Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाच्या ‘प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या

Banjara Marathi Movie: ‘भावनांची भटकंती’, ‘बंजारा’ सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित…

Mahavatar Narsimha Movie: नृसिंह जयंतीनिमित्त ‘महावतार नरसिंह’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; ‘पाच भाषणांमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

यल्लो…ची जादू

 यल्लो…ची जादू
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

यल्लो…ची जादू

by सई बने 06/04/2020

जिद्द…चिकाटी…आत्मविश्वास…या सर्वांचा संगम म्हणजे यल्लो चित्रपट….

4 एप्रिल रोजी या चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण झाली. मंडळी आठवलं का, एक स्पेशलचाईल्ड…तिची आई…मुलगी अशी कशी म्हणून त्रस्त झालेले वडील. वडीलांच्या या  वागण्याला कंटाळून या स्पेशल मुलीला एकाट्यानं वाढवण्यासाठी सज्ज झालेली आई. मुलीचा मामा…आणि मुलीला, ती स्पेशल नाही तर सुपर स्पेशल असल्याची जाणीव करुन देणारा स्विमींगचा कोच…हो. तोच चित्रपट मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये यांच्या अभिनयानं सजलेला. आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्या दिग्दर्शन प्रवासाचा पहिलाच टप्पा सुपर हिट करणारा…यल्लो…

यल्लो ही एक सत्यकथा आहे. गौरी गाडगीळ यांचा प्रेरणादायी प्रवास. जन्मत: असलेल्या ‘डाऊन सिंड्रोम’ मुळे ‘स्पेशल चाइल्ड’ हे बिरुद कायम स्वरुपी चिटकलेली गौरी परिस्थितीबरोबर लढत या स्पेशल लेबलच्या पुढे जाते. हा प्रवास पडद्यावर अनेकांना प्रेरणा देऊन गेलाय. चित्रपटात गौरीनं स्वतःची भूमिका साकारली आहे.

आज सहा वर्षानंतरसुद्धा हा चित्रपट बघतांना नव्यानं बघतोय असं वाटतं. महेश लिमयेनं या चित्रपटात जादू केलीय. अगदी छोटे छोटे संवाद जिवनाचा अर्थ  सांगतात…आपली मुलगी अशी स्पेशल आहे, तिला नाकारणारे वडील. या गौरीच्या आईची काय अपेक्षा असते, ती कधीतरी तिच्या पायवर उभी राहील, एवढीच. आपणा सर्वांच्या आपल्या मुलांकडून याच अपेक्षा असतात…पण गौरी ही स्पेशल आहे. तिच्या आईला हा स्पेशलपणाच संपवायचा असतो. ती तिला शाळेत घालते. इथे तिचं आणि पाण्याचं जवळचं नातं आहे, हे शिक्षक जाणतात. आपल्या मुलीकडून काही अपेक्षा करणा-या आईला, या मुलांकडून काही अपेक्षा करण्यापेक्षा त्यांना आपण म्हणजेच समाजानं स्विकारणं महत्त्वाचं आहे, हे आईला समजवून सांगतात…

या सर्वांत मजा आणली आहे ती उपेंद्र लिमयेनं. स्विमींगचा कोच…काहीसा कडक..पण गौरीला तो तिची ओळख देतो…तरीही आईला कुठेतरी भीती असते. आपली मुलगी हरली तर…इथे तिचा मामा तिच्या सोबत असतो. ऋषीकेश जोशीनं अगदी ख-याखु-या मामाची भूमिका साकारली आहे. मामा आणि भाचेमंडळी हे अजोड नातं असतं. इथंही तसंच आहे. आपली भाची स्पेशल असली तरी हा मामा तिच्यावर तेवढंच प्रेम करतो. तो आपल्या बहिणीला समजावतो, जो मुळात शुन्यावर असतो, त्याला हरण्याची कधीही भीती नसते, हे साधे आणि सोप्पे सत्य….


आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताकडून गौरीची निवड होते. पण यावेळी झालेली स्पर्धा लक्षवेधक असते. गौरीचा अभिनय आणि महेश लिमयेंचं दिग्दर्शन यांची जादू या सिनमध्ये पहायला मिळते. महेशनं एक दिग्दर्शक आणि सिनेमोटोग्राफर म्हणून या शेवटच्या सिनमध्ये अक्षरशः प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. निकालाची उत्सुकता…पाण्याखाली होण्या-या शूटची कमाल…असा संगम या सिनमध्ये केला आहे. गणेश पंडीत आणि अंबर हडप यांनी ‘यलो’चे लेखन केले आहे. गतीमंद मुल आहे म्हणून कुठेही अरे…अरे…अशी भावना नाही. गेली अनेक वर्ष सिनेमोटोग्राफर म्हणून काम करणारे महेश लिमयेंनी आपला सगळा अनुभव या चित्रपटात लावलाय. त्यामुळे गौरीच्या भोळ्या चेह-याचे भाव आपलेसे करतात. चित्रपट बघतांना आपण काही सेटमधलं बघतोय असं वाटत नाही. तर हे प्रत्यक्षात आहे, असं वाटावं असं चित्रीकरण आहे. एकूण काय रितेश देशमुख निर्माता असलेला यल्लो चित्रपट या सुट्टीमध्ये बघायला मिळाला तर नक्की बघा. कधीही हरायचं नसतं. जिथे अपयश आहे, असं वाटतंय तिथेच यश लपलेलं असतं. फक्त त्यासाठी थोडी मेहनत करायची गरज असते. हेच हा यल्लो सांगतो.

– सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Featured Indian Cinema Marathi Movie movies Top Films
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.