Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Ye Re Ye Re Paisa 3 : अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा नवा घोटाळा!
मराठी प्रेक्षकांची मने जिंकणारी सुपरहिट फ्रँचायझी ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. धमाल विनोद, कमाल कथा आणि एकाहून एक भन्नाट पात्रे घेऊन ‘ये रे ये रे पैसा ३’ येत्या १८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे. (Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie)
दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात,‘ये रे ये रे पैसा ३’ हा या फ्रँचायझीच्या प्रवासातील एक मजेशीर नवीन टप्पा आहे. यातून होणारे प्रेक्षकांचे मनोरंजन हेच आमचे बळ आहे. यावेळी तिसऱ्या भागात तिप्पट मनोरंजन व एक वेगळा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल,जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.” (Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie)

==============================
==============================
‘ये रे ये रे पैसा ३’ मध्ये कॉमेडीचा ट्रिपल धमाका असून एका नव्या मोठ्या गोंधळाची धमाल कहाणी उलगडणार आहे. यावेळी पाच कोटींचा आर्थिक घोटाळा आणि ते सुटवण्याच्या प्रयत्नात अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांच्यासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहाणे रंजक ठरेल. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले असून या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळतील.