‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

‘झी मराठी’वरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; ‘या’ दिवशी दाखवला जाणार शेवटचा भाग !
मराठी मनोरंजनविश्वात झी मराठीने आजवर अनेक दर्जेदार मालिका सादर केल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या मालिकांनी भावविश्व व्यापलं आहे. मात्र, प्रत्येक सुरुवातीला एक शेवट असतोच, आणि असाच एक शेवट ‘शिवा’ या लोकप्रिय मालिकेला येणार आहे. गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका आता बंद होणार आहे, आणि प्रेक्षकांना याचा नक्कीच खूप मोठा भावनिक धक्का बसेल. ‘शिवा’ ही मालिका पारंपरिक मालिकांपेक्षा काहीशी हटके होती. मालिकेच्या नायिकेचा स्वभाव, तिची जीवनशैली, तिचा दृष्टिकोन सगळंच प्रस्थापित चौकटींपेक्षा वेगळं होतं. ‘शिवा’ ही भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने साकारली होती, जी एकदम राउडी, ठाम आणि बिनधास्त स्वभावाची तरुणी आहे. घरात, समाजात किंवा सासरीसुद्धा ती कुणापुढे झुकत नाही. तिच्या कथेच्या प्रवासाने अनेक तरुणींना आत्मभान आणि प्रेरणा दिली.(Shiva Marathi Serial)

शिवाच्या आयुष्यातील सहचर ‘आशुतोष’ ही भूमिका अभिनेता शाल्व किंजवडेकर याने रंगवली होती. आशुतोषचा संयमी आणि समजूतदार स्वभाव, त्याचं शिवावर असलेलं प्रेम आणि साथ हे या मालिकेचं एक महत्त्वाचं अंग ठरलं. दोघांची जडणघडण, संघर्ष आणि नात्यांची गुंफण प्रेक्षकांना नेहमीच भावली. सध्या मालिकेत शिवा शिक्षण घेताना दाखवली आहे आणि लवकरच तिच्या शत्रूंचा म्हणजेच कीर्ती आणि तिच्या पतीचा खरा चेहरा उघड होणार आहे. मात्र, याआधीच मालिकेचा शेवट होणार असल्याने, ही कहाणी प्रेक्षकांना संपूर्ण पाहायला मिळणार का, याविषयी उत्सुकता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, TRP सतत कमी होत गेल्यामुळे वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ८ ऑगस्ट २०२५ रोजी या मालिकेचा ४९१ वा आणि शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेनंतर त्या वेळेत झी मराठीवर शिवानी सोनार हिची नवी मालिका ‘तारिणी’ सुरू होणार आहे. या मालिकेचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, प्रेक्षकांमध्ये ती पाहण्यासाठी खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.(Shiva Marathi Serial)
================================
हे देखील वाचा: Harshada Khanvilkar यांनी गणपतीला दिलं ‘शाहरुख’ हे नाव; कारण ही आहे खास !
================================
याशिवाय, प्रेक्षकांच्या लाडक्या विनोदी शोचा नव्या पर्वासह पुनरागमन होत आहे ‘चला हवा येऊ द्या 2’ यात यावेळी बऱ्याच गोष्टी नव्याने मांडल्या जाणार आहेत. तसेच नुकतीच सुरू झालेली ‘कमळी’ मालिका सुद्धा चांगला प्रतिसाद मिळवते आहे. मालिकांची ही ये-जा, पात्रांचे प्रवास, आणि नव्या गोष्टींचे स्वागत हे सर्व मराठी प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत आले आहे. आता ‘शिवा’ प्रेक्षकांचा निरोप घेत असली तरी तिच्या आठवणी कायम हृदयात जपल्या जातील यात शंका नाही.