Avkarika Marathi Movie: ‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; स्वच्छता दूताच्या

लग्नाच्या 6 वर्षांनंतर Yuvika Chaudhary होणार आई? पती Prince Narula ने दिले संकेत
‘बिग बॉस 9‘ फेम युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा प्रिन्स त्याची बायको युविका प्रेग्नेंसी असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. झालं असं की, प्रिन्स आणि युविका यांनी अशी हिंट दिली आहे ज्यानंतर चाहते अंदाज बांधत आहेत की दोघेही लवकरच पालक होणार आहेत. मात्र, या जोडप्याने अद्याप अशी कोणतीही बातमी ऑफिशियली सांगितलेली नाही. युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांची लव्हस्टोरी बिग बॉसमध्येच सुरू झाली होती. ऑक्टोबर 2018 मध्ये दोघांनी लग्न केले होते. आता 6 वर्षांनंतर दोघेही आई-वडील होणार असल्याच्या बातम्या तूफान पसरु लागल्या आहेत. पण असा अचानक का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना आधी जाणून घेऊयात सविस्तर.(Yuvika Chaudhary Pregnancy News)

भारती सिंगच्या शोनंतर युविका चौधरीच्या प्रेग्नेंसीच्या अफवा सुरू झाल्या आहेत. खरं तर प्रिन्स हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये दिसला होता. जिथे भारतीने प्रिन्सला मुलाबद्दल विचारणा केली. कॉमेडियन म्हणाली, ‘तुझा गोला कधी येणार आहे?’ ज्यानंतर प्रिंस ने जे उत्तर दिल तिथूनच त्यांच्या पालक होण्याची चर्चा रंगू लागली. आता खुद्द प्रिन्सच्या तोंडून ही गोष्ट बाहेर पडल्याने अशी चर्चा होणारच होती. यानंतर प्रिन्सची पत्नी युविकाचा ही एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून चाहते कमेंट करत आहेत की लवकरच आई होणार् या युविकाचे खूप खूप अभिनंदन. त्यात एक फोटोही आहे ज्यात युविका पोट झाकताना दिसत आहे.

भारती सिंगच्या शोमध्ये बेबी प्लॅनिंगबाबत प्रिन्स म्हणाला की, ”तो आणि युविका नेहमीच मुलांशी जोडले गेले आहेत. पण मुंबईत स्वतःच घर असेल तेव्हा ही जबाबदारी आपण घेणार आहेत, असा त्यांचा विश्वास होता.(Yuvika Chaudhary Pregnancy News)
===========================
============================
आता काही काळापूर्वी या दोघांनी मुंबईत एक घरही विकत घेतलं आहे. त्यामुळे आता दोघांकडून लवकरच ही खुशखबर ऐकायला मिळेल, असं चाहत्यांना वाटत आहे. मात्र, दोघांच्या अधिकृत वक्तव्याची अद्याप चाहत्यांना प्रतीक्षा आहे.