
Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ बायोपिक आहे का?; केदार शिंदेंचा मोठा खुलासा
मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण सध्या त्याच्या आगामी ‘झापुक झुपूक’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनालेमध्येच दिग्दर्शिक केदार शिंदे यांनी चित्रपटाचं नाव आणि त्यात सूरज चव्हाण प्रमुख भूमिकेत असणार असं जागिर केलं होतं. पण आता ‘झापुक झुपूक’ चित्रपट सूरजचा बायोपिक आहे असा समज लोकांमध्ये निर्माण झाला आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी याचा आता खुलासा केला आहे. काय म्हणाले ते जाणून घेऊयात… (Marathi entertainment news)

केदार शिंदेंनी (Kedar Shinde) नुकतीच ‘मॅजिक एफ एम मुंबई’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘झापुक झुपूक’ बाबत मोठा खुलासा केला आहे. केदार म्हणाले की, “एक घोळ झालाय…मी बिग बॉसमध्ये असं जाहीर केलं होतं की सूरज चव्हाणसोबत चित्रपट करणार आहे. ज्याचं नाव झापुक झुपूक…सूरज चव्हाणवर चित्रपट करत नाहीये. ही स्टोरी वेगळी आहे. माझ्याकडे एक गोष्ट होती आणि त्या गोष्टीसाठी मला एक डिव्हाइस हवा होता. ते कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग असायला हवं होतं. या इंडस्ट्रीमध्ये माझे असंख्य मित्र आहेत जे माझे चांगले कलाकार आहेत. पण, मला यावेळी अभिनेता नव्हे तर ते कॅरेक्टर हवं होतं. मी कास्टिंगच्या बाबतीत नेहमीच खूप पर्टिक्युलर राहिलो आहे. अगं बाई अरेच्चापासून ते बाईपण भारी देवापर्यंत…कास्टिंग परफेक्ट होत नाही तोपर्यंत मी तो चित्रपट जाहीरच करत नाही. आणि चित्रपट सुरुही करत नाही. त्यामुळे ‘झापुक झुपूक’ सूरजचा बायोपिक नाही”, असं ते स्पष्ट म्हणाले. (Entertainment news)

पुढे केदार म्हणाले की, “बिग बॉस मराठीचा प्रिमियर झाल्यानंतर १६ स्पर्धक घरात गेले. रात्री चॅनेल रुममध्ये मी बसलो होतो. त्या टीव्हीवर सगळे कॅमेरे दिसत असतात. सगळे जण बसले होते. रात्री दीड वाजता सूरज बिग बॉसच्या वॉशरुममध्ये शिरला. बाथरुमचा दरवाजा हा नेहमी ढकल्यानंतर उजव्या बाजूने उघडतो आम्ही तीच बाजू लॉक केली होती. आणि डाव्या बाजूने तो दरवाजा उघडायचा. रात्री दीड वाजता हा मुलगा ७-८ मिनिट दरवाजाच उघडत होता. त्याला दरवाजाच उघडेना. मी ते बघत असताना मला हसू आलं. एक सर्वसामान्य मुलगा एका छोट्या गावातला आहे. मग मला ते कॅरेक्टर क्लिक झालं. त्याला मी घेतलं त्या कॅरेक्टरचं नावही सूरज आहे. सूरजच्या आयुष्यात घडलेल्या गमतीजमती यात आहेत. पण, हा सूरजचा बायोपिक नाही. ही एक लव्हस्टोरी आहे. सूरजला आजपर्यंत सगळ्यांनी रीलस्टार म्हणून बघितलं आहे. पण, मोठ्या पडद्यावर तो नक्कीच सगळ्यांची मनं जिंकेल ही मला खात्री आहे”, असंही त्यांनी सांगितलं. (Marathi upcoming films)
===============================
हे देखील वाचा: Suraj Chavan : भरत जाधव आणि सूरज चव्हाण यांची ग्रेट भेट
===============================
दरम्यान, ‘झापुक झुपूक’ (Zapuk Zhupuk) चित्रपटात सूरज सोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार झळकणार आहेत. एका लव्हस्टोरी सोबतच वेगवेगळ्या भावनांचे मिश्रण या चित्रपटात २५ एप्रिल पासून पाहायला मिळणार आहे. (Suraj Chavan movie)