
Marathi Movies : थिएटर गाजवल्यानंतर ‘हे’ मराठी चित्रपट ओटीटीवर रिलीज
२०२५ वर्ष अर्ध सरलं देखील… पण खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांसाठी हे वर्ष लकी आहे असं म्हणावं लागेल. जानेवारी ते जून महिन्यापर्यंत रिलीज झालेल्या सगळ्याच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांना फार उत्तम प्रतिसाद दिला आहे. बॉलिवूड, हॉलिवूड आणि टॉलिवूडच्या गर्दीत मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर कमाई देखील चांगली झाली आहे. आता थिएटर गाजवणारे काही मराठी चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहेत. चला तर जाणून घेऊयात लिस्ट…(Marathi movies 2025)

२०२५ मध्ये हे वर्ष गाजवणारे ‘सुशीला सुजीत‘, ‘देवमाणूस’ आणि ‘गुलकंद’ हे तीन मराठी चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले आहेत. तिनही चित्रपटांचा विषय, आशय आणि मांडणी निराळी आहे. आणि आता हे ३ चित्रपट प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहेत. ‘सुशीला सुजीत’ हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असून ‘देवमाणूस’ आणि ‘गुलकंद’ हे २ चित्रपट सध्या प्राइम व्हिडीओवर रेंटवर उपलब्ध आहेत. (Marathi movies on OTT platform)

दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित’सुशीला सुजीत’ चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर, इंडस्ट्रीत ४० वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणारे महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे पहिल्यांदाच देवमाणूस या चित्रपटात एकत्र झळकले होते. आणि रेड २ चित्रपटासोबत १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गुलकंद’ (Gulkand Marathi movie) चित्रपटाने तर हॅट्रिकच केली आहे. सचिन गोस्वामी यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे यांची सिनेमात प्रमुख भूमिका असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भारतात ७.२४ कोटी आणि जगभरात ८.१४ कोटींची कमाई केली आहे.(Entertainment tadaka)
================================
हे देखील वाचा: एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar ?
=================================
दरम्यान, लवकरच मराठीत थ्रिलर, कॉमेडी, हॉरर, बायोपिक्स अशा वेगवेगळ्या प्रकारातील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात ‘ये रे ये रे पैसा ३’, ‘पुन्हा दुनियादारी’, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’, ‘ललिता बाबर’, ‘खाशाबा’, ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji Movie) अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.(Marathi upcoming movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi