Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prarthana  Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Mahesh Manjrekar पहिल्यांदाच दिसणार साधूच्या भूमिकेत; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लूक

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

2024 Flashback : २०२४ सालात ‘या’ कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

 2024 Flashback : २०२४ सालात ‘या’ कलाकारांनी घेतला जगाचा निरोप
कलाकृती विशेष

2024 Flashback : २०२४ सालात ‘या’ कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

by Jyotsna Kulkarni 31/12/2024

२०२४ ला निरोप देत असताना आपण या वर्षातल्या सर्व चांगल्या आठवणी घेऊन नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. असे असले तरी, यावर्षांने आपल्याला अनेक कटू आठवणी देखील दिल्या आहेत. या वर्षी आपण मनोरंजनविश्वातील अनेक दिग्गज आणि महान कलाकारांना कायमचेच गमावले आहे. या लेखातून जाणून घेऊया २०२४ मध्ये या जगाचा निरोप घेणाऱ्या कलाकारांबद्दल. (2024 Flashback )

प्रभा अत्रे, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका
ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे (Singer Prabha Atre)
यांचे १३ जानेवारी २०२४ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने ९१ व्या वर्षी निधन झाले. ‘भारतरत्न’ दिवंगत पं. भिमसेन जोशी यांच्या साथीने आणि त्यांच्या पश्चात प्रभा अत्रे यांनी पाच दशकांहून अधिक काळ ‘किराणा’ घराण्याची शास्त्रीय गायन परंपरा निष्ठेने पुढे केली. ‘पद्मश्री’,’पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरवण्यात आले होते. उत्तम शास्त्रीय गायिका असण्याबरोबरच त्या शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, संगीत दिग्दर्शक, लेखिका म्हणूनही प्रसिद्ध होत्या.

2024 Flashback

विजय कदम, अभिनेते
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (Vijay Kadam)
यांचे १० ऑगस्ट २०२४ रोजी कर्करोगाने निधन झाले. मराठी मनोरंजनविश्वातील प्रतिभासंपन्न अभिनेते म्हणून विजय कदम यांची ओळख होती. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना त्यांनी आपली ओळख तयार केली. आनंदी आनंद, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघं राजा राणी, तेरे मेरे सपने, देखणी बायको नाम्याची, रेवती, भेट तुझी माझी सारखे अनेक चित्रपट विच्छा माझी पुरी करा, आम्ही आलो रे आदी त्यांच्या अजरामर कलाकृती आहेत.

2024 Flashback

मंगेश कुलकर्णी, गीतकार
गीतकार,अभिनेता आणि लेखक असणाऱ्या मंगेश कुलकर्णी (Mangesh Kulkarni) यांचे १९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांनी पटकथाकार म्हणूनही हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उल्लेखनीय काम केले. त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या होत्या. आभाळमाया (Abhalmaya) या गाजलेल्या मालिकेचे शीर्षक गीत मंगेश यांच्या लेखनीतूनच आले होते.

2024 Flashback

अतुल परचुरे, अभिनेता
मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील अष्टपैलू अभिनेता अतुल परचुरे (Atul Parchure) यांचे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन वयाच्या ५७ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. अनेक नाटकांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका केल्या. शिवाय हिंदी सिनेमात देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

2024 Flashback

विकास सेठी, हिंदी अभिनेता
हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेता विकास सेठी (Vikas Sethi) यांचे ८ सप्टेंबर २०२४ रोजी निधन झाले. ‘क्यूोकी सास भी कभी बहू थी’सह (kyunki saas bhi kabhi bahu thi) अनेक हिंदी टीव्ही विश्वातील लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेता विकास सेठी यांनी काम केले होते.

2024 Flashback

शारदा सिन्हा, गायिका
बिहार कोकिळा, बिहार रत्न, मिथिली विभूती
आदी अनेक पुरस्काराने सन्मानित आणि छठ गाण्यांसाठी प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा (Sharda Sinha) यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झाले. ‘कहे तोसे सजना’ आणि ‘तार बिजली से’ या गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूड आणि लोकसंगीतावर छाप सोडली.

2024 Flashback

सुहानी भटनागर, अभिनेत्री
‘दंगल’ चित्रपटात बबिता फोगटची बालपणाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे (Suhani Bhatnagar) वयाच्या केवळ १९ व्या वर्षी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. ती डर्माटोमायोसिटिस नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती.

2024 Flashback

पंकज उधास, गायक
प्रसिद्ध गायक पंकज उधास
(Pankaj Udhas) यांचे २६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. ‘चिट्टी आई है’ आणि ‘आज फिर तुम पे प्यार आया है’ या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पंकज उधास यांनी गझल गायनात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आजही त्यांची गाणी खूप प्रसिद्ध आहेत.

2024 Flashback

ऋतुराज सिंग, अभिनेते
हिंदी मालिका आणि सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह (Ruturaj Singh) यांचे २० फेब्रुवारी २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या होत्या.

2024 Flashback

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: २०२४ आढावा २०२४मध्ये निधन झालेले कलाकार actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity Death Celebrity Death 2024 Celebrity News Featured Marathi Movie Year Ender
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.