Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Yash Johar : मिठाईचं दुकान ते धर्मा प्रोडक्शन्स…
हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मोजक्या प्रोडक्शन हाऊसला इतिहास आहे… यातील धर्मा प्रोडक्शन हाऊसने आजवर बॉलिवूडला एकाहून एक सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले आहेत… आज धर्मा प्रोडक्शन्सचे सर्वेसर्वा असणारे यश जोहर यांची जयंती… आज याच दिनानिमित्त जाणून घेऊयात यश जोहर यांनी धर्मा प्रोडक्शनची सुरुवात कशी केली होती?
तर, चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये या बॅनरचं नाव येतं. धर्मा बॅनरच्या अंतर्गात आतापर्यंत ६० पेक्षा अधिकचित्रपट बनवण्यात आले आहेत. धर्मा प्रोडक्शन्सची सुरुवात यश जोहर यांनी १९७६ मध्ये केली होती… यश यांचा जन्म लाहौरमधला… देशाची फाळणी झाल्यानंतर यश यांचं कुटुंब दिल्लीत आलं… दिल्लीत यश यांच्या वडिलांनी मिठाईचं दुकान सुरु केलं… यश वडिलांना दुकान सांभाळण्यात मदत करु लागले… मिठाईच्या दुकानात हिशोब करण्याची जबाबदारी यश यांच्यावर सोपवण्यात आली… मात्र, यश जोहर यांना ते फारसं आवडलं नव्हतं….

काही दिवसांनी यश जोहर यांच्या आईने त्यांना सांगितलं की, तुझा जन्म मिठाईच्या दुकानात बसण्यासाठी झाला नाही… आईचं वाक्य मनाशी पक्क करुन यश जोहर यांनी मुंबई गाठली… त्यांनी एका न्यूज पेपरमध्ये फोटोग्राफर म्हणून काम केलं…. असं सांगितलं जातं की, त्यावेळी सुपरस्टार मधुबाला कधीच कोणाला फोटो काढू देत नव्हत्या… परंतु, यश जोहर यांच्या इंग्रजीनं त्या प्रभावित झाल्या आणि त्यांचे फोटो त्यांनी काढण्यासाठी यश यांना परवानगी दिली…त्यानंतर १९५२ मध्ये सुनील दत्त यांच्या प्रोडक्शन हाऊस ‘अजंला आर्ट्स’ यश जोहर यांनी जॉईन केलं…

पुढे यश यांनी सह निर्माता म्हणून देवानंद यांच्या प्रोडक्शन हाऊस ‘नवकेतन फिल्म्स’ साठी काम करु लागले. देवानंद यांच्या प्रोडक्श हाऊसमधून त्यांनी ‘गाइड’, ‘ज्वैल थीफ’, ‘प्रेम पुजारी’ आणि ‘हरे रामा हरे कृष्णा’ सारखे चित्रपट बनवले… त्यानंतर यश जोहर यांनी पुरेसा अनुभव गाठीशी घेऊन १९७६ मध्ये स्वत:ची कंपनी सुरु केली… आणि या धर्मा प्रोडक्शन हाउसमधून त्यांनी पहिला चित्रपट बनवला ‘दोस्ताना’…. राज खोसला यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली होती… पुढे, ‘मुक्कदर का फैसला’, ‘कुछ कुछ होता है’, ‘राझी’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘अग्निपथ’, ‘कल हो ना हो’ अशा बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती…
====================================
====================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi