‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘या’ कारणासाठी बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शकाने गोळ्या झाडून कुटुंबाला आणि स्वतःला देखील संपवलं….
मायानगरी मधील झगमगाटात काही जीव अक्षरश: दबून जातात. इथल्या ‘चकाचौंध रोशनी’मध्ये त्यांचे दुःख, अपयश, अवमान कधीच कुणाला दिसत नाही. आणि मग याच दुःखातून, नैराश्यातून काहीजण टोकाचा निर्णय घेतात. अपयशानंतर आलेल्या यशाच्या काळात माणूस अपयशाच्या आठवणी एन्जॉय करतो. आपला संघर्ष सार्थकी लागला याचे समाधान असते. पण हीच बाब उलट झाली तर? (Tragedy of Kamal Sadanah)
यशानंतर आलेलं अपयश जास्त कडवट असतं. जास्त क्लेशकारक असतं. या अपयशाने भले भले कोसळतात. दिग्दर्शक ब्रिज यांनी अशाच एका कसोटीच्या क्षणी स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला बंदुकीतून गोळ्या घालून पूर्णपणे संपवून टाकले.
२१ ऑक्टोबर १९९० हा बॉलिवूडच्या इतिहासातील हा एक काळा दिवस होता. काय होता हा किस्सा? अशी कोणती गोष्ट घडली की, ज्याने दिग्दर्शक ब्रिज यांना असे टोकाचे पाऊल उचलून आपल्या स्वत:च्या कुटुंबाचा सर्वनाश करुन घेतला?
दिग्दर्शक ब्रिजमोहन सदानाह साठच्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये आले. ‘सस्पेन्स थ्रिलर’ या जॉनरसोबत त्यांनी साठ आणि सत्तरच्या दशकात अनेक उत्तम आणि यशस्वी चित्रपट दिले. त्यांचा हिट ठरलेला पहिला चित्रपट होता १९६३ साली प्रदर्शित झालेला ‘उस्तादो के उस्ताद’ यात रफीचे ‘सौ बार जनम लेंगे सौ बार फना होंगे’ हे अप्रतिम गाणे होते. यानंतर ‘ये रात फिर ना आयेगी, ‘नाईट इन लंडन’, ‘यकीन’, ‘दो भाई’ असे सिनेमे दिले.
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी एक बंपर हिट सिनेमा दिला. हा सिनेमा होता ‘व्हिक्टोरिया नंबर 203’ या चित्रपटात नवीन निश्चल-सायरा बानो यांच्या प्रमुख भूमिका असल्या तरी प्राण आणि अशोक कुमार यांनी धमाल केली होती. ‘दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे’ हे गाणे या चित्रपटात होते. या चित्रपटानंतर ‘चोरी मेरा काम’, ‘प्रोफेसर प्यारेलाल हे यशस्वी चित्रपट ब्रीज यांनी दिग्दर्शित केले होते. ब्रिज यांनी साठच्या दशकातील अभिनेत्री ‘सईदा खान’ (किशोर कुमार सोबतच्या ‘अपना हाथ जगन्नाथ’फेम) तिच्यासोबत लग्न केले होते. नम्रता आणि कमल ही दोन अपत्ये झाली. (Tragedy of Kamal Sadanah)
ऐंशीच्या दशकात देखील त्यांच्या नावाचा दबदबा कायम होता. पण बॉम्बे 405 मील, उंचे लोग, मगरूर हे त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. आर्थिक विवंचना वाढू लागल्या. ऐषारामात जगण्याची सवय झाल्यामुळे आता पदोपदी पैशाचा प्रश्न निर्माण होऊ लागला. त्याचबरोबर सिनेमाच्या दुनियेत फ्लॉपचा शिक्का कपाळी घेऊन ‘अपमानीत’ जगणं आणखी कठीण होवू लागलं. याच काळात कुटुंबात वादविवादाला सुरुवात झाली. (Tragedy of Kamal Sadanah)
सर्व व्यवस्थित चालू असताना अपयशाचा फेरा त्यांच्या वाट्याला आला. ब्रिज हे अतिशय शीघ्रकोपी होते. बायको सोबत त्यांचे वारंवार खटके उडत होते. बेकारी आणि अपयशाने कुटुंबातील बेबनाव वाढतच गेला.
२१ ऑक्टोबर १९९० या दिवशी त्यांच्या मुलाचा कमल सदानाहचा वाढदिवस होता. कमल विसाव्या वर्षात पदार्पण करत होता. साहजिकच मित्रांसोबत पार्टी करून तो घरी आला. घरी देखील पार्टीची तयारी केली होती. वाढदिवसाचा केक आणून ठेवला होता. बंगल्यामध्ये वाढदिवस तयारी चालू होती. मित्रांसमवेत कमल मध्यरात्री घरी परतला. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना नियती मात्र काही वेगळाच विचार करत होती. (Tragedy of Kamal Sadanah)
अचानक त्यांना बंदुकीच्या गोळी चालवण्याचा आवाज आला. कमल धावत धावत वडिलांच्या रूमकडे गेला. वडिलांनी त्याच्या आईवर सईदा खानवर आणि बहीण नम्रतावर गोळ्या झाडल्या होत्या आणि त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ब्रिज यांनी कमलच्या दिशेने देखील एक गोळी झाडली. पण तो वाकल्यामुळे त्याच्या मानेला चाटून ती गोळी गेली. मित्रांनी लगेच पोलिसांना फोन केला आणि कमलला दवाखान्यात ऍडमिट केले. इकडे तोवर ब्रिज यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच कमलला आपल्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत पाहावा लागला. (Tragedy of Kamal Sadanah)
ब्रिज यांनी असा पराकोटीचा निर्णय का घेतला यावर त्या काळात मीडियात चर्चा चालू होती. ब्रिज यांची मुलगी नम्रता हिने ज्या मुलाशी लग्न ठरवले होते ते स्थळ ब्रिज यांना पसंत नव्हते. त्यातून रोज वाद होत होते. सततच्या अपयशाने ते नैराश्यग्रस्त झाले होते. कर्जाचा डोंगर वाढत होता. या सर्वातून मुक्तता केवळ मृत्युनेच होऊ शकते हा साक्षात्कार कदाचित ब्रिज यांना झाला असावा. आपल्यानंतर कुटुंबाची वाताहात होवू नये म्हणूनच त्यांनी आपल्या कुटुंबियांवर गोळीबार केला आणि स्वत: देखील आत्महत्या केली. (Tragedy of Kamal Sadanah)
============
हे देखील वाचा – असं काय घडलं की ‘त्या’ अभिनेत्रीने सिनेसृष्टीशी कायमचे नाते तोडून परदेशात जाणे पसंत केले?
============
कमल सदानाह छोट्याशा ऑपरेशननंतर बरा झाला. काळ कुणासाठी थांबत नाही. दोन वर्षानंतर कमल सदानाहने काजोल सोबत ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आगमन केले. पहिल्याच सिनेमाने त्याची चॉकलेट बॉय ही इमेज तयार झाली. पण या इमेजवर तो फार काळ गाजवू शकला नाही. रंग, बाली उमर को सलाम, हम सब चोर है, अंगारा या सिनेमातून तो दर्शन देत होता पण यापैकी एकाही सिनेमाने तिकीटबारीवर तग धरला नाही.
नव्वदच्या दशकाच्या अखेरीस एक फ्लॉप स्टार म्हणून अडगळीत पडला. २००७ साली त्याने आपल्या वडिलांच्या ‘व्हिक्टोरिया नंबर 203’ या चित्रपटाचा त्याच नावाने रिमेक बनवला. पण त्याला देखील फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण कमल आता कधीच त्याचा वाढदिवस साजरा करीत नाही कारण २१ ऑक्टोबर १९९० चा दिवस तो आयुष्यभर विसरणार नाही!