आनंदच्या सिनेमाला सेंसर बोर्डाने सुचवले ७२ कट्स…

========

या म्युझिक व्हिडीओ अल्बममध्ये अटल बिहारी वाजपेयी कविता लिहिताना, विचार करताना, चालताना दिसतात. ‘क्या खोया क्या पाया’ या कवितेच्या व्हिडिओमध्ये अटलजी ठळकपणे आपल्याला दिसतात. यश चोप्रा यांनी नंतर सांगितले की, ”अटलजी एवढे मोठे व्यक्ती. पण त्यांनी आज्ञा धारकप्रमाणे माझ्या सर्व सूचना मान्य केल्या आणि एका टेकमध्ये सर्व शूट संपले!” या अल्बममध्ये अमिताभ बच्चन यांच्या स्वरात जी प्रस्तावना आहे ती जावेद अख्तर यांनी लिहिली होती.

या अल्बमचे प्रकाशन भारतरत्न पं. रविशंकर यांच्या हस्ते झाले. एकूणच हा अल्बम खूप चांगला बनला होता. पण त्याची फार चर्चा त्या काळात का झाली नाही हे कळत नाही. आज जेव्हा आपण हा अल्बम युट्युबवर बघतो तेव्हा लक्षात येते की इतके ग्रेट लोक एका म्युझिक अल्बमसाठी एकत्र आले होते! अटलजी यांनी लिहिलेली ती कविता पहा. (Yash Chopra)

क्या खोया क्या पाया जग में,

मिलते और बिछड़ते मग में,

मुझे किसी से नहीं शिक़ायत,

यद्द्पि छला गया पग पग में। 

एक दृष्टि बीती पर डालें,

यादों की पोटली टटोलें,

अपने ही मन से कुछ बोलें। 

पृथ्वी लाखों वर्ष पुरानी,

जीवन एक अनन्त कहानी,

पर तन की अपनी सीमाएँ,

यद्द्पि सौ शरदों की वाणी। 
इतना काफ़ी है अंतिम दस्तक,

पर ख़ुद दरवाज़ा खोलें,

अपने ही मन से कुछ बोलें।

जन्म मरण का अविरत फेरा,

जीवन बंजारों का डेरा,

आज यहां कल कहाँ कूच है,

कौन जानता किधर सवेरा। 

अँधियारा आकाश असीमित,

प्राणों के पंखों को तौलें,अपने ही मन से कुछ बोलें। 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Atal Bihari Vajpayee director Featured politician prime minister samvedna yash chopra
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.