Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Yere Yere Paisa 3 Movie Trailer: ‘५ कोटींचा खेळ कोण जिंकणार? १८ जुलै ला उलघडणार !
मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार एण्ट्री करत, ‘येरे येरे पैसा ३’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर एका भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आला. या प्रसंगी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि बॉलिवूडचे अॅक्शन मास्टर रोहित शेट्टी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला एक वेगळीच झळाळी मिळाली. आधीच प्रदर्शित झालेल्या धमाल गाण्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली होती. आता ट्रेलरमधून समोर आलेल्या भन्नाट कथानकाने ती उत्सुकता अजूनच उंचावली आहे.(Yere Yere Paisa 3 Movie Trailer)

या ट्रेलरमध्ये दिसतंय तब्बल ५ कोटी एवढी मोठी रक्कम आणि सोन्याची बिस्किटं! आणि त्यासाठी सुरू होते एक धावपळ, एक गोंधळ, आणि त्या पैशांच्या मागे लागलेले अनेक रंगीबेरंगी पात्रं. पण या कोट्यावधींच्या रकमेवर अखेर झेंडा कोण फडकवणार? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला १८ जुलैपासून चित्रपटगृहात जावंच लागेल!

ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयीचं आपलं मत स्पष्ट करत सांगितलं, “अमेय खोपकर या सिनेमाचा तिसरा भाग घेऊन येत आहेत, हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. ‘येरे येरे पैसा’ सिनेमाचा हा तिसरा भाग म्हणजे खराखुरा मैलाचा दगड आहे. धमाल ट्रेलर, दमदार कलाकारांची फौज – हे यशस्वी ब्लॉकबस्टरचं सगळं गणित जुळून आलंय. पहिले भाग हिट होते , आणि तिसरा भाग तसंच यश खेचून आणतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.” दरम्यान, बॉलिवूडच्या अॅक्शन किंग रोहित शेट्टी यांनीही आपल्या खास शैलीत चित्रपटाचं कौतुक करत म्हटलं, “ट्रेलर पाहिल्यावर एकच शब्द , कमाल! ‘येरे येरे पैसा ३’ म्हणजे बॉलिवूड लेव्हलचा मसालेदार एंटरटेनमेंट पॅकेज आहे. दिग्दर्शक संजय जाधव आणि त्यांची टीम यांनी अफलातून काम केलं आहे. माझ्याकडून संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.”(Yere Yere Paisa 3 Movie Trailer)
=====================================
हे देखील वाचा: Prajakta Gaikwad लवकरच अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण…
=====================================
दिग्दर्शक संजय जाधव यांनी मात्र या प्रसंगी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, “चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सुरुवातीपासूनच माझ्या मनात एकच इच्छा होती. या ट्रेलर लाँचला राज ठाकरे आणि रोहित शेट्टी उपस्थित राहावेत. आणि ती इच्छा पूर्ण झाली. पहिल्या भागाला रोहित शेट्टी आले होते, आणि तो सुपरहिट ठरला. त्यामुळे तिसऱ्या भागासाठी त्यांची उपस्थिती पुन्हा हविच होती. ‘येरे येरे पैसा ३’ करताना आमच्यावर जबाबदारी तिपटीने वाढली होती. पण आम्ही हसवणं, विचार करायला लावणं आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं हे सगळं एकत्र गुंफलंय. मला खात्री आहे, प्रेक्षक तिसऱ्या भागावरही भरभरून प्रेम करतील.” संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे.