मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
जे हिंदी निर्मात्यांना जमले नाही ते एका मराठी निर्मात्याने दाखवले…
हिंदी सिनेमातील पहिला शोमन राज कपूर आणि पहिला रिबेल स्टार शम्मी कपूर हे खरंतर सख्खे भाऊ. दोघांचा रुपेरी पडद्यावरील कालखंड साधारणतः सारखाच. तसे ते समकालीनच. राजकपूर थोडासा आधी सिनेमात आला. शम्मी कपूर देखील पन्नासच्या दशकाच्या माध्यपासून नायकाच्या भूमिका करू लागला. राज कपूरची नायक म्हणून शेवटची भूमिका असलेला मेरा नाम जोकर १९७० साली प्रदर्शित झाला. तर शम्मी कपूरच्या नायक पदाचा शेवट देखील सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीलाच झाला. यानंतर दोघेही चरित्र भूमिका करू लागले. तब्बल ३५-४० वर्षे या दोघांचा एकत्र चित्रपट कालखंड होता. तरी एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की, या दोघांनी एका चित्रपटात कधीच सोबत काम केले नाही. हा योग कधीच जुळून आला नाही! असं म्हणतात, बी आर चोप्रा यांना ‘वक्त’ (१९६५) या चित्रपटासाठी “ कपूर घराण्यातील तीन भावंडांना तुम्ही एकत्र घ्या” असं त्यांचे मित्र म्हणत होते. पण तसं काही झालं नाही. फक्त या चित्रपटात शशी कपूर दिसला. ज्याप्रमाणे राज कपूर आणि शम्मी कपूर एकत्र आले नाही; तसेच शम्मी कपूर आणि शशी कपूर देखील फक्त ‘जब से तुम्हे देखा है’ (१९९६३) या एकाच सिनेमात एकत्र आले. शशी कपूर आणि राजकपूर हे देखील कधीच एकत्र आले नाही. अर्थात शशी कपूर ने ‘आवारा’(१९५१) या चित्रपटात राज कपूरच्या बालपणाची भूमिका केली होती पण नायक बनल्यानंतर हे तिघांनीही एकमेकांसोबत काम केले नाही ही वस्तुस्थिती आहे.(Marathi producer)
पण राज कपूर आणि शम्मी कपूरंना एकत्र आणण्याचे हिंदी सिनेमा वाल्यांना जरी जमलं नसेल तरी एका मराठी चित्रपट निर्मात्याने(Marathi producer) हा कपिला षष्ठीचा योग एका गाण्यापुरता का होईना जुळून आणला होता. हा चित्रपट अजिबात चालला नाही. पण हे गाणं त्या काळात बऱ्यापैकी चाललं होतं आणि आजही यु ट्युब वर हे गाणं उपलब्ध आहे. वाचकांसाठी या गाण्याची युट्युब लिंक मी खाली दिलेली आहे. हा चित्रपट होता ‘धडाका’. १९९० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज कुणालाही आठवण्याची सुतराम शक्यता नाही. कारण केवळ एक आठवड्यानंतर मुंबईच्या भारत माता चित्रपट गृहातून हा सिनेमा उतरला गेला. कारण तो त्याच गुणवत्तेचा होता. त्याच पद्धतीने बनवला गेला होता. ही एक रंजक स्टोरी आहे. सिनेमा सृष्टीतील कलावंतांचे एक लाडके डॉक्टर होते डॉ माईक पवार. त्यांचा मुंबईला रणजीत स्टुडिओच्या जवळ दवाखाना होता. अख्ख बॉलीवूड त्यांचे पेशंट होते. त्यामुळे कलावंतांशी एक जवळीक निर्माण झाली होती. यातूनच त्यांनी १९८० साली ‘शरण तुला भगवंता’ हा चित्रपट निर्माण केला. हा त्या काळातील पहिला मल्टीस्टार मराठी सिनेमा होता अशी जाहिरात त्यांनी त्यावेळी केली होती.(Marathi producer)
या चित्रपटात कानून कौशल, अरुण सरनाईक, अशोक सराफ , पद्मा चव्हाण, रवीराज, शलाका रत्नमाला, कुलदीप पवार, सुधीर दळवी , धुमाळ, मास्टर भगवान, निळू फुले अशी तगडी स्टार कास्ट होती. चित्रपटाला संगीत नागेश राज यांचं होतं. तर चित्रपटातील गाणी सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, उषा मंगेशकर, महेंद्र कपूर यांनी गायलेली होती. हा चित्रपट १९८० साली प्रदर्शित झाला त्यानंतर या चित्रपटाचे निर्माते (Marathi producer) डॉ माईक पवार यांनी हाच चित्रपट थोडा फेर बदल करून पुन्हा एकदा ‘पतिव्रता’ या नावाने सेंसर बोर्डाकडून पास करून घेतला आणि लिमिटेड रिलीज देखील करून घेतला! यानंतर १९८५ साली डॉ माईक पवार यांनी ‘श्रद्धा’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित केला. तो पण चालला नाही. थोडक्यात डॉ माईक पवार यांच्या कोणत्या चित्रपटाला फारसे यश मिळत नव्हते. पण त्यांचा उत्साह दांडगा होता. १९८६ साली त्यांनी ‘धडाका’ नावाच्या सिनेमाची तयारी सुरू केली. या सिनेमांमध्ये सविता प्रभुणे, रविंद्र महाजनी, रविराज, अजय वढावकर, गीता सिद्धार्थ हे कलावंत घेतले परंतु चित्रपट काही पूर्ण झाला नाही.
=====
हे देखील वाचा : 2022 च्या बॉक्स ऑफीसवर बॉलिवूडपेक्षा टॉलिवूडचं वर्चस्व!
=====
मग त्यांनी शक्कल लढवली. त्यांच्या आधीच्या तिन्ही चित्रपटातील म्हणजेच ‘शरण तुला भगवंता’,’ पतीव्रता’ आणि ‘श्रद्धा’ या चित्रपटातील काही रिळे घेवून ‘धडाका’ हा सिनेमा बनवला. या सिनेमात त्यांनी पूर्वी चित्रित केलेलं राजकपूर आणि शम्मी कपूर यांचे एक गाणे टाकले . ‘नाचे रे नाचे अब्दुल्ला मामा ‘ हे गाणं नागेश राज यांनी संगीतबद्ध केलं होतं. या गाण्यात आपल्याला राजकपूर , शम्मी कपूर सोबत अशोक सराफ, रवींद्र महाजन देखील दिसतात राज आणि शम्मी कपूर या गावात बेफाम नसताना दिसतात. गंमत म्हणजे राजा कपूर यांचे निधन १९८७ साली झाले याचा अर्थ हे गाणे त्या पूर्वी साताठ वर्षे शूट करून घेतले होते. लग्नाच्या वरातीतील हे गाणं होतं. या सिनेमाचे हेच काय ते आकर्षण होते. हा चित्रपट १९९० साली लिमिटेड वर्जन म्हणून काही ठिकाणी प्रदर्शित झाला. या सिनेमाला देखील फारसं यश मिळालं नाही. या चित्रपटा पूर्वी १९८८ साली डॉ माइक पवार यांनी ‘कलंक’ नावाच्या एका चित्रपटाची घोषणा केली होती. त्यात सुरुवातीला हे गीत घेतलं होतं. या चित्रपटाच्या एलपी रेकॉर्ड्स देखील मार्केटमध्ये आल्या होत्या. चित्रपट पूर्ण झाला की नाही याची कल्पना नाही. पण डॉ. माईक पवार यांचे कौतुक करायला पाहिजे की हिंदीतील दोन सुपरस्टार भावांना जे हिंदीतील निर्मात्यांना जमलं नाही ते त्यांनी मराठीत करून दाखवलं एका चित्रपटात का होईना एका गाण्यापुरतं त्यांनी त्या दोघांना एकत्र चमकवले. ही माहिती मला मराठी चित्रपट सृष्टीतील शेखर सोमण यांनी दिली.
धनंजय कुलकर्णी