Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘लाव रे तो व्हिडीओ’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!!!

 ‘लाव रे तो व्हिडीओ’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!!!
Press Release

‘लाव रे तो व्हिडीओ’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!!!

by Kalakruti Bureau 07/07/2020

आपल्या सगळ्यांचे लाडके सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे, हे आता ‘झी युवा’ वाहिनीवर सुद्धा दिसत आहेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम ते घेऊन आले आहेत. प्रेक्षकच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडलेला आहे. पहिल्या भागात, विकास जायफळे याने, वेगवेगळ्या व्हिडीओजच्या माध्यमातून आपले सगळ्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. निलेश साबळे यांचा हा नवा अवतार सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे. आपल्यासारख्याच इतर मंडळींना थेट टीव्हीवर पाहायची संधी मिळत असल्यामुळे, प्रेक्षक खूपच खुश आहेत. महाराष्ट्रातील जबरदस्त टॅलेंट पहिल्या भागात पाहायला मिळाले आहे.

लॉकडाऊनच्या काळात हा नवा कार्यक्रम पाहायला मिळत असल्यामुळे, प्रेक्षकांना मनोरंजनाचे हक्काचे साधन मिळाले आहे. त्याशिवाय, प्रेक्षकांना यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले व्हिडीओ  लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करत आहेत. लॉकडाऊनमधील विरंगुळा म्हणून, हा सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. अशावेळी, घरबसल्या कलाकारी करणाऱ्या या कलाकारांना, ‘झी युवा’ वाहिनी थेट टीव्हीच्या माध्यमातून प्रसिद्धी देणार असल्यामुळे, प्रेक्षकांना हा कार्यक्रम आपलासा वाटत आहे. पहिला भाग पाहिल्यानंतर, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणखी वाढला आहे. आपलं टॅलेंट सुद्धा जगासमोर यावं, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात तब्बल दहा हजारांहून अधिक लोकांनी वाहिनीला व्हिडीओ पाठवले आहेत. यातून व्हिडीओजची निवड करणे आणि उत्तम व्हिडीओज प्रेक्षकांना दाखवणे, ही तारेवरची कसरत आता वाहिनीला करावी लागणार आहे. अर्थात, प्रेक्षकांचा असा भरभरून प्रतिसाद मिळत असल्यामुळे, हा कार्यक्रम अधिक दर्जेदार होत जाणार यात शंकाच नाही. महाराष्ट्रभरातून उत्तमोत्तम टॅलेंट पाहायला मिळणार आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा नवाकोरा कार्यक्रम प्रेक्षकांचे भन्नाट मनोरंजन करणार आणि सगळ्यांना भरपूर हसवणार, हे नक्की!!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Celebrity News Entertainment Television Zee Yuva
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.