Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

Yesudas : ‘मधुबन खुशबू देता है…’ गाण्याच्या रेकोर्डिंगचा किस्सा!
सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा बॉलीवूडमध्ये ॲक्शन चित्रपटांची चलती होती आणि चित्रपट संगीताचा ट्रेंड देखील बदलत चालला होता. त्याच काळात मेलडी असलेली गाणी देखील येत होती. विशेषतः राजश्री प्रोडक्शन, ऋषिकेश मुखर्जी, Basu Chatterjee यांचे चित्रपट तसेच काही जुन्या संगीतकारांचे चित्रपट यातून सुरेल संगीत रसिकांच्या भेटीला येत होते. याच काळामध्ये दक्षिणेतून आलेले गायक येसुदास (K. J. Yesudas) यांनी देखील आपल्या स्वराने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. Yesudas यांच्या स्वरात कमालीचा गोडवा होता.

सत्तरच्या दशकात त्यांनी गायलेल्या अनेक गीतांनी स्वरांचे नंदनवन उभे केले होते. त्यांच्या एका गाजलेल्या गाण्याच्या मेकिंगचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. संगीतकार उषा खन्ना यांच्या संगीतात गायलेल्या गीताचा हा किस्सा होता. उषा खन्ना आणि येसुदास (Yesudas) पहिल्यांदा एकत्र आले १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दादा’ या चित्रपटाच्या वेळी. जुगल किशोर दिग्दर्शित हा खरंतर टोटली कमर्शियल सिनेमा होता. मारधाड ॲक्शन असे याचे स्वरूप होते. खरं तर अशा चित्रपटांमध्ये संगीताला अशी किती जागा असणार? (Untold stories)
पण संगीतकार उषा खन्ना यांनी या चित्रपटांमध्ये अप्रतिम चित्र संगीत देऊन चित्रपटाला यशाच्या शिखरावर घेऊन पोहोचवलं. या सिनेमात येसुदास पहिल्यांदाच उषा खन्ना यांच्याकडे गाणार होते. कुलवंत सिंग जानी लिखित गीताचे बोल होते ‘दिल के तुकडे तुकडे करके मुस्कुराके चल दिये…’ हे गाणं त्या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्याला फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बेस्ट मेल सिंगरचा पुरस्कार देखील मिळाला होता. Dada या चित्रपटाची गाणी १९७८ मध्येच तयार झाली होती. पण चित्रपट मात्र उशिरा प्रदर्शित झाला.

याच काळात उषा खन्ना सावन कुमार टाक यांच्या ’साजन बिना सुहागन’ या चित्रपटाला संगीत देत होत्या. या सिनेमातील एक गाणं त्यांनी येसुदास (Yesudas) यांना गायला दिले. खरं तर या गाण्याचे या चित्रपटात अनेक व्हर्शन आहेत. येसुदास यांनी या गाण्याची भरपूर रिहर्सल केली. रेकॉर्डिंगच्या दिवशी मेहबूब स्टुडिओमध्ये संध्याकाळी चार वाजता गाण्याची रेकॉर्डिंग ठरले. सर्व वादक संगीतकार वेळेवर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये हजर झाले. परंतु गायक येसुदास यांचा मात्र पत्ताच नव्हता. सर्वजण त्यांची वाट पाहत राहिले. (Entertainment mix masala)
येसुदास खरंतर वेळेच्या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर असलेले कलाकार होते. पण आज मात्र त्यांच्याकडून वेळ होत होता याचे उषा खन्ना यांना आश्चर्य वाटले तरी. त्यांनी वादकांना रिहर्सल करायला सांगितले. यानंतर तब्बल तीन तासांनी सात वाजता स्टुडीओ दरवाजा उघडला आणि येसुदास आत आले. त्यावेळी ते नख शिखांत भिजले होते. उषा खन्ना यांनी त्यांना विचारले, ”तुम्ही एवढे भिजून कसे आलात?” त्यावर येसुदास (Yesudas) म्हणाले, ”उषाजी, तुम्ही स्टुडीओच्या आत आहात. बाहेर मुंबईत प्रचंड पाऊस चालू आहे. मी खरंतर खूप आधी घरातून निघालो होतो. पण मुंबईमध्ये इतका प्रचंड पाऊस चालू आहे की माझी टॅक्सी मला दोन किलोमीटर लांब सोडावी लागली आणि तिथून मी भर पावसात चालत चालत स्टुडिओत आलो आहे. त्यामुळे मी पूर्ण भिजलो आहे !”

उषा खन्ना म्हणाल्या, ”अहो आम्हाला कळवायचे. आपण रेकोर्डिंग पुढे ढकलले असते.” त्यावर येसुदास (Yesudas) म्हणाले, ”धन्यवाद. पण माझ्यामुळे आपले सर्वांचे नुकसान होवू देणे मला पटत नव्हते. म्हणून मी आलो. Duty First..!” उषा खन्ना यांनी त्यांना थोडा आराम करायला सांगितला. तिथेच नवीन गरम कपडे मागवण्यात आले आणि चहा आणि नाश्ता झाल्यानंतर गाण्याची रिहर्सल सुरू झाली. चित्रपटात गाण्याच्या अनेक व्हर्शन असल्यामुळे सर्व गाणी त्याच दिवशी रेकॉर्ड झाली. सिनेमात हे गाणे चार वेळेला येते. यातील तीन गीतात येसुदास यांचा स्वर आहे. पहाटे चार पर्यंत रेकॉर्डिंग झालं. गाण्याचे बोल होते ‘मधुबन खुशबू देता है…’ या गाण्याच्या एका व्हर्शनमध्ये येसुदास यांच्यासोबत अनुराधा पौडवाल यांचा देखील स्वर आहे.
============
हे देखील वाचा : Sarika आणि कमलहसन : अधुरी एक कहाणी !
============
भर पावसामध्ये येसुदास (Yesudas) यांनी दोन किलोमीटर चालत येऊन मेहबूब स्टुडिओ गाठला आणि गाण्याची रेकॉर्डिंग केले. २७ ऑक्टोबर १९७८ रोजी प्रदर्शित झालेला ‘साजन बिना सुहागन’ (sajan bina suhagan) हा चित्रपट सुपरहिट झाला. सावन कुमार यांचा हा पहिलाच गोल्डन जुबली हिट सिनेमा होता. सावन कुमार यांच्या बहुतेक सर्व चित्रपटांना संगीत उषा खन्ना यांचे असायचे आणि सर्वच चित्रपटातील गाणी ही अतिशय मधुर आणि श्रवणीय अशी होती.
येसुदास (Yesudas) यांनी उषा खन्ना यांच्याकडे गायलेलं पहिलं गाणं ‘दादा’ या सिनेमातील ‘दिल के तुकडे तुकडे करके …’ होतं. तो सिनेमा मात्र उशिरा १९७९ मध्ये प्रदर्शित झाला!