Tamannaah-Vijay : लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप?

Zohra Jabeen Teaser: रमजानमध्ये Salman Khanची चाहत्यांना भेट, ‘सिकंदर’मधलं पहिलं गाणं ‘जोहरा जबीन’ रिलीज…
Salman Khan ने ईद 2025 ला आपल्या चाहत्यांचे संपूर्ण मनोरंजन करण्याचा प्लॅन आखाला आहे. या ईदमध्ये सलमान खान 2025 च्या सिकंदर या अॅक्शन चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांसाठी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. सिकंदरच्या रिलीज पोस्टर आणि टीझरमुळे सलमान खानच्या चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असून आता सिकंदरचं पहिलं गाणं ‘जोहरा जबीन’ रिलीज होण्याच्या तयारीत आहे. ‘सिकंदर‘ चित्रपटातील ‘जोहरा जबीन’ या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. आणि त्यात सलमान खानची स्टाईल पाहून लोक वेडे होत आहेत. एनर्जीपॅक्ड हा डान्स नंबर यंदाच्या ईदमध्ये धुमाकूळ घालणार आहे.(Zohra Jabeen Teaser)

सलमान खान आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार असून त्यांची केमिस्ट्री टीझरला आग लावत आहे.सलमान खान आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत आणि तेही एका जबरदस्त फेस्टिव्हल अँथममध्ये. प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेले ‘जोहरा जबीन‘ हे गाणे यंदाच्या ईदमध्ये धुमाकूळ घालणार आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित आणि ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’च्या प्रत्येक नव्या अपडेटमुळे उत्सुकता वाढत आहे. शिवाय टीझरमधील सलमान आणि रश्मिकाची केमिस्ट्री आणि एनर्जी चार्टबस्टरचे संकेत आधीच देत आहे.

फराह खान या हाय-एनर्जी गाण्याला आणखी खास बनवत आहे, कारण तिच्या धमाकेदार कोरिओग्राफीने ते पुढच्या स्तरावर नेले आहे. आकाश अजीज आणि देव नेगी यांच्या भन्नाट आवाजासह समीर आणि दानिश साबरी यांच्या दमदार शब्दांसह हे गाणे चार्टबस्टर होण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे.सिकंदर हा ब्लॉकबस्टर चित्रपट गजनी चे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांनी दिग्दर्शित केलेला मास अॅक्शन पट आहे.(Zohra Jabeen Teaser)
===============================
===============================
या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे, ज्यांनी यापूर्वी सलमान खानसोबत किकसारखे हिट चित्रपट बनवले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये उर्वरित स्टारकास्टचे लूकही समोर आले आहेत. सिकंदरमध्ये बाहुबली चित्रपटात कटप्पाची भूमिका साकारणारा दाक्षिणात्य अभिनेता सत्यराज एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिकंदर हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.