Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!
एखाद्या कलाकाराला एका साचेबद्ध भूमिकेत पाहण्याची झालेली सवय त्याच कलाकाराला मोडावी लागते… वेब सीरीजच्या जगात ‘पंचायत’ (Panchayat) ही सीरीज सध्या फारच लोकप्रिय आहे… या सीरीजमधल्या प्रत्येक कलाकाराने अप्रतिम काम केलं होतं; परंतु सचिवजींची भूमिका अभिनेता जितेंद्र कुमार याने इतक्या सहजसुंदरतेने साकारली की प्रेक्षक त्याच्या कामाचे फॅन्स झाले… मात्र, आता या पलिकडे जाऊन एका नव्या भूमिकेत जितेंद्र (Jitendra Kumar) दिसणार असून तो आगामी त्याच्या प्रोजेक्टमध्ये अर्शद वारसीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे…

जितेंद्र कुमार आगामी ‘भागवत’ (Bhagwat movie) चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतंच.. आता ‘भागवत’च्या ट्रेलरमधून साध्याभोळ्या सचिवजींचा आजवर कधीही न पाहिलेला भयानक अवतार पाहायला मिळतोय. भागवत’च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला दिसतं की, अर्शद वारसीची एक आक्रमक पोलीस अधिकारी म्हणून शहरात ओळख असते. अर्शद वारसी ज्या तुरुंगात असतो तिथे तो एका कैद्याला इतकी मारहाण करतो की त्यातच त्याचा मृत्यू होतो. अशातच अर्शदकडे मुलगी बेपत्ता झाल्याची एक तक्रार येते.
================================
हे देखील वाचा : Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; Pradaला टोमणा मारत बेबो म्हणाली…
=================================
पुढे ट्रेलरमध्ये एन्ट्री होते जितेंद्रची. साधाभोळा दिसणारा जीतू एका मुलीच्या प्रेमात पडतो… पण नंतर अनेक मुलींचं अपहरण केल्याचा आरोप जीतूवर लावण्यात येतो. जीतू विरुद्ध ही केस कोर्टात जाते. कोणत्याही वकीलाची मदत न घेता जीतू स्वतःच ही केस लढवायचं ठरवतो. आता प्रेक्षकांना जितेंद्र कुमारचा हा चित्रपट आणि त्याने साकारलेली भूमिका पसंत पडणार का हे पाहणं महत्वाचं आहे… झी ५ या ओटीटीवर १७ ऑक्टोबर २०२५ रोजी हा क्राईम थ्रिलर चित्रपट रिलीज होणार आहे…(Arshad Warsi and Jitendra Kumar)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi