Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Ye Re Ye Re Paisa 3: ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाण्यामध्ये दिसणार बबलीचा स्वॅग!
प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असलेल्या ‘येरे येरे पैसा ३’ या मराठी चित्रपटातील आणखी एक धमाल गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘आली रे आली गुलाबाची कळी’ असं या गाण्याचं नाव असून, या गाण्याने सध्या सोशल मीडियावर चांगलाच जोर पकडला आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे बबलीचा बोल्ड, बिनधास्त आणि ग्लॅमरस अंदाज. बबलीच्या दिलखेच अदा, स्टाईल आणि स्वॅग गाण्यातून झळकत असून, प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतो आहे.(Ye Re Ye Re Paisa 3 Song)

या गाण्याच्या प्रदर्शनाआधी चित्रपटाच्या टीमने शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या आशीर्वादाने हे गाणं प्रदर्शित केलं. गाण्याला गायिका बेला शेंडे यांचा सुमधुर आवाज लाभला असून, संगीतकार पंकज पडघन यांनी त्याला दमदार संगीत दिलं आहे. या गाण्याचे बोल सचिन पाठक यांनी लिहिले आहेत आणि नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांनी केलं आहे. सर्व घटक एकत्र येऊन तयार झालेलं हे गाणं प्रेक्षकांना आकर्षित करतंय.

दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात की, ‘येरे येरे पैसा ३’ हा पूर्णपणे मनोरंजनाची मेजवानी असलेला सिनेमा असून, प्रत्येक पात्राची स्वतःची अशी एक ओळख आहे. त्यात बबली हे पात्र विशेष लक्षवेधी आहे आणि तिचा स्वॅग दाखवणारं हे गाणं त्यात मोलाची भर घालणार आहे. संगीतकार पंकज पडघन म्हणतात की, बबली या पात्राला प्रेक्षकांनी आधीपासूनच खूप प्रेम दिलं आहे, त्यामुळे तिच्यावरचं गाणंही तितकंच खास असायला हवं होतं. गाण्याचे बोल, संगीत, आवाज आणि नृत्य या सगळ्यांची सांगड इतकी सुरेख जमून आली आहे की हे गाणं प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.(Ye Re Ye Re Paisa 3 Song)
===========================
हे देखील वाचा: Avkarika Movie Trailer: पथनाट्याने रंगला ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा !
===========================
‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये धर्मा प्रॉडक्शन्स, अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट यांचा समावेश आहे. या चित्रपटाचे निर्माते सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, गिरीधर धुमाळ असून, सहनिर्माते सौरभ लालवाणी आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात आणि जयवंत वाडकर यांसारख्या ताकदवान कलाकारांचा समावेश आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपटलवकरच रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा धमाल चित्रपट आणि त्यातलं हे नवचैतन्यपूर्ण गाणं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार, हे नक्की.