‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आर के फिल्मच्या ‘हिना’ ची नायिका झेबा आता करते तरी काय?
आर के फिल्मचा राम तेरी गंगा मैली हा चित्रपट १९८५ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर लगेच राज कपूरने त्याच्या पुढच्या चित्रपटाची आखणी करायला सुरुवात केली. हा विषय त्याच्या डोक्यात खूप आधीपासून होता. चित्रपटाचे नाव होतं ‘हीना’. या सिनेमात त्यांना नवीन अभिनेत्री हवी होती. तिचा शोध सुरू झाला आणि पाकिस्तान मधील जेव्हा झेबा बख्तियार हिची या भूमिकेसाठी निवड झाली. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीस वर्षे अधिक कालावधी लोटला आहे. तरी लोक अजूनही झेबाला विसरलेले नाहीत. पण झेबा आज कुठे आहे? काय करते आहे? बॉलीवूड मधून ती लगेच गायब कशी झाली ? झेबा आता कुठे आहे ? नक्की काय करत आहे ? जाणून घेवूयात.
झेबाचा जन्म ५ नोव्हेंबर १९६५ रोजी क्वेट्टा बलुचिस्तान येथे झाला. ती एका अतिशय सुशिक्षित आणि अत्यंत प्रतिष्ठित घरातील मुलगी होती. तिचे वडील याह्या बख्तियार स्वतंत्र पाकिस्तानचे ॲटर्नी जनरल होते. स्वातंत्र्यापूर्वी ते मुस्लिम लीगचे कार्यकर्ते होते. बॅरिस्टर जीना यांचे ते खास मित्र होते. पाकिस्तान संविधान तयार करण्याच्या कमिटीतील ते एक सदस्य होते. झेबाची आई हंगेरियन होती. चाळीसच्या दशकात इंग्लंडमध्ये त्या दोघांचे प्रेम जमले आणि मुस्लिम धर्म स्वीकारून ती पाकिस्तानात आली. झेबाचे बालपण कराची आणि लाहोर येथे गेले. तिला दोन भाऊ आहेत सलीम आणि करीम. हे दोघे डॉक्टर आहेत आणि एक सायरा नावाची बहिण आहे. झेबा लहानपणापासूनच दिसायला अतिशय सुंदर. जणू गुलाबाची कळीच. वयाच्या १८ व्या वर्षीच तिने पहिला निकाह केला सलमान गालीयानी या उद्योगपती सोबत. वर्षभरात एका मुलीची आई झाली. पण तिचे हे लग्न फार काही टिकले नाही. काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला. नंतर झेबाने आपल्या मुलीला आपल्या बहिणीकडे दत्तक दिले.(Henna)
त्यानंतर झेबाने आपले शिक्षण पुढे चालू ठेवले. आर्ट,कल्चर,म्युझिक यात तिला जास्त रुची. तिच्या काही मित्रांनी तिला मॉडेलिंग आणि टीव्ही सिरीयलमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. तिच्या घरचे सर्वजण हायली क्वालिफाईड जरी असले तरी समाजात मात्र मनोरंजन क्षेत्रात तिने करिअर करू नये असेच वातावरण होते. पण त्या सर्वांशी बंड करून १९८६ साली झेबाने पाकिस्तान टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘अनारकली’ या मालिकेत प्रमुख भूमिका केली आणि संपूर्ण पाकिस्तानात तिच्या सौंदर्याचा आणि अभिनयाचा बोलबाला झाला. तिच्या सौंदर्याची खबर इकडे भारतात राज कपूरला देखील झाली. राज कपूरने तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आपल्या ‘हिना’ या चित्रपटासाठी तिला साईन केले. चित्रपटाचे शूटिंग चालू असताना राज कपूरचे निधन झाले. पुढे त्याचा मोठा मुलगा रणधीर कपूरने दिग्दर्शन करीत चित्रीकरण पूर्ण केले. ‘हिना’ या चित्रपटात दोन नायिका होत्या एक झेबा आणि दुसरी अश्विनी भावे. २८ जून १९९१ रोजी ‘हिना’ प्रदर्शित झाला. सुपर हिट झालां. झेबाची भूमिका रसिकांना खूप आवडली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात या चित्रपटाला उदंड यश मिळाले. (Henna)
झेबावर चित्रित ‘हिना’ (Henna) मधील गाणी आजही लोकप्रिय आहेत. खरं तर एका मुलीची आई असलेली झेबा बॉलीवूडमध्ये पहिल्याच सिनेमात क्लिक झाली. पण तिला इथे करिअर करता आले नाही. १९८९ साली हास्य अभिनेता जगदीप यांचा मुलगा अभिनेता जावेद जाफरी तिच्या प्रेमात पडला होता आणि त्या दोघांनी गुपचूप निकाह देखील केला होता. झेबाने हे नाकारले जरी असले तरी जावेद जाफरीने तो निकाहनामाच प्रसिद्ध केला होता. हे लग्न देखील फारसे टिकले नाही. या काळात आपला सलमान खान देखील तिच्या सौंदर्यावर लट्टू झाला होता. १९९२ साली गायक अदनाम सामी याच्यासोबत तिचा निकाल झाला. अदनान तिच्यापेक्षा चक्क नऊ वर्षांनी लहान होता. पण तो तिच्या सौंदर्यात पुरता पागल झाला होता आणि त्यातूनच त्याने तिच्याशी निकाह केला. त्या दोघांना एक मुलगा देखील झाला. परंतु काही वर्षातच त्यांचा घटस्फोट देखील झाला.
=========
हे देखील वाचा : हिरो विश्वजित यांचा फिल्मी आणि सुरेल प्रवास
========
या काळात बॉलीवूडमधील तिचे करिअर लडखडत चालू होते. संजय दत्त सोबत ‘जय विक्रांता’ विनोद खन्ना सोबतचा ‘मुकदमा’ असे काही सिनेमे येत गेले पण कुठल्या सिनेमाला व्यावसायिक यश मिळाले नाही. त्यानंतर १९९५ साली ती पुन्हा पाकिस्तानात निघून गेली. तिकडे गेल्यानंतर लॉलीवुड मध्ये तिने ‘सरगम’ नावाचा एक चित्रपट केला. जो सुपरहिट ठरला नंतर तिने पाकिस्तानातच राहायचे ठरवले. ‘कैद’, चीफ साहेब’ हे तिचे पाकिस्तानातील सिनेमे गाजले. २००१ साली तिने ‘बाबू’ या पाकिस्तानी सिनेमाचे दिग्दर्शन केले. पाकिस्तान टीव्हीवरील काही मालिकांमधून तिने भूमिका केल्या त्यानंतर झेबाने पाकिस्तान २००८ साली सोहेल खान लगारी सोबत निकाह केला. हा तिचा चौथा निकाह होता! आज झेबा पाकिस्तान मध्ये डायबिटीस अवेअरनेस प्रोग्राममध्ये काम करत आहे. तसेच महिला फुटबॉलसाठी ती कार्यरत आहे. एकूणच देखणा चेहरा आणि चांगली अभिनय क्षमता असून देखील तिला करिअर करता आले नाही चार चार लग्न होऊन देखील ती संसारात रमली नाही.