ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
झीनत अमानने या सुपरहिट सिनेमात काम करायला दिला नकार !
१९७६ साली अभिनेत्री झीनत अमान दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या ‘धरम वीर’ या चित्रपटात काम करत होती. यात तिचा नायक होता धर्मेंद्र. (धर्मेंद्रने या सिनेमात स्कर्टसारखा पोशाख परिधान केला होता! हा विचित्र पोशाख त्यांनी कुठून शोधला होता देव जाणे!) याच काळात मनमोहन देसाई त्यांच्या आगामी चित्रपटाचे देखील कास्टिंग करत होते. त्या वेळी त्यांचा फ्लोअर एक चित्रपट होता ‘अमर अकबर अँथनी’. या चित्रपटात त्यांना अमिताभ बच्चनच्या सोबत झीनत अमान हिला घ्यायचे होते. तसे त्यांनी धरम वीरच्या सेटवर झीनतला विचारले. पण झीनत अमान यांनी काम करायला नकार दिला. का? मात्र तिच्या या नकाराचा तिला कायम पश्चाताप वाटत राहिला.
या नकारामुळे झीनत अमान मनमोहन देसाई यांच्या कॅम्पसमधून पुरती छुट्टी झाली आणि याचा गिल्ट तिला पुढे अनेक वर्ष होत होता. ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटातील भूमिका झीनत अमान हिने का नाकारली मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. सत्तरच्या दशकाच्या मध्यावर मनमोहन देसाई यांचे स्टार खूप बुलंद होते. एकाच वेळी त्यांचे तीन ते चार सिनेमे फ्लोअरवर असायचे आणि नंतर हे सर्व सिनेमे सुपर डुपर हिट होत होते. जितेंद्र, धर्मेंद्र, झीनत अमान, नीतू सिंग आणि प्राण यांना घेऊन त्यांनी ‘धरम वीर’ हा एक पोशाखी चित्रपट बनवला होता. या चित्रपटात धर्मेंद्रच्या अपोजिट झीनत होती. झीनत पहिल्यांदाच मनमोहन देसाई यांच्याकडे काम करत होती. या सिनेमाच्या वेळी त्यांचे चांगले ट्युनिंग जमले होते.
एकदा सेटवर मनमोहन देसाई यांनी झीनतला त्यांच्या आगामी ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात अमिताभ बच्चनच्या अपोजिट रोल ऑफर केला. झीनतने त्यांना सिनेमातील त्यांचे कॅरेक्टर ब्रिफ करायला सांगितले. ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट तसा टोटली हिरो ओरिएंटल सिनेमा होता. त्यात नायिकांना फारशी भूमिका नव्हती. झीनत अमान त्या काळात राज कपूरच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटात काम करत होती. साहजिकच तिला आता हीरोइन ओरिएंटेड सिनेमे हवे होते.
‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात मात्र तिचा रोल खूपच छोटा होता आणि त्यात करण्यासारखं काही नव्हतं. एक शोपीस म्हणून त्या कॅरॅक्टरला प्रेझेंट केलं होतं. तसेच मनमोहन देसाई यांनी या भूमिकेसाठी जे मानधन तिला ऑफर केलं होतं ते देखील तिच्या त्या काळातील मार्केट रेट पेक्षा कमी होते. त्यामुळे मनमोहन देसाई यांच्या या मल्टीस्टारर सिनेमातून ती बाहेर पडली. या चित्रपटात काम करायला नकार दिला. मनमोहन देसाई यांना हा त्यांचा अपमान वाटला आणि सिनेमात झीनत अमानच्या जागी परवीन बाबीची एन्ट्री झाली.
झीनतच्या हातातून केवळ हा एक सिनेमा गेला नाही तर त्यांच्या आगामी दोन सिनेमात झीनतला घेणार होते ते सिनेमे देखील गेले. हे दोन सिनेमे होते ‘सुहाग’ आणि ‘देश प्रेमी’. या दोन्ही सिनेमातील भूमिका परवीन बाबी हिला मिळाल्या. हे दोन्ही चित्रपट पुढे प्रचंड लोकप्रिय ठरले. झीनत अमान हिला नंतर मात्र मनमोहन देसाई यांचे हे चित्रपट नाकारण्याचा पश्चाताप होत होता कारण ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटानंतर तिची कारकीर्द म्हणावी तशी बहरली नाही. वैयक्तिक आयुष्यमध्ये झीनत अमान तशी फारशी आनंदी राहिलीच नाही.
१९ नोव्हेंबर १९५१ रोजी जन्मलेल्या झीनतचे वडील आमानुल्ला खान स्क्रीनप्ले रायटर होते. (तर आई हिंदू मराठी होती.) मुगल-ए आजम, पाकिजा या सिनेमाचे स्क्रीन प्ले त्यांनी लिहिले होते. झीनत तेरा वर्षाची असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने आपले शालेय शिक्षण पाचगणीला पूर्ण केले फेमिना मिस इंडिया, मिस एशिया हे किताब मिळाल्यानंतर ती हिंदी सिनेमात आली. तिचे पहिले लग्न १९७८ साली अभिनेता संजय खानसोबत झाले तो ऑलरेडी शादीशुदा होता. त्याला चार अपत्य होती. या लग्नाने झीनतला फक्त अपमान, खूप दुःख, मारहाण यशोदा या शिवाय दुसरे काही दिले नाही.
===========
हे देखील वाचा : अभिनेत्री भक्ती बर्वेचा या कल्ट क्लासिक सिनेमात कसा प्रवेश झाला?
===========
१९८० साली ते दोघे वेगळे झाले. नंतर १९८५ साली तिने अभिनेता मजहर खानसोबत लग्न केले. हे लग्न देखील फारसे सुखावह नव्हते. मजहर एक फ्लॉप कलाकार होता. झीनतवर खूप बंधने त्याने घातली होती. त्यामुळे तिला सिनेमातून ब्रेक घ्यावा लागला. १९९८ साली मजहर खानचा मृत्यू झाला. झीनत पुन्हा सिनेमात परतली. पण काहीच चमक दाखवू शकली नाही.