
पाकिस्तानमध्ये कधी येणार? Alia Bhatt हिच्या उत्तराने वेधलं लक्ष
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने नुकतीच दुबईच्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली होती… जगभरातील कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला… यावेळी मुलाखतीत आलिया भट्ट हिला एका पाकिस्तानी चाहत्याने पाकिस्तानला कधी येणार? असा प्रश्न विचारला… त्यावर नेमकं आलियाने काय उत्तर दिलं आहे जाणून घेऊयात… (Entertainment)
तर, आलिया भटने रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक विषयांवर चर्चा केली… यावेळी नेपोटिझन, करिअरची सुरुवात, यश-अपयश आणि आता पालकत्व अशा विविध विषयांवर तिने आपली मतं मांडली… यावेळी मुलाखतीत तिला एका चाहत्याने विचारलं की, ‘ग्लोबल स्टेजवर भारताचं प्रतिनिधित्व करताना दडपण येतं का?’ यावर आलिया म्हणाली, “भारतीय म्हणून उलट माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे”… पुढे एका पाकिस्तानी चाहत्याने तिला विचारलं की, ‘पाकिस्तानमध्ये कधी येणार?’ तेव्हा आलिया म्हणाली,“कामासाठी मला जिथेही जावं लागेल तिथे मी आनंदाने जाईन.”

दरम्यान, तिच्या या उत्तराची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. जर का भविष्यात एखाद्या चित्रपटासाठी तिला पाकिस्तानमध्ये जावं लागलं तर ती जाईल असं तिने दिलेल्या उत्तरातून काही अंशी स्पष्ट होतंय… त्यामुळे कुठेतरी आलियाने स्वत:लाच ट्रोल करण्याचं कारण दिलं आहे असं म्हणायला हरकत नाही… आता याचा परिणाम पुढे काय होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे… (Alia Bhatt Statement on Pakistan)

दरम्यान, यावेळी आलियाला नेपोटिझमवरही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली की, “तुम्ही कोणत्याही कुटुंबातले असो शेवटी तुमच्यात किती टॅलेंट आहे तेच महत्वाचं आहे. जेव्हा प्रेक्षक तुम्हाला योगदान देताना पाहतात तेव्हा सगळं माफ असतं.” लेक राहाबद्दल आणि वर्क-लाईफ बॅलन्सवर आलिया म्हणाली, “राहाने (Raha Ranbir Kapoor) आता पापाराझींसोबतही वेगळं कनेक्शन बनवलं आहे. ती आता इतकी मोठी झाली आहे की मी कुठेही जात असताना ती मला विचारते की मी कुठे जातीये? परत कधी येणार? आई झाल्यानंतर काम आणि वैयक्तिक आयुष्यत समतोल राखणं हे अगदी परफेक्ट जमेल असं नाही. पण निभावून घेण्याची क्षमता नक्कीच तयार होते”… (Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor यांनी नव्या घरात केला गृहप्रवेश!
================================
आलिया भट्ट २०२४ मध्ये रिलीज झालेल्या ‘जिगरा’ (Jigara) चित्रपटात दिसली होती… त्यानंतर आता लवकरच यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समधील आगामी ‘अल्फा’ (Alpha) चित्रपटात ती शर्वरी वाघसोबत दिसणार आहे… याशिवाय संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अॅण्ड वॉर’, ‘ब्रम्हास्त्र २’ या चित्रपटांचाही ती भाग असणार आहे… (Alia Bhatt Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi