Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘22 Maratha Battalion-गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
22 Maratha Battalion: मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हते तर कुशल युद्धनीतीकारही होते. त्यांच्या युद्धशैलीत गनिमी कावा’ या विशेष तंत्राचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा तंत्राचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत.(22 Maratha Battalion Marathi Movie)

नुकत्याच झळकलेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. नजरेत भरणारे दाट जंगल आणि त्यात झळकणारा ‘२२ मराठा बटालियन’ हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. अद्वितीय साहस, गनिमी काव्याची रणनिती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल, यात शंकाच नाही.
==============================
===============================
दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात,” ‘२२ मराठा बटालियन‘ हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनितीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमी कावा हे केवळ एक युद्धतंत्र नव्हते तर ती एक रणनिती होती. शत्रुला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले. हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली ती चित्रपट पाहताना अधिकच वाढेल, याची आम्हाला मला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहेत त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढलीय. आम्हाला आशा आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.”(22 Maratha Battalion Marathi Movie)
=============================
हे देखील वाचा: गुलकंद सिनेमामध्ये समीर चौघुले आणि Sai Tamhankar ची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र..
=============================
शकुंतला क्रिएशन प्रॉडक्शन आणि एस आर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबुराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनय बेर्डे, उत्कर्ष शिंदे, यश डिंबळे, सपना माने, टिशा संजय पगारे, अमृता धोंगडे, शिवाली परब, आयुश्री पवार अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.