खराखुरा ‘सुपरहिरो’ फरहान अख्तर; जीवाची बाजी लावून वाचवले एका कर्मचाऱ्याचे प्राण
रुपेरी पडद्यावर साहसाची, मर्दुमकीची कामे करणाऱ्या कलावंताला खऱ्याखुऱ्या आयुष्यातही कधी कधी वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. सिनेमातील अशक्य अतार्किक गोष्टी म्हणजे एकाच वेळी दहा-दहा गुंडांना लोळवणे, आगीच्या ज्वाळेतून नायिकेची सुटका करणे, महापुराच्या लाटेत घुसून कुणाला वाचविणे… अशी कर्तबगारी पाहताना प्रेक्षक टाळ्या वाजवत असतात. पण अशाच अचाट गोष्टी वास्तविक आयुष्यात सामोर्या आल्या तर? अभिनेता फरहान अख्तर याला एकदा अशाच एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. ५ जून २०१५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘दिल धडकने दो’ (Dil Dhadakne Do) या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या या वेळचा हा प्रसंग आहे. (Superhero Farhan Akhtar)
झोया अख्तर (Zoya Akhtar) दिग्दर्शित हा चित्रपट एक मल्टिस्टारर सिनेमा होता. रणवीर सिंग (Ranveer Singh), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), फरहान अख्तर, अनुष्का शर्मा (Anushka Sharma), अनिल कपूर (Anil Kapoor) अशी मोठी स्टार कास्ट होती. या चित्रपटाचे चित्रीकरण टर्कीमध्ये झाले होते. काही मजेदार प्रसंग देखील चित्रिकरणाच्या दरम्यान घडले होते.
इस्तंबूल येथील सोफिया म्युझियममध्ये एक प्रसंग चित्रित करायचा होता. तिथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. शूटिंग करणे गरजेचे होते. झोयाने कुणालाही व्यत्यय न आणता सर्व कलाकारांसोबत चित्रीकरण उरकून घेतले. इतर पर्यटकांना देखील चित्रीकरणामध्ये आयत्या वेळी सामावून घेतले. (Superhero Farhan Akhtar)
समुद्रावर चित्रीकरण चालू असताना शेकडो ‘सीगल’ पक्षी तिथे येत असतं. फरहान त्यांना खाद्य देत असल्याने त्याच्याशी या पक्षांची चांगली मैत्री झाली होती. सबंध शूटमध्ये त्यांना डॉल्फिनचे दर्शन मात्र अजिबात होत नव्हते. त्यामुळे सर्व जण नाराज होते पण शेवटच्या दिवशी अनपेक्षितपणे पन्नास हून अधिक डॉल्फिन त्यांना दिसले. अनेकांनी मस्त व्हिडीओ शूट केले. (Superhero Farhan Akhtar)
या सिनेमाचे शूटिंग Anatolia च्या समुद्रकिनाऱ्यावर चालू होते. निसर्गरम्य निळाशार समुद्र पाहून सर्व क्रू मेंबर्स खुशीत होते. झोया अख्तरने पॅकअप म्हटल्यानंतर सर्वजण आनंदाने बीचवर खेळायला गेले. सर्वजण बीचवर मजामस्ती करत होते. हे सर्व चालू असताना त्यांच्यातील एक मेंबर समुद्राच्या आत गेला. हा होता रणवीर सिंग याचा हेअर ड्रेसर धर्मेश.
धर्मेशला पाण्याचा अंदाज आला नाही. तो समुद्राच्या आत आत गेला आणि एका मोठ्या समुद्राच्या लाटेने तो आणखी आत फेकला गेला. बीचवर असलेल्या काही जणांनी ते दृश्य बघून आरडाओरडा केला. तिकडे धर्मेश समुद्राच्या आत खेचला जात होता. आता तर तो गटांगळ्या खात होता.(Superhero Farhan Akhtar)
==========
हे देखील वाचा – पद्मिनी कोल्हापूरेच्या थोबाडीत मारण्यासाठी वापरला न्यूटनचा नियम!
==========
अभिनेता फरहान अख्तरने जेव्हा त्याला पाहिले आणि पुढचा मागचा काही विचार न करता तो समुद्रात घुसला. वेगाने तो धर्मेशच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याला खांद्यावर घेतले आणि जीवाची बाजी लावत फरहान अख्तर किनाऱ्यावर आला. धर्मेश नाका तोंडात पाणी गेल्यामुळे प्रचंड घाबरला होता. त्याला प्रथमोपचार दिल्यानंतर तो शुद्धीवर आला. फरहान अख्तरने जीवावर उदार होऊन त्याचे प्राण वाचवले. रिल लाइफ पराक्रम गाजविणाऱ्या मधील हिरोने रिअल लाईफमध्ये देखील हिरोगिरी करून नाव सार्थ केले. (Superhero Farhan Akhtar)