
Bahubali Movie :१० वर्षांनी पुन्हा एकदा ‘बाहुबली’ एका ट्विस्टसह भेटीला येणार!
साऊथ चित्रपटांचा प्रेक्षकांवर दिवसागणिक प्रभाव अधिक वाढताना दिसत आहे. बॉलिवूडपेक्षा साऊथ चित्रपटांचे सीक्वेल्स कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. मग यात ‘केजीएफ’ (KGF), सालार (Saalar) अशा अनेक चित्रपटांची नावं नक्कीच घेता येतील. या सगळ्या यादीत एस.एस.राजामौली यांचा ‘बाहुबली’ (Bahubali Movie) हा चित्रपट नक्कीच अग्रस्थानी असेल. ‘बाहुबली ३’ येणार की नाही माहित नाही पण सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या चित्रपटांच्या रि-रिलीज ट्रेण्डमध्ये आता बाहुबली चित्रपट देखील सामिल झाला असून लवकरच ‘बाहुबली: द बिगिनिंग’ (Baahubali The Beginning) (२०१५) आणि ‘बाहुबली 2: द कन्क्लुजन’ (Bahubali The Conclusion) (२०१७) आता जवळपास १० वर्षानंतर प्रेक्षकांना पुन्हा हा जादुई अनुभव घेता येणार आहे. (re-release movie trend)

आता चित्रपटाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभासने (Prabhas) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिलं आहे की, ‘बाहुबलीच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाची कथा आता ‘बाहुबली: द एपिक’ या एकाच चित्रपटाद्वारे पुन्हा ३१ ऑक्टोंबर २०१५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जात आहे. प्रेक्षकांना बाहुबलीची कथा कोणत्याही ब्रेकशिवाय एकत्र पाहण्याचा एक नवीन अनुभव मिळणार आहे’.
================================
=================================
बाहुबली चित्रपटाने संपूर्ण तेलुगु चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा आणि ओळख मिळवून दिली. इतकंच नाही तर अभिनेता प्रभास यालाही एक नवा चाहता वर्ग ग्लोबली मिळाला. जगभरात बॉक्स ऑफिसवर बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बक्कळ कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार ‘बाहुबली : द बिगिनिंग’ ने ६५० कोटी, ‘बाहुबली : द कनक्लूजन’ने १८१० कोटींची कमाई करत एकत्रित या दोन्ही भागांनी २४६० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. बाहुबली चित्रपटात प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा दग्गूबत्ती, तमन्ना भाटिया, राम्या क्रिश्नन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. (Bahubali Movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi